शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर् येथे कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली असून त्यामुळे पुढील दक्षता घेण्यासाठी तातडीने पावले उचलून हरिगाव व उन्दिरगाव ग्रामपंचायत वतीने दि ६ एप्रिलपासून ९ एप्रिलपर्यंत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्ण हरिगाव उन्दिरगाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व रस्ते गावात येण्यासाठी व जाण्यासाठी गल्ली बोला नाकाबंदी करून बंद करण्यात आले आहेत.अशी माहिती सरपंच सुभाष बोधक उपसरपंच रमेश गायके,व दीपक नवगिरे यांनी दिली.गोवर्धन येथील व्यक्ती मतीमंद असून त्याला ४ तारखेला फीट आली.त्याला लोणी येथे नंतर विळद घाटात विखे फौन्डेशन व नंतर पुणे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.हा अहवाल मिळताच प्रांताधिकारी अनिल पवार,,तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने पुढील पावले उचलली आहेत.श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने औषध फवारणी मशीन दिल्यानंतर हरिगाव पूर्ण बाजारपेठेत औषध फवारणी केली.तसेच प्रांताधिकारी,अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,,वैद्यकीय अधीक्षक वसंतराव जमधडे,खान,तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे,आदींनी भेट दिली व दक्षतेच्या सूचना दिल्या.सध्या एक प्रकारचे कोरोना नावाचे महायुद्ध असून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वत्र लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत.त्यासाठी शासकीय दवाखाने, डॉक्टर,पोलीस प्रशासन,आरोग्य अधिकारी,नगरपालिका,आदी कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी विशेष कार्य करीत आहेत.अशा परिस्थितीत कोठेही घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ध्वनिक्षेपकाव्दारे देण्यात आल्या आहेत.त्यास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे..
Post a Comment