
सावळीविहीर। राजेंद्र गडकरी। सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहे, त्यामुळे दक्षता घेणे महत्त्वाचे आहे ,शासकीय यंत्रणा त्यासाठी मोठी कडक अंमलबजावणी करत असताना सावळीविहीर येथे मात्र लक्ष्मीरोडला नगर-मनमाड रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याचा बाजार आता दररोज सकाळी भरला जात असून येथे लॉक डाऊनच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे ,याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांची मागणी आहे,देशात राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे,देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण सापडले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे, शिर्डी व परिसरातही सर्वत्र बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत, आठवडे बाजारही बंद आहे, असे असताना अत्यावश्यक सेवा च्या नावाखाली अनेक भाजीपाला वाले दररोज सकाळी सावळीविहीर येथे नगर मनमाड रोडच्या कडेला विक्रीसाठी बसतात, भाजीपाला घेण्यासाठी येथे लोकांची गर्दी होते ,अनेकांच्या तोंडाला मास्क किंवा साधा रुमाल बांधलेला नसतो, त्याच प्रमाणे सोशल डिंस्टन्स पाळली जात नाही, येते भाजीपाला घेताना गर्दी होते,, कोणती दक्षता पाळली जात नाही याकडे दुर्लक्ष होत आहे,येथे गुरुवारी आठवडे बाजार भरू दिला जात नाही, मात्र आता भाजीपाला विक्रेते हे सावळीविहीर च्या लक्ष्मीवाडी वर नगर मनमाड रस्त्याच्या कडेला बसून दररोज सकाळी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्री करत आहेत, मात्र लॉकडाऊन चे नियम पाळताना दिसत नाही, येथील शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे , सामाजिक कार्यकर्ते किरण आगलावे यांनी या भाजीपाला विक्रेत्यांना लॉक डाऊन चे नियम सांगून त्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले, मात्र कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही ,जो तो आपल्या मनमानी प्रमाणे आपला व्यवसाय करण्यात दंग होता, भाजीपाला अत्यावश्यक असला तरी लॉक डाऊन चे नियम पाळणे गरजेचे आहे व येथे ते पाळले जात नाही, त्यामुळे अशा भाजीपाला विक्रेत्यांना सक्त ताकिद देणे महत्त्वाचे आहे, अन्यथा दुर्देवाने काही प्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्नही येथील सूज्ञ नागरिक विचारत आहेत.
Post a Comment