Latest Post

शिर्डी- ।जितेश लोक चदांणी।  सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्वजण आपल्या घरात आहेत, कामधंदा दुकाने, व्यवहार , सर्व काही बंद आहे ,त्यामुळे पैशाची  प्रत्येक कुटुंबालाअडचण भासत असून अनेक जण बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येत असल्याने येथे आता मोठी गर्दी दिसू लागली आहे,
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात 14 एप्रिल 20 20 पर्यंत लॉक डाऊन आहे सर्व उद्योगधंदे ,व्यवसाय,कामे, दुकाने बंद आहेत ,आर्थिक उलाढाल बंद आहे ,परंतु दररोजच्या गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींना पैशाची गरज पडत आहे, अशावेळी आपले पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये लोकांची गर्दी आता होऊ लागली आहे, मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंस व इतर दक्षता घेतली जात नाही, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, म्हणून प्रत्येक खातेदारांना काही अडचण न होता सुरळीत आपले पैसे एटीएम मधून काढता यावेत किंवा बँकेने त्यांची  तशी व्यवस्था करावी ,अशी मागणी खातेदाराकडून सध्या होत आहे,
    अनेक ठिकाणी आता ई-पेमेंट ने आर्थिक व्यवहार होत आहे, मात्र अजूनही ग्रामीण भागात गावात खेड्यात नागरिकांना ई-पेमेंटने व्यवहार करताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे असे लोक बँकेत किंवा एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येतात, बँकेत गर्दी होऊ नये म्हणून एटीएम चा जादा वापर होत आहे, परंतु हळुहळू एटीएम वर सुद्धा गर्दी वाढू लागली आहे, त्यामुळे बँकेने आता आपल्या खातेदारांना पैसे मिळण्यासाठी योग्य अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे खातेदारांना मधुन बोलले जात आहे.

बेलापूर : संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून प्रत्येकाने स्वसंरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सार्थक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शकील बागवान यांनी म्हटले आहे.
उंबरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मोफत मास्क वाटप करण्यात आले त्याप्रसंगी बागवान बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मीना मंडोरे होत्या.यावेळी माजी सरपंच राजेंद्र ओहोळ,सरपंच चिमाजी राऊत,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पालकांना कोरोना  आजाराचा प्रसार कसा होतो हे स्पष्ट करून त्याचे गांभीर्य सांगितले. त्याचवेळी प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगितले. प्रत्येक नागरिकांसाठी त्यांचे घर हे सर्वाधिक सुरक्षित स्थळ आहे,अडचणीच्या प्रसंगी व महत्वाच्या कामाशिवाय घर न सोडण्याचे आवाहन शकील बागवान यांनी केले.दिवसातून दर दोन-तीन तासांनी हात साबणाने स्वच्छ धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरणे, किंवा स्वतःच्या बाहूवर असलेल्या कपड्यावर शिंकणे करावे, तोंड,नाक व कानाला सातत्याने हात न लावणे,गरजे प्रसंगी एकत्र आल्यानंतर एकमेकांमध्ये किमान तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन बागवान यांनी केले.
तसेच उपस्थित सर्वांच विद्यार्थ्यांना मास्क वाटप  करण्यात आले.यावेळी श्रीमती लता पालवे,मेघा साळवे, डॉ.रामकृष्ण जगताप,संघमित्रा रोकडे, संतोष जमदाडे आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना रोगाच्या साथीच्या  पार्श्वभूमीवर दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कज मध्ये तब्लिगी जमातच्या झालेल्या कार्यक्रमानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे कारण देऊन यानिमित्ताने हिंदू-मुस्लीम जातींमध्ये विसंवाद घडवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असून याबाबत पोलिसांनी योग्य ती पावले उचलण्याची मागणी विविध समाज घटकांकडून करण्यात येत आहे . तब्लिग जमाती च्या कार्यक्रमानंतर देशातील संपूर्ण मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्याने देशभरात तो एक चर्चेचा विषय झाला आहे . यालाच अनुसरून सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे फोटो परावर्तित करून वेगवेगळ्या कार्यक्रमाचा संबंध तब्लिग जमातीशी जोडून त्याप्रमाणे पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत . अशीच एक पोस्ट अहमदनगर मधील मोहन कृष्णाजी वाघ नावाच्या व्यक्तीने पसायदान आणि वि नि कोल्हे मित्रमंडळ या दोन ग्रुप वर वायरल केली . त्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असा मजकूर टाकलेला आहे .कोणीही आणि कितीही जवळचा मुस्लिम समाजातील माणूस तुमच्या संपर्कात असेल तर त्याला जवळ येऊ देऊ नका . वरील व्हिडीओ बघा . हा निजामुद्दीन मर्कज मधला आहे . असल्या प्रकारे यांची कोणतीही नमाज किंवा प्रार्थना करण्याची पद्धत नाही . हा प्रकार हवेमधील कोरोनाचे विषाणू स्वतःमध्ये लागण होण्यासाठी केला जातोय आणि हेच लोक उद्या आपल्या जवळ येऊन आपल्याला पण कोरोना बाधित करतील . हा त्यांचा नवीन जिहाद आहे . तेव्हा सर्वांना विनंती आहे की मुस्लीम लोकांपासून दूर राहा . त्यांच्या कसल्याही प्रकारे संपर्कात येऊ नका . त्यांच्याशी सामान खरेदी टाळा . असे त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे .असाच दुसरा एक प्रकार नांदेड येथील एका व्यक्तीने एका ग्रुपवर केला असून त्यामध्ये दिल्ली येथे झालेल्या तब्लिगी जमात च्या कार्यक्रमात नांदेड मधून शंभर लोक सहभागी झाले असून त्यातील काहींना कोरोणाची लागण झाली आहे . तेव्हा मुस्लिमांपासून दूर राहा . त्यांच्या जवळ जाऊ नका . त्यांच्याशी व्यवहार करू नका . अशा प्रकारच्या भाषेत या मेसेज पोस्ट केलेला आहे . दोन्ही पोस्टमध्ये दाखविलेले व्हिडिओ आणि फोटो हे तब्लिग जमातीशी संबंधित नाहीत हे विशेष .
सदर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून कोणत्या व्यक्ती अशाप्रकारे स्वतःचे मरण ओढवून  घेईल का ? असा प्रश्न विचारला जात आहे . सोशल मीडिया मध्ये अशा प्रकारच्या पोस्ट येत असल्याने समाजातील सामाजिक वातावरण दूषित होऊन हिंदू-मुस्लिम तेढ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे . नगर येथील व्यक्तीने टाकलेल्या पोस्ट बद्दल श्रीरामपुरात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुस्लिम समाजातील काही तरुणांनी सांगितले .
सध्या जिल्हा व पोलिस प्रशासन आजाराचा मुकाबला करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत असताना प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी अशाप्रकारे सामाजिक व जातीय तेढ वाढवून वातावरण खराब करण्याच्या प्रकाराचा मुशायरा कमिटी, उम्मती सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मिल्लत फाउंडेशन, परिवर्तन मंच, अहमदनगर जिल्हा ऊर्दू साहित्य परिषद आदी संघटनांनी निषेध केला असून समाजामध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण दूषित करणाऱ्या घटकांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .

नववीत शिकणाऱ्या हर्षिता जयंत गायकवाडने विविध पुरस्कारात बक्षीस मिळविलेली रक्कम केली कोरोना आपत्तीसाठी सुपूर्त...
शिर्डी/  राहाता - (प्रतिनिधी) राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय योजनांसाठी राहाता येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या हर्षिता जयंत गायकवाड हीने तिला आजवर मिळालेल्या विविध स्पर्धेतल्या बक्षिसांच्या रोख रकमेतील साडेतीन हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडे सुपूर्त केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जगभरात वाढत आहे. देश आणि महाराष्ट्र देखील या विळख्यात सापडला असल्याचे पडसाद दररोज टीव्ही,
वर्तमानपत्रे, समाजमाध्यामे यात उमटत आहेत. दररोज वाढणाऱ्या म्रुत्युंची संख्या, अत्यावश्यक सेवांचा तुटवडा, यातून गरीबांचे होणारे हाल यांनी हर्षिता चिंतीत झाली. आपण काही तरी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत पाठविण्याची इच्छा हर्षिता ने व्यक्त केली असता राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी कौतुक करीत तिच्या या सामाजिक बांधिलकीची मनस्वी दखल घेतली.
