श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातुन गहु व तांदूळ याचे वाटप सुरु झाले असुन कार्डधारकांनी सोशल डीस्टनचा नियम पाळून गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवाहन श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून लाँक डाऊन करण्यात आला असुन या काळात
स्वस्त धान्य दुकाने सतत उघडी ठेवावी कार्डधारकांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे आदेश असुन तालुक्यात दुकानदार दुकान उघडी ठेवुन व्यवस्थित वाटप करतात की नाही याची पहाणी उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक यांनी केली श्रीरामपूर शहर व तालुक्यातील दुकानांना भेटी देवुन त्यांनी कार्डधारकांची आस्थेने चौकशी करुन घरात माणसे किती माल किती मिळतो
पैसे किती दिले या बाबत विचारपुस केली काही ठिकाणी ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण व पाणी ठेवले नसल्याचे लक्षात आल्यावर पाणी व साबण ठेवण्याच्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या काही ठिकाणी सोशल डिस्टन पाळण्यात आला नसल्याचे अधिकार्यांच्या लाक्षात आले अनेक कार्डधारक दुचाकी वाहन घेवुन गहु व तांदूळ घेण्याकरीता आलेले होते अशा कार्डधारकांना सक्त ताकीद देण्यात आली पुन्हा दुचाकीवर माल नेण्याकरीता आले तर कारवाई करण्याचा ईशारा पवार यांनी दिला कार्डधारकांना एप्रिल या एकाच महीन्याचा माल वाटप केला जात असुन केंद्र शासनाच्या वतीने प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे शेवटच्या कार्डधारकांना माल दिला जाणार असुन स्वस्त धान्य दुकानातुन नियमीत माल घेणार्यांनाच पंतप्रधान योजनेचा पाच किलो मोफत तांदूळ दिला जाणार आहे त्यामुळे कुणीही दुकानावर गर्दी करु नका आपली काळजी आपणच घ्या असे अवाहनही उपविभागीय अधिकारी अनिल पवार व ताहासीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.
Post a Comment