जनसेवा पतसंस्थेकडून पंतप्रधान निधीसाठी पाच लाखांची मदत ; संस्थेला ६७ लाखांचा नफा बेलापूर(वार्ताहर)* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील अग्रगण्य जनसेवा पतसंस्थेच्या वतीने "पंतप्रधान केअर फंडात" पाच लाख रुपयांचा निधी जमा केला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांनी दिली.
समाजाचा पैसा हा समाज आणि समृद्ध राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात यावा या उदात्त हेतूने आजवर संस्थेने सतत सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी मदतीचा हात देत पुढाकार घेतला आहे. यावेळीही ही परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे.याचा संस्थेला आनंद व अभिमान आहे,असेही त्यांनी लुंकड यांनी सांगितले.
येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचा पाच लाखांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष सुवालाल लुंकड व उपाध्यक्ष सुभाषचंद्र राठी यांच्या हस्ते शाखाधिकारी विजयकुमार मंडल, लेखाधिकारी किशोर कुलकर्णी व रोखपाल दत्तात्रय काशीद यांच्याकडे पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले व प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान केअर फंड खात्यात जमा करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक प्रकाशचंद्र कोठारी, प्रवीण लुंकड,अमित लुंकड, योगेश कोठारी, दीपक वैष्णव, संचालिका सौ. नंदाताई खंडागळे, सौ. सुवर्णा मुंडलिक,सल्लागार सुरेशचंद्र बाठिया, सचिन कोठारी, बन्सीकाका तागड ,सम्यक लुंकड ,व्यवस्थापक राहुल दायमा, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत गोविंद देव गिरीजी यांच्या उपदेशानुसार सतत सामाजिक व राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असलेल्या गावपातळीवर काम करणाऱ्या जनसेवा पतसंस्थेचा आदर्श घेऊन सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील अन्य संस्थांनीही या राष्ट्रीय आपत्तीत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांनी केले आहे.
संस्थेला गत आर्थिक वर्षी ६७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असुन २२ कोटींच्या वर ठेवी ,१२ कोटींचे कर्जवितरण आणि १५ कोटी७३ लाखांची संस्थेने गुंतवणूक केली आहे
तसेच ४४ लाख ३७ हजारांची एन. पी. ए.तरतुद केली आहे.संस्थेने पारदर्शी कार्यातून प्रगतीचा आलेख यंदाही कायम राखला आहे.
Post a Comment