शिर्डीत कोरोना रोखण्याची जबाबदारी पोलिसांच्या हाती ! मग परप्रांतीय बांधकाम मजूरांना काय कुणाची भीती ?

शिर्डी  जितेश लोकचंदानी निवासी संपादक
देशात सध्या कोरोना मुळे हाहाकार माजला आहे, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,अशा परिस्थितीत सोशल डिस्टेंस प्रत्येकाने पाळणे  आवश्यक आहे, मात्र असे असतानाही शिर्डीत पोलीस स्टेशनच्या आवारातच पोलीस स्टेशनच्या नवीन बांधकाम साठी आलेले परराज्यांतील मजूर कोणत्याही लॉक डाऊन चा नियम न पाळता बिनधास्तपणे येथे राहत आहेत, एकत्रित पत्ते खेळताना,
गप्पा करताना हे मजूर दिसून येत आहेत, पोलीस स्टेशनच्या भिंती जवळअसणारे हे मजूर मात्र शिर्डी पोलिसांना ,कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत दिसले गेले नाही का। असा सवाल शिर्डीकरांमधून आता उपस्थित होऊ लागला आहे ,दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण ।अशी शिर्डी पोलीस स्टेशनची ची परिस्थिती झाली आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाउन ची घोषणा केली व सर्व देशभरातील शहरे गावे हे कडकडीत बंद आहेत ,सर्वकाही ठप्प आहे ,काम धंदे बंद आहेत, सर्व जण घरात आहेत, लॉक डाऊन चे नियम सर्व पाळत आहेत ,मात्र ह्या नियमांची पोलीसां कडुण शिर्डीत एैशीतशी होताना दिसत आहे व पोलीस वसाहतीच्या बांधकामावर असणाऱ्या मजुरांकडून  असा प्रकार होत आहे, त्यामुळे बाहेर नियम  सांगणारे आपल्या जवळच्याना  नियम का सांगत नाही ।असा प्रश्न निर्माण झाला आहे,
    आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी मध्ये सध्या लॉकडीऊन सुरू आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, 17 मार्चपासून श्री साईबाबांचे मंदिर सुद्धा दर्शनासाठी भक्तांना बंद आहे, अशी कडक अमलबजावणी येथे होत आहे ,मात्र अशा लॉकडीऊनच्या काळात शिर्डी पोलीस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये पोलीस वसाहतीचे सध्या काम सुरू आहे ,मुंबई पोलीस निधि अन्तर्गत   शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात शिर्डी विभागीय पोलीस कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने असे एकूण 112 सदनिकांचे बांधकाम येथे होत आहेत, हे बांधकाम श्रीनाथ कंट्रक्शन नाशिक व वास्तुविशारद भुतडा श्रीरामपूर यांच्यामार्फत केले जात आहे, या ठेकेदारांकडून येथील बांधकामावर मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश येथील शेकडो पुरुष, महिला मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहेत ,हे परप्रांतीय मजूर शिर्डी पोलीस स्टेशन जवळच असणा्र्या या नवीन बांधकामाच्या खोल्यांमध्ये दिसतात, या मजुरांना कोरोनाची काही माहिती नाही असली तरी  ते फारसे त्याकडे लक्ष देत नाही, यांच्याकडे कोण येते, कोण जाते ,ते कोणाला भेटताच ,याची कोणतीही नोंद नाही, या लोकांची कोणतीही तपासणी झालेली नाही, हे मजूर एकत्रित बसून गप्पा मारतात, पत्ते खेळतात, बिड्या ओढतात,  जेवण करतात असे दिसून येते, मात्र ह्या सर्व गोष्टी शिर्डी पोलिस जवळ असतानाही पोलिसांना  ते दिसत का नाही ।असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत,
 शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये व शिर्डी शहरामध्ये कडक अंमलबजावणी करणारे पोलीस आपल्या कॅम्पस मध्ये असणाऱ्या या परप्रांतीय मजुरांवर इतके मेहरबान का। असा सवालही येथे नागरिकांमधून आता विचारला जात आहे ,याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे, जर एखादा परप्रांतीय मजूर परराज्यातून आलेला असेल तर मोठी समस्या उद्भउ शकते, व या मजुरां पैकी कोणी कोरोना च्या रुग्णाच्या संपर्कात आलेला असेल तर मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रथम या सर्व लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे, शिवाय सोशल डिंस्टन्स व मास्क हे मजूर वापरत नाहीत, त्यांना लॉक डाउन चे नियम सांगणे महत्त्वाचे आहे, अन्यथा या लोकांवरही कारवाई करणे आवश्यक आहे, सध्या शिर्डी व परिसरात कोरोना चा रुग्ण आढळलेला अद्याप तरी नाही, मात्र अशी अनदेखि झाली तर मात्र भविष्यात मोठा पेच निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दक्षता घेणे महत्त्वाचे आहे ,सर्वांना नियम सारखे लक्ष घातले पाहिजे ,अशी मागणी आता होत आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget