Latest Post

ज्ञानेश गवले, अहमदनगर-अहमदनगर जिल्ह्यात आज २५ वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
अँकर-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून जामखेड, नेवासा, अहमदनगर, संगमनेर आणि राहाता तालुक्यानंतर आज श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन या खेडे गावात शेतकरी कुटुंबात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी दिली.
आज आढळून आलेला कोरोना बाधित रुग्ण हा शेतकरी कुटुंबातील मतिमंद तरुण असून सध्या तो पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला चक्कर आल्यानंतर उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे संशयित म्हणून त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला होता. तो आता पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
ही माहिती मिळताच उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंत जमधडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदींनी गोवर्धन गावाला भेट देऊन माहिती घेतली. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण दहा व्यक्तींना ताब्यात घेऊन अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. तसेच तो खेड्यातील शेतकरी असून त्याचा कोणाकोणाशी संपर्क आला याचीही माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात आजूबाजूला कोरोनाचे  रुग्ण रोज आढळून येत असताना आता श्रीरामपूर तालुक्यात पहिला रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सुरक्षितता म्हणुन घरातच थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर् येथे कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली असून त्यामुळे पुढील दक्षता घेण्यासाठी तातडीने पावले उचलून हरिगाव व उन्दिरगाव ग्रामपंचायत वतीने दि ६ एप्रिलपासून ९ एप्रिलपर्यंत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्ण हरिगाव उन्दिरगाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व रस्ते गावात येण्यासाठी व जाण्यासाठी गल्ली बोला नाकाबंदी करून बंद करण्यात आले आहेत.अशी  माहिती सरपंच सुभाष बोधक उपसरपंच रमेश गायके,व दीपक नवगिरे यांनी दिली.गोवर्धन येथील व्यक्ती मतीमंद असून त्याला ४ तारखेला फीट आली.त्याला लोणी येथे नंतर विळद घाटात विखे फौन्डेशन व नंतर पुणे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.हा अहवाल मिळताच प्रांताधिकारी अनिल पवार,,तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने पुढील पावले उचलली आहेत.श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने औषध फवारणी मशीन दिल्यानंतर हरिगाव पूर्ण बाजारपेठेत औषध फवारणी केली.तसेच प्रांताधिकारी,अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,,वैद्यकीय अधीक्षक वसंतराव जमधडे,खान,तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे,आदींनी भेट दिली व दक्षतेच्या सूचना दिल्या.सध्या एक प्रकारचे कोरोना नावाचे महायुद्ध असून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वत्र लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत.त्यासाठी शासकीय दवाखाने, डॉक्टर,पोलीस प्रशासन,आरोग्य अधिकारी,नगरपालिका,आदी कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी विशेष कार्य करीत आहेत.अशा परिस्थितीत कोठेही घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ध्वनिक्षेपकाव्दारे देण्यात  आल्या आहेत.त्यास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे..

शिर्डी / राहाता (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या असताना राहाता तालुक्यातील शिर्डी, राहाता, कोल्हार, बाभळेश्वर, पुणतांबासह प्रमुख महसूल भागात काही धान्य पूरवठादारांनी मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालविला आहे. संचारबंदी असताना ऐन संकटाच्या काळात जनतेची लूट करून वेठीस धरणे म्हणजे म्रुतांच्या टाळूवरचे लोणी खाणे... या पापात सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर अचानक अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ पाटील सदाफळ व समीरभाई बेग यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे नागरिकांना जमावबंदी, संचारबंदीला सामोरे जाणे अनिवार्य झाले आहे. हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे तसेच शेतीपूरक उद्योग क्षेत्रातील कामगार यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राहाता तालुक्यातील रोजगाराचे मूख्य 'केंद्र' म्हणून ओळखली जाणारी शिर्डी पूर्णपणे ठप्प झाली असल्याने तालुक्यातील हजारो कुटुंबाना मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाचे गणित सोडवणे अवघड झालेले आहे. यासाठी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत परंतु या सरकारी योजनांचा लाभ वंचितांना मिळण्यात अडचणी उभ्या करणारी काही जणांची साखळी उभी ठाकल्याने  पूरता बोजवारा उडाला आहे. यात काही रेशनपुरवठादार व किराणा माफियांनी संघटीतपणे नागरिकांना वेठीस धरले असल्याने संचारबंदी च्या या कडक काळात कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या  'लॉकडाऊन'चा गैरफायदा काही अपप्रवृत्ती घेताना दिसतात. घराच्या
बाहेर पडल्यास 'कोरोना' चा विषाणू आणि पोलिसांचा मार यामुळे अगोदरच जनता भयभीत झाली आहे.
बेकायदेशीरपणे अन्नधान्य, किराणा माल यांचा साठा करणारे व चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांची तत्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर 'लॉकडाऊन' अधिनियमात गुन्हे दाखल करावेत जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.
अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड, मनसेचे रामनाथ पाटील सदाफळ व समीरभाई बेग यांनी दिला आहे. याबाबतीतचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

