सावळीविहिर।। राजेंद्र गडकरी।। साथीचे रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या गावागावात जंत नाशक फवारणी सुरू आहे ,त्याच धर्तीवर सावळीविहीर येथे पुन्हा एकदा गावात जंतनाशक फवारणी करण्यात येत आहे,
येथील सर्व सार्वजनिक ठिकाणा प्रमाणे शाळा व विशेष म्हणजे सर्व मंदिरे व सभामंडप परिसरातही ही जंतनाशक फवारणी करण्यात आली आहे, काही दिवसांपूर्वी येथे ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी करण्यात आली होती व आता प्रवरा तर्फे ही फवारणी करण्यात येत असून त्यासाठी सावळीविहीर येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे,
। सध्या देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे ,त्यामुळे देशभर मोठे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण सापडत आहे, शहरापासून ग्रामीण भागापर्यंत हे लोन पसरत चालले आहे ,त्यामुळे आता ग्रामीण भागातही मोठी दक्षता घेण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून गावागावात जंतनाशक फवारणी करण्यात येत आहे, सावळीविहीर येथेही ही गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीमार्फत जंतनाशक फवारणी करण्यात आली होती ,आता प्रवरा तर्फे ही दुसऱ्यादां गावात फवारणी होत आहे, या जंतनाशक फवारणीसाठी ग्रामपंचायत चे सरपंच सौ, रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच सौ वृषाली ओमेश जपे , सर्व सदस्य, तसेच या जनता फवारणीसाठी चंद्रकांत जपे ,विनोद भोसले व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक खर्डे यांचे मोठे सहकार्य लाभत आहे,
हि जंतनाशक फवारणी सावळीविहीर गावा प्रमाणे सावळीविहीर वाडी ,लक्ष्मीवाडी, कारवाडी व वस्त्यांवर तसेच खाणीवरील वसाहत ,इंदिरानगर, लक्ष्मी नगर वसाहत मध्ये गल्लोगल्ली जाऊन करण्यात यावी, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.
Post a Comment