हर्षिता हिला आजवर विविध प्रकारच्या विभागीय, जिल्हास्तरीय, तालुका व आंतरशालेय, शालेय निबंध, थोर स्वातंत्र्य सैनिक कारभारी लक्ष्मण पाटील शिंदे वक्तृत्व स्पर्धा, मा. प्राचार्य स्व. भास्करराव माळवदे (सर) यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार, रयत विज्ञान परिषदे अंतर्गत आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धा, राष्ट्रीय ग्राहक दिनानमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, लायन्स क्लब ऑफ शिर्डीचा राज्यस्तरीय बालगुणवंत पुरस्कार, डॉ. दत्ता कानडे गुणवंत गौरव पुरस्कार रक्कम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार यात प्रमाणपत्रे, स्मृती चिन्हांसह रोख स्वरूपात बक्षिस रक्कम मिळालेली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांच्या जयंती निमित्त केलेल्या व्याख्यानांना अनेक संस्था, राजकीय पक्ष, शाळा यांनी देखील हर्षिता हिला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिलेली आहे. या बक्षिसांच्या रोख रकमेत तिचा वैयक्तिक खाऊच्या पैशातील ( पिगी बँक) रक्कम टाकून एकूण साडेतीन हजार रुपये राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या आपत्ती निवारणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'मुख्यमंत्री सहायता निधी' ला ही रक्कम तहसिलदार कुंदन हिरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, श्रुति जयंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सुभाष भोये उपस्थित होते.

शिर्डी। जितेश लोक चंदानी। निवासी संपादक- शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवाची आज श्री साईबाबांची व श्रीरामाची धार्मिक व पूजाअर्चा  करून काल्याचे कीर्तन व दहीहंडी फोडून गोपाळकाला करून उत्साहात सांगता झाली, शिर्डीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तीन दिवस श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला, मात्र लॉक डाऊन  मुळे हा उत्सव साध्या व गर्दी न करता विधीवत व धार्मिक पूजा-अर्चा करून करण्यात आला ,
आज श्रीरामनवमी उत्सवाचा सांगता दिन असल्यामुळे पहाटे साडेचार वाजता श्री साईंची काकड आरती होऊन नंतर मंगल स्नान करण्यात आले, त्यानंतर श्री साईंची शिर्डी माझे पंढरपुर आरती करण्यात आली ,आरतीनंतर श्री साई संस्थान चे प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे व त्यांच्या सुविद्य पत्नी तेव्हा शोभाताई गमे यांच्या हस्ते श्री साई समाधीची पाद्यपूजा करण्यात आली ,त्यानंतर श्री गुरुस्थान मंदिरात साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ, अंजली डोंगरे यांच्या हस्ते श्री रुद्रा अभिषेक पूजा करण्यात आली, त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री साई समाधी मंदिरात मंदिराचे पुजारी ह भ प उल्हास वाळुंजकर यांचे काल्याचे कीर्तन झाले ,त्यानंतर दहीहंडी फोडून गोपाळकाला करण्यात आला व या गोपाळ काल्या नंतर या तीन दिवस चाललेल्या श्रीरामनवमी उत्सवाची शिर्डीत सांगता झाली,
    कोरोना मुळे सध्या देशात मोठी आपत्तीजनक परिस्थिती असल्यामुळे व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊन असल्यामुळे यावर्षीची रामनवमी शिर्डीत  अगदी साध्या पद्धतीने व गर्दी न करता शांततेत व फक्त धार्मिक विधी, पूजाअर्चा, परंपरे  प्रमाणे करत  तीन दिवस चाललेला ह्या श्रीरामनवमी उत्सवाची आज उत्साहात सांगता झाली,
     दरवर्षी श्री रामनवमीला शिर्डीमध्ये सन 1911 पासून मोठा उत्सव भरतो ,श्री साईबाबा हयात असताना त्यांनी श्रीराम जन्मोत्सव परंपरा सुरू केली होती तेव्हापासून हा उत्सव आजतागायत मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम करुन साजरा होत आहे ,मात्र यावर्षी कोरोनाचे संकट व त्यामुळे देशभर असलेला लॉक डाऊन व याच काळात आलेली श्रीरामनवमी, त्यामुळे शिर्डीत श्रीरामनवमी उत्सव अगदी शांत शांत पण धर्मिक विधी परंपरेप्रमाणे करत श्री साई संस्थान ने तो साजरा केला, जरी शिर्डीत दरवर्षाप्रमाणे यावर्षी शेकडो साई पालख्या, हजारो पदयात्री लाखो साईभक्त साईरथ,वाहने मोठी गर्दी नव्हती, शिर्डी