शिर्डी । जितेश लोक चंदानी निवासी संपादक
 सध्या कोरोना मुळे सर्वत्र  लॉक डाऊन आहे, त्यामुळे संचार करणे आम व्यक्तीला बंद आहे, मात्र दवाखाना व अत्यावश्यक सेवा व दवाखान्यात जाणारे येणारे  व मेडिकल, दूध भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा  घेण्यासाठी जाणारे ,येणाऱ्यांना  सध्यातरी या लोकांमधून सवलत देण्यात आली आहे , मात्र असे असतानाही पोलीस मात्र योग्य कारण दाखवून ही जाणीवपूर्वक अशा व्यक्तींची अडचण करत आहे किंवा दंड करत आहे, त्यामुळे पोलिसांच्या अशा विनाकारण दंडेलशाही करणाऱ्या या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित पायबंद करणे गरजेचे असल्याची मागणी शिर्डी तील आम जनतेने केली आहे,
       सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व बंद आहे, शिर्डीत  सर्व बंद आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या  काळात सर्व जण घरात आहेत , कुणीही घराबाहेर उगाच पडत नाही ,प्रत्येक जण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता, काळजी घेत आहे, प्रत्येक जण आपापल्या घरात गेल्या अकरा दिवसांपासून बसलेला आहे ,मात्र अत्यावश्यक कामासाठी दवाखाना, भाजीपाला, मेडिकल,दूध आणण्यासाठी एखादा व्यक्ती अशा दुकानांमध्ये किंवा दवाखान्यात येत असतो, मात्र योग्य कारण सांगूनही त्यांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे, कारण असच एक व्यक्ति आपल्या कुटुंबातील व्यक्ती  येथील दवाखान्यात  ऍडमिट  असल्याने व डॉक्टरांनी घरून अतिमहत्त्वाची फाईल घेऊन येण्यास सांगितल्यामुळे त्यांची ही फाईल तो व्यक्ति  दवाखान्यात घेऊन चालले असताना त्यांना साईश कॉर्नर येथे पोलिसांनी अडवले ,त्यांनी पोलिसांना दवाखान्याची फाईल दाखवून अति महत्वाचे काम असल्यामुळे दवाखान्यात चाललो असल्याचे कारणही सांगितले, मात्र तेथील उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी  यांचे अजिबात ऐकून घेतले नाही, उलट नेहमीप्रमाणे अरेरावीची भाषा करत त्या  यांची अडवणूक केली, त्याने यांनी अनेकदा विनवणी व हात जोडूनही त्यांना पोलिसांनी लवकर सोडले नाही त्यानंतर ही माहिती शिर्डी चे पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे  यांना यांना आमच्या प्रतिनिधि ने भ्रमणध्वनीद्वारे कळल्यानंतर त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर सांगून नंतर त्यास  सोडण्यात आले, तोपर्यंत बराच वेळ त्यांचा  या पोलीस अधिकारी व पोलिसांनी येथे घेतला, त्यांना दवाखान्यात वेळेत जाणे गरजेचे असताना त्यांची पोलिसांनी अडवणूक केली, योग्य कारण दाखवून व फाइल दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नाही, त्यामुळे ते उशिरा दवाखान्यात पोहोचले, त्यामुळे त्यांच्या घरातील पण दवाखान्यात ऍडमिट असलेले रूग्ण त्यांना वेळेत फाईल नसल्यामुळे उपचार करता आला नाही त्यामुळे ते आणखी  सिरीयस झाले, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या व्यक्तीस  मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याला येथील साईश  कॉर्नरवर उपस्थित असणारे त्यावेळेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत,
   देशात सर्वत्र कोरोना चा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, नर्स ,आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक, सर्वजण आपापल्या परीने आपले कर्तव्य बजावत आहे, सर्वजण या मोठ्या संकटात माणुसकीचा मोठा हात दाखवत आहे ,अनेकजण मुख्यमंत्री, पंतप्रधान मदतनिधीसाठी हातभार लावत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने माणुसकी दाखवत आहे ,अशा परिस्थितीत पोलिसही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, मात्र काही पोलीस दररोजच्या प्रमाणे या संकटसमयी सुद्धा हे  काम मुजोर पणाने करत असल्याचे दिसून येत आहे,अश्या काही मुजोर पोलीसांमुळे चांगले काम करणाऱ्या 95% पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कडे पाहण्याचा आम जनतेचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या आव्हानाला साथ देत करोडो भारतीयांनी गेल्या आठवड्यात ताली आणि थाली वाजवली, या संकटात कर्तव्य वाजवत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस व सर्व कर्मचारी अशा व्यक्तींचा स्फूर्ती मिळावी व त्यांचे अभिनंदन व्हावे म्हणून ताली आणि थाली वाजवली, कालही  करोडो भारतीयांनी एकजूट दाखवत आपल्या दारात, गच्चीवर येऊन दिवे, मेणबत्त्या पेटवून आम्ही सर्व भारतीय एक आहोत, डॉक्टर ,पोलिस जवान सर्व जण आमच्यासाठी साठी प्रयत्न करत आहेत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत, हे सर्व भारतीय जाणून आहेत, त्यामुळेच  कर्तव्य बजावणाऱ्या सर्व लोकांना  आपल्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे  त्याद्वारे समजून आले,  यातून भारतीयांची माणुसकी  संपूर्ण जगाला दिसून आली, या संकट समयी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पाठीमागे भारतीयांची माणुसकी व त्यांचे आशीर्वाद , दुवा व मोठी अद्भुत शक्ती आपल्या पाठीमागे आहे हे दिसून आले, काल दिवे लावून माणुसकीही जपली, पोलिसही माणूस आहे, त्यांनाही कुटुंब आहे, सर्वजण सारखे नाही ,मात्र काही  5% मुजोर पोलिसांमुळे 95 टक्के कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडे  पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होतो आहे,तेव्हा यापुढे तरी दवाखान्यात किंवा मेडिकल आणण्यासाठी जाणारा येणाऱ्यांना, दूध ,भाजीपाला, किराणा घेणाऱ्यांना, अत्यावश्यक सेवा करणारे यांना पोलिसांनी त्यांचे योग्य कारण विचारून व ते सत्य असल्यास त्यांना त्वरित सोडून देणे गरजेचे आहे, विनाकारण त्यांनी योग्य कारण सांगूनही दंड किंवा तासन्तास अडवणूक करणे योग्य नाही, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा पोलिसांवर  कारवाई करावी, किंवा अशा प्रकारांना पायबंद घालावा, अशी मागणी शिर्डीकर व आम जनतेमधून आता होऊ लागली आहे,

संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 55 व्यक्ती,
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना
सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
 शिर्डी प्रतिनिधि - राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाठारे, हणमंतपूर व हसनापूर या गावातील 41 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 32 व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित 9 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये एकूण 55 व्यक्ती दाखल करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
            या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाठारे, हणमंतपूर व हसनापूर संबधित गावाच्या परिसरात गृहभेटीद्वारे शंभर टक्के तपासणी करुन नागरिकांकडून आवश्यक असलेल्या माहितीचे संकलन करण्यात येत आहे. गावांमध्ये जंतूनाशक द्रवाची फवारणी करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दूकानातून मासीक नियतन नियमित देण्यात येत असून अंत्योदय तसेच प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतीव्यकती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. वैद्यकीय औषधे, जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची वाहतूक सुरळीतपणे होत असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

            साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार प्रशासनाने कटेंनमेंट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये 13 पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तपासणीचे कार्य करत आहेत. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने पथकाला तपासणीसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- रस्त्यावर विनाकारण फिरणार्या व्यक्तीवर तसेच वाहन घेवुन फिरणार्यावर कडक कारवाई  करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक  श्री हरी बहीरट यांनी दिला आहे  या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामपूर  शहर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक बहीरट यांनी सांगितले कि  वारंवार सुचना देवुनही अनेक जण विनाकारण रस्त्यावर चकरा मारत आहेत अशा व्यक्तीवर सि सि टिव्ही तसेच ड्रोन कँमेर्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे  कोरोना हे देशावर आलेले फार मोठे संकट असुन या
संकटाचा सामना करण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागणार आहे कुणीही  रस्त्यावर विनाकारण  वाहन घेवुन फिरु नये असे सांगुन देखील  अनेक जण गंम्मत म्हणून बाहेर पडतात अनेक वेळा समजावुन सांगितले तरी देखील  काही लोक मुद्दामहुन घराबाहेर पडतात अशा लोकावर आता कँमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे कुणी विनाकारण वाहन घेवुन फिरत असेल तर त्याचेवर देखील  कारवाई करण्यात येणार असुन कुणीही गरज नसताना घराबाहेर पडू नका  असे अवाहनही  पोलीस निरीक्षक बहीरट यांनी केले आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर व परिसरात रात्री ९ वाजता ९ मिनिटे सर्वत्र दिवे लावण्यात आले जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्नी सौ स्नेहल नवले यांनी व त्यांच्या घरातील महीलांनी  भारत मातेचा नकाशा  काढुन फुलांची सजावट केली  दिव्याच्या प्रकाशात असलेला हा  नकाशा  लक्षवेधी ठरला                                  देशावर आलेले कोरोनाचे संकट दुर व्हावे या करीता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर गावात तसेच परिसरात दिवे लावुन सर्वांनी राष्ट्रीय  एकात्मतेचे दर्शन घडविले   जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन समितीचे माजी सभापती शरद नवले यांच्या  पत्नी सौ स्नेहल शरद नवले यांच्या संकल्पनेतुन रश्मी नवले आकांक्षा नवले सिद्धी नवले तेजल नवले साक्क्षी नवले यांनी  घरासमोर देशाचा नकाशा काढला तो नकाशा फुलांनी सजविला नकाशाच्या बाजुने सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या अंधारात पणत्यांच्या प्रकाशात दिसणार्या सुंदर नकाशा कौतुकाचा विषय ठरला  तसेच बेलापूरात घराघरात महीलांनी त्याच बरोबर पुरुषांनी देखील  घरातील लाईट बंद करुन दिवे लावले या दिव्याच्या प्रकाशात रस्ते उजळून निघाले होते एक प्रकारे दिवाळीच साजरी करण्यात आली होती.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget