राहात्याची शालेय विद्यार्थीनी हर्षिता जयंत गायकवाड हिची कोरोना आपत्ती निवारणासाठी मुख्यमंत्री साहायता निधीसाठी साडेतीन हजार रुपयांची मदत...

नववीत शिकणाऱ्या हर्षिता जयंत गायकवाडने विविध पुरस्कारात बक्षीस मिळविलेली रक्कम केली कोरोना आपत्तीसाठी सुपूर्त...
शिर्डी/  राहाता - (प्रतिनिधी) राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय योजनांसाठी राहाता येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या हर्षिता जयंत गायकवाड हीने तिला आजवर मिळालेल्या विविध स्पर्धेतल्या बक्षिसांच्या रोख रकमेतील साडेतीन हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडे सुपूर्त केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जगभरात वाढत आहे. देश आणि महाराष्ट्र देखील या विळख्यात सापडला असल्याचे पडसाद दररोज टीव्ही,
वर्तमानपत्रे, समाजमाध्यामे यात उमटत आहेत. दररोज वाढणाऱ्या म्रुत्युंची संख्या, अत्यावश्यक सेवांचा तुटवडा, यातून गरीबांचे होणारे हाल यांनी हर्षिता चिंतीत झाली. आपण काही तरी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत पाठविण्याची इच्छा हर्षिता ने व्यक्त केली असता राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी कौतुक करीत तिच्या या सामाजिक बांधिलकीची मनस्वी दखल घेतली.
हर्षिता हिला आजवर विविध प्रकारच्या विभागीय, जिल्हास्तरीय, तालुका व आंतरशालेय, शालेय निबंध, थोर स्वातंत्र्य सैनिक कारभारी लक्ष्मण पाटील शिंदे वक्तृत्व स्पर्धा, मा. प्राचार्य स्व. भास्करराव माळवदे (सर) यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार, रयत विज्ञान परिषदे अंतर्गत आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धा, राष्ट्रीय ग्राहक दिनानमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, लायन्स क्लब ऑफ शिर्डीचा राज्यस्तरीय बालगुणवंत पुरस्कार, डॉ. दत्ता कानडे गुणवंत गौरव पुरस्कार रक्कम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार यात प्रमाणपत्रे, स्मृती चिन्हांसह रोख स्वरूपात बक्षिस रक्कम मिळालेली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांच्या जयंती निमित्त केलेल्या व्याख्यानांना अनेक संस्था, राजकीय पक्ष, शाळा यांनी देखील हर्षिता हिला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिलेली आहे. या बक्षिसांच्या रोख रकमेत तिचा वैयक्तिक खाऊच्या पैशातील ( पिगी बँक) रक्कम टाकून एकूण साडेतीन हजार रुपये राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या आपत्ती निवारणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'मुख्यमंत्री सहायता निधी' ला ही रक्कम तहसिलदार कुंदन हिरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, श्रुति जयंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सुभाष भोये उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget