बेलापूर ( प्रतिनिधी )- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर व परिसरात रात्री ९ वाजता ९ मिनिटे सर्वत्र दिवे लावण्यात आले जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्नी सौ स्नेहल नवले यांनी व त्यांच्या घरातील महीलांनी भारत मातेचा नकाशा काढुन फुलांची सजावट केली दिव्याच्या प्रकाशात असलेला हा नकाशा लक्षवेधी ठरला देशावर आलेले कोरोनाचे संकट दुर व्हावे या करीता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर गावात तसेच परिसरात दिवे लावुन सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन समितीचे माजी सभापती शरद नवले यांच्या पत्नी सौ स्नेहल शरद नवले यांच्या संकल्पनेतुन रश्मी नवले आकांक्षा नवले सिद्धी नवले तेजल नवले साक्क्षी नवले यांनी घरासमोर देशाचा नकाशा काढला तो नकाशा फुलांनी सजविला नकाशाच्या बाजुने सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या अंधारात पणत्यांच्या प्रकाशात दिसणार्या सुंदर नकाशा कौतुकाचा विषय ठरला तसेच बेलापूरात घराघरात महीलांनी त्याच बरोबर पुरुषांनी देखील घरातील लाईट बंद करुन दिवे लावले या दिव्याच्या प्रकाशात रस्ते उजळून निघाले होते एक प्रकारे दिवाळीच साजरी करण्यात आली होती.
Post a Comment