चिखली - 13 एप्रिल - कोरोना मुळे एकी कडे देशात लॉकडाउन आहे तर दूसरी कडे या परिस्थित ही आपला व आपल्या परिवाराच्या पोटची खळगी भरण्यासाठी हमालाना कामावर जावे लागत आहे.आज एका दुर्दैवी घटनेट एका हमालाला आपला जीव गमवावा लागला तर इतर 6 हमाल जख्मी झाल्याची घटना चिखली एमआईडीसी मध्ये घडली आहे.
मिळालेली माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील एमआयडीसी मधील महाबीज महामंडळने भाडेतत्त्वावर घेतलेल्या जाजू यांच्या गोडाऊन वरुण सोयाबीन घेऊन महाबीज मध्ये घेऊन येत असताना एमआयडीसी मधील मिरा इंडस्ट्रीज जवळ टर्निंग मध्ये ड्रायव्हरचा तोल गेल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्या मध्ये बसलेले हमाल शेख शब्बीर शेख जमाल वय 50 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर ईतर सहा जन हमाल जखमी झाले आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जख्मी मध्ये शेख जमील शेख चांद 40,बालू सोनाजी इंगले 36, सै.वाजिद सै.जावेद 27, सुनील रक्ताडे 27, शेख शाहिद शेख जुलकर्नैन 32 व शाहेद काज़ी 38 यांचा समावेश आहे.आपल्या रक्ताच घाम करून गाळणाऱ्या हमालांना बांधकाम कामगार महामंडळ सारखीच मृत्यू पूर्व व नंतर मिळणाऱ्या शासकीय सुविधा देण्यात याव्या व महामंडळ कडून हमालांचे विमा तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तीस आणि जखमींना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मृत हमालाच्या परिवाराकडून होत आहे.
Post a Comment