कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन असताना व सर्व दुकाने बंद व नगर-मनमाड रस्त्यावर सामसूम असताना आज दुपारी अचानक राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे नगर-मनमाड महामार्गाच्या कडेला लक्ष्मीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाच्या पाठीमागील पश्चिम बाजूस अचानक तीन ठिकाणी पडलेल्या कचरा व विविध अडगळीच्या वस्तूंना आग लागली, हा परिसर बंद सोमय्या साखर कारखान्याच्या भिंतीलगत येतो, ही तीन ठिकाणी आग लागल्यानंतर व या आगीने मोठा भडका घेतल्यानंतर व धुराचे लोळ दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच ,सर्वत्र धावपळ उडाली, येथील ग्रामस्थांनी त्वरित शिर्डी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती दिली ,तदनंतर शिर्डी नगरपंचायतीचा अग्निशामक बंब त्वरित घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मोठ्या शर्तीने ही आग आटोक्यात आणली, या आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही, ही आग येथील टारगट तरूणांनी किंवा समाजकंटकांनी पेटवून दिल्याची येथील ग्रामस्थात या वेळी चर्चा होती ,आग जर त्वरित आटोक्यात आली गेली नसती तर येथील ग्रामपंचायतीचे व्यापारी संकुल व व्यापारी गाळे, दुकाने यांना मोठा धोका झाला असता, मोठी आग लागली असती व मोठे नुकसान झाले असते, अशी चर्चा येथे सध्या होत आहे,
सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे, सावळीविहीर येथेही ही लॉक डाऊन असून येथील सर्व दुकाने बंद आहेत, नगर मनमाड रस्ता सामसूम आहे, त्यामुळे या परिसरात कोणताही नागरिक नसल्याने कोणीतरी टारगेट किंवा समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असावे ,असे येथील जाणकार बोलत आहे, येथे डाऊन मुळे सर्व बंद असले तरी व पोलीस व्हॅन येऊन गेली की परत काही टारगट तरुण पुन्हा एकत्रित जमा होतात ,त्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे, सध्या देशात राज्यात कोरोना चे मोठे संकट निर्माण झाले आहे, मात्र काही टारगट मुले यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, अशा टांरगटावर कडक कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे.
Post a Comment