शिर्डी- ।जितेश लोक चदांणी। सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्वजण आपल्या घरात आहेत, कामधंदा दुकाने, व्यवहार , सर्व काही बंद आहे ,त्यामुळे पैशाची प्रत्येक कुटुंबालाअडचण भासत असून अनेक जण बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येत असल्याने येथे आता मोठी गर्दी दिसू लागली आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात 14 एप्रिल 20 20 पर्यंत लॉक डाऊन आहे सर्व उद्योगधंदे ,व्यवसाय,कामे, दुकाने बंद आहेत ,आर्थिक उलाढाल बंद आहे ,परंतु दररोजच्या गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींना पैशाची गरज पडत आहे, अशावेळी आपले पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये लोकांची गर्दी आता होऊ लागली आहे, मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टेंस व इतर दक्षता घेतली जात नाही, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, म्हणून प्रत्येक खातेदारांना काही अडचण न होता सुरळीत आपले पैसे एटीएम मधून काढता यावेत किंवा बँकेने त्यांची तशी व्यवस्था करावी ,अशी मागणी खातेदाराकडून सध्या होत आहे,
अनेक ठिकाणी आता ई-पेमेंट ने आर्थिक व्यवहार होत आहे, मात्र अजूनही ग्रामीण भागात गावात खेड्यात नागरिकांना ई-पेमेंटने व्यवहार करताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे असे लोक बँकेत किंवा एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येतात, बँकेत गर्दी होऊ नये म्हणून एटीएम चा जादा वापर होत आहे, परंतु हळुहळू एटीएम वर सुद्धा गर्दी वाढू लागली आहे, त्यामुळे बँकेने आता आपल्या खातेदारांना पैसे मिळण्यासाठी योग्य अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे खातेदारांना मधुन बोलले जात आहे.
Post a Comment