शिर्डी । जितेश लोक चंदानी निवासी संपादक
सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे, त्यामुळे संचार करणे आम व्यक्तीला बंद आहे, मात्र दवाखाना व अत्यावश्यक सेवा व दवाखान्यात जाणारे येणारे व मेडिकल, दूध भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी जाणारे ,येणाऱ्यांना सध्यातरी या लोकांमधून सवलत देण्यात आली आहे , मात्र असे असतानाही पोलीस मात्र योग्य कारण दाखवून ही जाणीवपूर्वक अशा व्यक्तींची अडचण करत आहे किंवा दंड करत आहे, त्यामुळे पोलिसांच्या अशा विनाकारण दंडेलशाही करणाऱ्या या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित पायबंद करणे गरजेचे असल्याची मागणी शिर्डी तील आम जनतेने केली आहे,
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व बंद आहे, शिर्डीत सर्व बंद आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या काळात सर्व जण घरात आहेत , कुणीही घराबाहेर उगाच पडत नाही ,प्रत्येक जण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता, काळजी घेत आहे, प्रत्येक जण आपापल्या घरात गेल्या अकरा दिवसांपासून बसलेला आहे ,मात्र अत्यावश्यक कामासाठी दवाखाना, भाजीपाला, मेडिकल,दूध आणण्यासाठी एखादा व्यक्ती अशा दुकानांमध्ये किंवा दवाखान्यात येत असतो, मात्र योग्य कारण सांगूनही त्यांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे, कारण असच एक व्यक्ति आपल्या कुटुंबातील व्यक्ती येथील दवाखान्यात ऍडमिट असल्याने व डॉक्टरांनी घरून अतिमहत्त्वाची फाईल घेऊन येण्यास सांगितल्यामुळे त्यांची ही फाईल तो व्यक्ति दवाखान्यात घेऊन चालले असताना त्यांना साईश कॉर्नर येथे पोलिसांनी अडवले ,त्यांनी पोलिसांना दवाखान्याची फाईल दाखवून अति महत्वाचे काम असल्यामुळे दवाखान्यात चाललो असल्याचे कारणही सांगितले, मात्र तेथील उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी यांचे अजिबात ऐकून घेतले नाही, उलट नेहमीप्रमाणे अरेरावीची भाषा करत त्या यांची अडवणूक केली, त्याने यांनी अनेकदा विनवणी व हात जोडूनही त्यांना पोलिसांनी लवकर सोडले नाही त्यानंतर ही माहिती शिर्डी चे पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांना यांना आमच्या प्रतिनिधि ने भ्रमणध्वनीद्वारे कळल्यानंतर त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर सांगून नंतर त्यास सोडण्यात आले, तोपर्यंत बराच वेळ त्यांचा या पोलीस अधिकारी व पोलिसांनी येथे घेतला, त्यांना दवाखान्यात वेळेत जाणे गरजेचे असताना त्यांची पोलिसांनी अडवणूक केली, योग्य कारण दाखवून व फाइल दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नाही, त्यामुळे ते उशिरा दवाखान्यात पोहोचले, त्यामुळे त्यांच्या घरातील पण दवाखान्यात ऍडमिट असलेले रूग्ण त्यांना वेळेत फाईल नसल्यामुळे उपचार करता आला नाही त्यामुळे ते आणखी सिरीयस झाले, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या व्यक्तीस मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याला येथील साईश कॉर्नरवर उपस्थित असणारे त्यावेळेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत,
देशात सर्वत्र कोरोना चा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, नर्स ,आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक, सर्वजण आपापल्या परीने आपले कर्तव्य बजावत आहे, सर्वजण या मोठ्या संकटात माणुसकीचा मोठा हात दाखवत आहे ,अनेकजण मुख्यमंत्री, पंतप्रधान मदतनिधीसाठी हातभार लावत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने माणुसकी दाखवत आहे ,अशा परिस्थितीत पोलिसही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, मात्र काही पोलीस दररोजच्या प्रमाणे या संकटसमयी सुद्धा हे काम मुजोर पणाने करत असल्याचे दिसून येत आहे,अश्या काही मुजोर पोलीसांमुळे चांगले काम करणाऱ्या 95% पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कडे पाहण्याचा आम जनतेचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या आव्हानाला साथ देत करोडो भारतीयांनी गेल्या आठवड्यात ताली आणि थाली वाजवली, या संकटात कर्तव्य वाजवत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस व सर्व कर्मचारी अशा व्यक्तींचा स्फूर्ती मिळावी व त्यांचे अभिनंदन व्हावे म्हणून ताली आणि थाली वाजवली, कालही करोडो भारतीयांनी एकजूट दाखवत आपल्या दारात, गच्चीवर येऊन दिवे, मेणबत्त्या पेटवून आम्ही सर्व भारतीय एक आहोत, डॉक्टर ,पोलिस जवान सर्व जण आमच्यासाठी साठी प्रयत्न करत आहेत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत, हे सर्व भारतीय जाणून आहेत, त्यामुळेच कर्तव्य बजावणाऱ्या सर्व लोकांना आपल्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे त्याद्वारे समजून आले, यातून भारतीयांची माणुसकी संपूर्ण जगाला दिसून आली, या संकट समयी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पाठीमागे भारतीयांची माणुसकी व त्यांचे आशीर्वाद , दुवा व मोठी अद्भुत शक्ती आपल्या पाठीमागे आहे हे दिसून आले, काल दिवे लावून माणुसकीही जपली, पोलिसही माणूस आहे, त्यांनाही कुटुंब आहे, सर्वजण सारखे नाही ,मात्र काही 5% मुजोर पोलिसांमुळे 95 टक्के कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होतो आहे,तेव्हा यापुढे तरी दवाखान्यात किंवा मेडिकल आणण्यासाठी जाणारा येणाऱ्यांना, दूध ,भाजीपाला, किराणा घेणाऱ्यांना, अत्यावश्यक सेवा करणारे यांना पोलिसांनी त्यांचे योग्य कारण विचारून व ते सत्य असल्यास त्यांना त्वरित सोडून देणे गरजेचे आहे, विनाकारण त्यांनी योग्य कारण सांगूनही दंड किंवा तासन्तास अडवणूक करणे योग्य नाही, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा पोलिसांवर कारवाई करावी, किंवा अशा प्रकारांना पायबंद घालावा, अशी मागणी शिर्डीकर व आम जनतेमधून आता होऊ लागली आहे,
Post a Comment