ठप्प होती, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद होते, मंदिरही साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते,  तरी  मंदिरात  श्री साई संस्थान तर्फे रामनवमी उत्सव गर्दी न करता व काेरोनाचा संसर्ग होऊ नये , म्हणून व लॉक डाऊन चे सर्व नियम पाळत विधीवत दरवर्षाप्रमाणे विधिवत पूजाअर्चा करून साजरा केला गेला ,पहिल्या दिवशी श्री साईंची व श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करून पहिल्या दिवशी श्री द्वारकामाई मंदिरात श्री साई सतचारित्रा चे अखंड पारायण प्रारंभ करण्यात आला, दिवसभर नित्याच्या पूजाअर्चा करण्यात आल्या ,श्री रामनवमीच्या मुख्य दिवशी गुरुवारी पहाटे श्री साईंची काकड आरती, मंगल स्नान त्यानंतर श्री द्वारका माई मंदिरातील अखंड श्री साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाची सांगता झाली, सांगता झाल्यानंतर श्री साई प्रतिमा व ग्रंथाची टाळ-मृदुंग च्या निनादात श्री द्वारका मैथुन मिरवणूक काढत श्री गुरुस्थान मार्गे  श्री समाधी मंदिरात आणण्यात आली, या मिरवणुकीत वीणा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोथी उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तसेच संस्थांचे अधिकारी अशोक आवटी व किचवे यांनी श्री साई प्रतिमा धरली होती, मोजके अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत ही मिरवणूक श्री साई समाधी मंदिरात आल्यानंतर पूजन करण्यात आले, त्यानंतर शिर्डी माझे पंढरपुर आरती होऊन श्री अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली, त्यानंतर लेंडी बागेतील शताब्दी ध्वज बदलण्यात आला, तसेच नवीन गव्हाच्या पोत्याची पूजा करून ते द्वारकामाईत ठेवण्यात आले, दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, मंदिरात पाळणा बांधून श्रीरामाची प्रतिमा ठेवून झोका देत श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला, आज  श्रीराम नवमीची सांगता होती, आज सकाळी पहाटे श्री साईंची काकड आरती व मंगल स्नान झाले, आज मंदिरात  दहीहंडी फोडून गोपाळकाला झाल्यानंतर  या श्रीरामनवमी उत्सवाची शिर्डीत  विधिवत व उत्साहात सांगता झाली , यावर्षी  श्रीराम नवमी उत्सव  साध्या पद्धतीने  व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक कार्यक्रम करत श्रीरामनवमी उत्सव साजरा झाला, यावर्षी शिर्डी ग्रामस्थांनीही  अगोदरच  रामनवमी उत्सवासाठी एक कमिटी बनवली होती व  श्रीरामनवमी उत्सवाच्या या तीन दिवसात येथे  तमाशा  ,सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्या,  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , मात्र लॉक डाऊन मुळे  सर्व कार्यक्रम व यात्रा  रद्द करण्यात आली होती , शिर्डीत  सर्वत्र  लॉक डाऊन मुळे शुकशुकाट पाहायला मिळत होता, काकड आरती मंगल स्नान शिर्डी माझे पंढरपुर पाद्यपूजा असे विविध कार्यक्रम नित्याप्रमाणे होऊन मंदिरात दहीहंडी बांधून गोपाळकाला झाल्यानंतर या उत्सवाची विधीवत व उत्साहात सांगता झाली  या रामनवमी उत्सव साठी शिर्डी ग्रामस्थ एक कमिटी स्थापन करून यापूर्वीच येते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु लॉक डाऊन मुळे सर्व कार्यक्रम तमाशे, कुस्त्या व यात्रा रद्द करण्यात आली होती ,शिर्डी श्रीराम नवमी उत्सव असतानाही लॉक डाऊन चे सर्व नियम पाळण्यात आले होते ,त्यामुळे शिर्डीत शुकशुकाट दिसत होता, परिसरातील लोकांनी आपापल्या घरात राहून श्री रामाचे ,श्री साईंचे प्रतिमेचे पूजन करून घरीच हा उत्सव साजरा केला ,अनेकांनी घरीच श्री साई स्तवन मंजिरी ,आरती करून  मनोभावे श्रीराम नवमी उत्सव साजरा केला, शिर्डीत रामनवमी उत्सवाला असणारी मोठी गर्दी, लाखो साईभक्त व साईनामाचा सर्वत्र जयजयकार ,अनेक दिंड्या सर्वत्र विद्युत रोषणाई ,मात्र या वेळी पाहायला मिळाली नाही, शिर्डीत सर्वत्र कोरोनाचीच चर्चा आपापसात सुरू होती,  सर्वत्र शुकशुकाट होता मात्र सर्वजण श्री साई बाबांवर श्रद्धा व सबुरी ठेवून आहेत, या कोरोनाच्या संकटापासून सर्वांना मुक्त कर असं मनोमन श्री साई चरणी साई भक्त प्रार्थना करत होते . 

सावळीविहीर । राजकुमार गडकरी।
कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन असताना व सर्व दुकाने बंद व नगर-मनमाड रस्त्यावर सामसूम असताना आज दुपारी अचानक राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे नगर-मनमाड महामार्गाच्या कडेला लक्ष्मीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाच्या पाठीमागील पश्चिम बाजूस अचानक तीन ठिकाणी पडलेल्या कचरा व विविध अडगळीच्या वस्तूंना आग लागली, हा परिसर बंद सोमय्या साखर कारखान्याच्या भिंतीलगत येतो, ही तीन ठिकाणी आग लागल्यानंतर व या आगीने  मोठा भडका घेतल्यानंतर व धुराचे  लोळ दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच ,सर्वत्र धावपळ उडाली, येथील ग्रामस्थांनी त्वरित शिर्डी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती दिली ,तदनंतर शिर्डी नगरपंचायतीचा अग्निशामक बंब त्वरित घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मोठ्या शर्तीने ही आग आटोक्यात आणली, या आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही,  ही आग येथील टारगट तरूणांनी किंवा समाजकंटकांनी पेटवून दिल्याची येथील ग्रामस्थात या वेळी चर्चा होती ,आग जर त्वरित आटोक्यात आली गेली नसती तर येथील ग्रामपंचायतीचे व्यापारी संकुल व व्यापारी गाळे, दुकाने यांना मोठा धोका झाला असता, मोठी आग लागली असती व मोठे नुकसान झाले असते, अशी चर्चा येथे सध्या होत आहे,
   सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे, सावळीविहीर येथेही ही लॉक डाऊन असून येथील सर्व दुकाने बंद आहेत, नगर मनमाड रस्ता सामसूम आहे, त्यामुळे या परिसरात कोणताही नागरिक नसल्याने कोणीतरी टारगेट किंवा समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असावे ,असे येथील जाणकार बोलत आहे, येथे  डाऊन मुळे सर्व बंद असले तरी  व पोलीस व्हॅन  येऊन गेली की परत  काही  टारगट  तरुण पुन्हा एकत्रित  जमा होतात  ,त्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे, सध्या देशात राज्यात कोरोना चे मोठे संकट निर्माण झाले आहे, मात्र काही टारगट मुले यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, अशा टांरगटावर कडक कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे.


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातुन गहु व तांदूळ याचे वाटप सुरु झाले असुन कार्डधारकांनी सोशल डीस्टनचा नियम पाळून  गर्दी  होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवाहन श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून लाँक डाऊन करण्यात आला असुन या काळात

स्वस्त धान्य दुकाने सतत उघडी ठेवावी  कार्डधारकांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे आदेश असुन तालुक्यात दुकानदार दुकान उघडी ठेवुन व्यवस्थित वाटप करतात की नाही याची पहाणी  उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक यांनी केली  श्रीरामपूर शहर व तालुक्यातील दुकानांना भेटी देवुन त्यांनी कार्डधारकांची आस्थेने चौकशी करुन घरात माणसे किती माल किती मिळतो
पैसे किती दिले या बाबत विचारपुस केली काही ठिकाणी  ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण व पाणी ठेवले नसल्याचे लक्षात आल्यावर पाणी व साबण ठेवण्याच्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या   काही ठिकाणी  सोशल डिस्टन पाळण्यात आला नसल्याचे अधिकार्यांच्या लाक्षात आले अनेक कार्डधारक दुचाकी वाहन घेवुन गहु व तांदूळ घेण्याकरीता आलेले होते अशा कार्डधारकांना सक्त ताकीद देण्यात आली पुन्हा दुचाकीवर माल नेण्याकरीता आले तर  कारवाई करण्याचा  ईशारा  पवार यांनी दिला  कार्डधारकांना एप्रिल या एकाच महीन्याचा माल वाटप केला जात असुन केंद्र शासनाच्या वतीने प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे शेवटच्या कार्डधारकांना माल दिला जाणार असुन स्वस्त धान्य दुकानातुन नियमीत माल घेणार्यांनाच पंतप्रधान योजनेचा पाच किलो मोफत तांदूळ  दिला जाणार आहे त्यामुळे कुणीही दुकानावर गर्दी करु नका आपली काळजी आपणच घ्या असे अवाहनही उपविभागीय अधिकारी अनिल पवार व ताहासीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget