Latest Post

सावळीविहीर । राजकुमार गडकरी।
कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन असताना व सर्व दुकाने बंद व नगर-मनमाड रस्त्यावर सामसूम असताना आज दुपारी अचानक राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे नगर-मनमाड महामार्गाच्या कडेला लक्ष्मीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाच्या पाठीमागील पश्चिम बाजूस अचानक तीन ठिकाणी पडलेल्या कचरा व विविध अडगळीच्या वस्तूंना आग लागली, हा परिसर बंद सोमय्या साखर कारखान्याच्या भिंतीलगत येतो, ही तीन ठिकाणी आग लागल्यानंतर व या आगीने  मोठा भडका घेतल्यानंतर व धुराचे  लोळ दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच ,सर्वत्र धावपळ उडाली, येथील ग्रामस्थांनी त्वरित शिर्डी नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती दिली ,तदनंतर शिर्डी नगरपंचायतीचा अग्निशामक बंब त्वरित घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मोठ्या शर्तीने ही आग आटोक्यात आणली, या आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही,  ही आग येथील टारगट तरूणांनी किंवा समाजकंटकांनी पेटवून दिल्याची येथील ग्रामस्थात या वेळी चर्चा होती ,आग जर त्वरित आटोक्यात आली गेली नसती तर येथील ग्रामपंचायतीचे व्यापारी संकुल व व्यापारी गाळे, दुकाने यांना मोठा धोका झाला असता, मोठी आग लागली असती व मोठे नुकसान झाले असते, अशी चर्चा येथे सध्या होत आहे,
   सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे, सावळीविहीर येथेही ही लॉक डाऊन असून येथील सर्व दुकाने बंद आहेत, नगर मनमाड रस्ता सामसूम आहे, त्यामुळे या परिसरात कोणताही नागरिक नसल्याने कोणीतरी टारगेट किंवा समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असावे ,असे येथील जाणकार बोलत आहे, येथे  डाऊन मुळे सर्व बंद असले तरी  व पोलीस व्हॅन  येऊन गेली की परत  काही  टारगट  तरुण पुन्हा एकत्रित  जमा होतात  ,त्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे, सध्या देशात राज्यात कोरोना चे मोठे संकट निर्माण झाले आहे, मात्र काही टारगट मुले यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, अशा टांरगटावर कडक कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे.


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातुन गहु व तांदूळ याचे वाटप सुरु झाले असुन कार्डधारकांनी सोशल डीस्टनचा नियम पाळून  गर्दी  होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवाहन श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून लाँक डाऊन करण्यात आला असुन या काळात

स्वस्त धान्य दुकाने सतत उघडी ठेवावी  कार्डधारकांना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे आदेश असुन तालुक्यात दुकानदार दुकान उघडी ठेवुन व्यवस्थित वाटप करतात की नाही याची पहाणी  उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक यांनी केली  श्रीरामपूर शहर व तालुक्यातील दुकानांना भेटी देवुन त्यांनी कार्डधारकांची आस्थेने चौकशी करुन घरात माणसे किती माल किती मिळतो
पैसे किती दिले या बाबत विचारपुस केली काही ठिकाणी  ग्राहाकांना हात धुण्यासाठी साबण व पाणी ठेवले नसल्याचे लक्षात आल्यावर पाणी व साबण ठेवण्याच्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या   काही ठिकाणी  सोशल डिस्टन पाळण्यात आला नसल्याचे अधिकार्यांच्या लाक्षात आले अनेक कार्डधारक दुचाकी वाहन घेवुन गहु व तांदूळ घेण्याकरीता आलेले होते अशा कार्डधारकांना सक्त ताकीद देण्यात आली पुन्हा दुचाकीवर माल नेण्याकरीता आले तर  कारवाई करण्याचा  ईशारा  पवार यांनी दिला  कार्डधारकांना एप्रिल या एकाच महीन्याचा माल वाटप केला जात असुन केंद्र शासनाच्या वतीने प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे शेवटच्या कार्डधारकांना माल दिला जाणार असुन स्वस्त धान्य दुकानातुन नियमीत माल घेणार्यांनाच पंतप्रधान योजनेचा पाच किलो मोफत तांदूळ  दिला जाणार आहे त्यामुळे कुणीही दुकानावर गर्दी करु नका आपली काळजी आपणच घ्या असे अवाहनही उपविभागीय अधिकारी अनिल पवार व ताहासीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

दिनांक ०२/०४/२०२० रोजी पो.नि.दिलीप पवार स्था.ग.शा.अहमदनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीचे
आधारे पथकातील सफी सोन्याबापु नानेकर,पोहेकॉ/मनोज गोसावी ,विजयकुमार बेठेकर,आण्णा पवार, रवींद्र कडीले,संतोष लोहे,सागर ससाणे,राहुल सोळंके,जालींदर माने ,चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून श्रीरामपुर येथे जावुन खंडाळा,नांदुर,श्रीरामपुर शहर परीसरात छापे टाकुण एकुण ४,०३,000/- रु.किंमतीचे कच्चे रसायन तयार गावठी दारु जप्त करुन एकुण १३ आरोपीविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।२५१/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(१),(फ)प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ८०००/-रु. किं.ची गावठी दारु । आरोपीचे नांव :- १.सुनिता विठठल फुलारी वय-४० रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर २) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ा २५२/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ७५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. मंदा जगन फुलारी वय-५० रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर क) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५३/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :-५०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. मंदा अशोक गायकवाड वय-४५ रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर ४)श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५४/२०२०, म.प्रा.का.कलम६५(इ),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ९०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. सूनिल आण्णा गवळी वय-३९ रा.वॉर्ड नं.२ श्रीरामपुर ५) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५५/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ४०००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. पप्पु जंगु पवार वय-३० रा.सुतगिरणी फाटा ,श्रीरामपुर 1) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५६/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(),(फ)प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ११५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. उषा प्रभाकर काळे वय-४५ रा.कदमवस्ती,भैरवनाथनगर श्रीरामपुर ७) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५७/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :-२०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१, इंदुबाई विष्णु जाधव वय-५७ रा.सरस्वती कॉलनी वॉर्ड नं.७ श्रीरामपुर  ८) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. १ २५८/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं.ची गावठी दारु । आरोपीचे नांव :-१. विजुबाई तुकाराम जाधव वय-७० रा.सरस्वती कॉलनी वॉर्ड नं.७ श्रीरामपुर ९) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५९/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ९५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. विमल शांताराम जाधव वय-४० रा.नांदुर बु I I ता.राहाता जि.अहमदनगर १०) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २६०/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-३६५००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. संदीप भाउसाहेब जाधव वय-३६ रा.नांदुर बु I ता.राहाता ११) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २६१/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-२,५०,०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. राजेश ज्ञानदेव महाजन वय-२५ रा.खंडाळा ता.श्रीरामपुर १२) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २६२/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-५५,०००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. संतोष भास्कर गि-हे रा.राजुरी ता.राहाता
१३) श्रीरामपुर ता. पो.स्टे. गुरनं. ।। ९३/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. रवी अरुण माळी वय-२४ रा.पढेगांव ता.श्रीरामपुर सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे/कांबळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. राहुल मदने साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपुर भाग, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.


सावळीविहीर। राजेंद्र गडकरी 
 सध्या देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे, या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशपातळीवर शासन मोठे प्रयत्न करत असून देशात सर्वत्र 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,अशातच आज रामनवमी आल्याने शिर्डी परिसरातील गावातही रामनवमी जन्मोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम ठेवून साजरा करण्या ऐवजी प्रत्येकाने घरातच श्रीरामनवमी जन्मोत्सव दुपारी ठीक बारा वाजता आपल्या कुटुंबासमवेत आनंद साजरा केला, काही ठिकाणी मंदिरातील पुजाऱ्यांनी श्रीरामाची पूजा करून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, सावळीविहीर येथे कोरोना संदर्भात सर्व दक्षता घेत व लॉक डाऊन चे नियम पाळत श्रीराम मंदिरात येथील पुजारी सौ बेबीताई सोनवणे व कैलास राव जपे,भजनी मंडळातील  कामठे ताई , जपे ताई ,फाजगेताई, यांनी मंदिरात येऊन  पाळणा बांधून पाळण्याला हार पुष्पहार घालून सजावट करून पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून दुपारी ठीक बारा वाजता पाळणागीत श्रीरामाचे गीते व आरती करून हा श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, दरवर्षी मंदिरात मोठी गर्दी असते ,मात्र यावेळी श्रीराम मंदिरात कोणी आले नव्हते, या दोन तीन महिलांनी लॉक डाऊन चे नियम पाळतात मास्क लावून व संनेटायझर चा वापर करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, तसेच घराघरातही श्रीराम व श्री साईबाबांच्या प्रतिमेचे आज श्रीराम नवमी निमित्त पूजन करण्यात आले, आज  श्रीराम नवमी व गुरुवार  असल्याने  दुग्धशर्करा योग  जुळून आला होता, अनेक ठिकाणी रामजन्मोत्सवा नंतर खडीसाखर,गुळ साखर तर काही ठिकाणी पुरणपोळ्यांचा नैवेद्य घरातील श्री साई प्रतिमेला व श्री रामाच्या प्रतिमेला देण्यात आला, अनेक घरात आज रामनवमी निमित्त श्री साई स्तवन मंजिरी वाचन करण्यात आले, व श्री राम व श्री साईबाबांना या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी शक्ती दे। जगाला ,देशाला या कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचे साकडे घातले, जरी लॉक डाऊन मुळे मंदिरात कोणी जाताना दिसत नव्हते,पण अनेकांनी आपापल्या घरात राहून मनोभावे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या आनंदात व आपल्या कुटुंबासमवेत उत्साहात साजरा केला, आज सावळीविहीर चा आठवडे बाजार व श्रीरामनवमी असतानाही लॉक डाऊन मुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.

शिर्डी ।जितेश लोकचंदानी निवासी संपादक-राहाता येथील रहदारीच्या ठिकाणी सदाफळ मार्केटच्या मागे सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून मद्य रात्री ते चोरट्यानि शटर उचकाउन फोडले, या दुकानांमध्ये असलेली 137 बॉक्स देशी दारू लम्पास केली. ह्या दुकाना पासुन पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असतांना चोरांनी डल्ला मारून एक प्रकारे पोलीसाना आव्हान दिले असल्याचे नागरिकात चर्चा सुरू आहे.भोताडे यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान लॉक डाउन मुळे
बंद असतांना मद्य रात्रि कोणीही नसताना चोरी झाल्याने राहाता येथील व्यवसायिकांनी  धास्ती घेतली आहे, भर रस्त्यावर असे प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात घबराटी चे वातावरण पसरले आहे आमच्या प्रतिनीधीने राहाता पोलिस स्टेशनला संपर्क केले असता पोलीसांनि सान्गितले की अजुन पंचनामा सुरू आहे, सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र देश पातळीवर मोठे प्रयत्न होत आहे ,राज्यातही कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे, सर्वत्र लॉक डाऊन आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, मात्र या बंदमुळे चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, संचारबंदी असतानाही ही अनेक टारगट व चोरी करणारे रात्री इकडून तिकडे फिरत असतात अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, सर्वसामान्य माणसे लॉकडाऊनच्या काळात  घरात आहेत, त्यामुळे दुकानात ना मालक ,ना दुकानांवर नजर ठेवण्यासाठी रात्रीचे असणारे वॉचमेन आहे, संचार बंदीमुळे कोणी रात्रीचे फिरकत नाही, त्याचाच परिणाम अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आले आहेत, त्यांनी चार्ज घेताच त्यांचे स्वागत अशा पद्धतीने राहत्यात देशी दारूचे दुकान फोडून झाले आहे, त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे शिर्डी व परिसरात लॉकडाऊन मुळे सर्व काही ठप्प आहे, साईभक्त येत नाहीत ,चोर्‍या, पाकीटमारी  करण्यास मिळत नाही ,त्यामुळे पाकीटमारी, चोऱ्या करणारे आता यांना पैसे, दारू मिळेनाशी झाली आहे, कारण लॉक डाऊन मुळे सर्वत्र परमिट रूम , वाईन्स, देशी दारूची दुकाने बंद आहेत ,परंतु अनधिकृत व अवैध दारूधंदे अनेक ठिकाणी आजही चालू आहेत ,अशा अवैध दारू धंद्यांना दारू पुरवणे यासाठी या चोरांनी दुकान फोडले असावे, अशी नागरिकांत चर्चा आहे, त्यामुळे अधिकृत दुकाने परमीटरूम देशी दारूचे, वाईन्स बंद असताना राहता तालुक्यात, शिर्डी परिसरात आजही अनधिकृत असे  दारू अड्डे  सुरूच आहेत, त्यांचा पहिला बंदोबस्त करणेही गरजेचे आहे, या लॉकडाऊन काळात राहता शिर्डी परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.


शिर्डी प्रतिनिधि -  संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात सुरक्षाच्या कारनाने लॉक डाउन करण्याचे आदेश असतांना शिर्डीत गेट नंबर चार जवड असलेले डॉक्टर जानी यांच्या मालकीचे  होटेल दीपक मध्ये रूम भरलेले असल्याची मिळताच वाहतूक शाखे पोलिस निरीक्षक गोकावे  यांनि छापा टाकुण कलम 188 नुसार  कारवाई केली आहे तसेच कणकुरी रोड लगत असलेल्या होटेल राजकमल येथेहि छापा टाकला असता तेथेहि रूम भरल्याचे समजतास होटेल मालक रोहित थावाणी याच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे व ह्या पुढे  लॉक डाउन असे पर्यंत व जो पर्यंत पुढिल आदेश येई पर्यंत जो कोनी नियमाचे पालन करनार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येइल असे पोलिस निरीक्षक गोकावे यांनि आमच्या प्रतिनिधि बोलतांना साण्गीतले.

शिर्डी ।।जितेश लोक चंदानी।। देशाच, राज्यात सर्वत्र कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे ,त्यामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन आहे ,सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत, अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणारा शालेय पोषण आहार हा प्रत्येक शाळेत तसाच पडून आहे, त्यामुळे हा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकां मार्फत वाटण्याचे जिल्हा परिषदेने ठरवून तसा निर्णय घेतला असून प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना पालकां मार्फत शालेय पोषण आहार वाटप करण्यात येत आहे,
        राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेत    विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून  त्यांना  हे शालेय पोषण  आहाराचे साहित्य  देण्यात आले ,लॉकडाऊन चे सर्व काटेकोर  नियम पाळत हे वाटप करण्यात आले,  यावेळी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 164 विद्यार्थ्यांना पालकामार्फत शालेय पोषण आहार शिल्लक धान्यसाठा वाटप करण्यात आला,
त्यात प्रामुख्याने तांदूळ ,हरभरा, मठ,तूरडाळ, मुगडाळ, वाटले 
यावेळी पंचायत  समिती राहाताचे उपसभापती श्री ओमेश पा जपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब पा जपे,सरपंच रुपाली संतोष पा आगलावे, शाळा व्यवस्थापन समिती अद्यक्ष दिनेश आरणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कापसे,नितीन आगलावे, रवी कापसे,आनंद जपे,गणेश आगलावे ,प्रमोद वाणी पत्रकार राजेंद्र गडकरी,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला चौधरी उपस्थित होत्या,
राज्यात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले आहे ,त्यामुळे येथे यावेळी संचारबंदी चे तंतोतंत पालन करण्यात आले, शालेय पोषण आहारा चे धान्य घेण्यासाठी आलेले सर्व पालकांनी मास्क बांधून व दूर दूर अंतरावर उभे राहून नियमांचे काटेकोर पालन केले, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळा ठरवून देऊन शाळेत गर्दी न करण्याचीही अगोदर सूचना देण्यात आल्या होत्या,
या वाटप कार्यक्रमात कोरनोच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरातच  राहावे,  अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास  मास्क वापरावे , साबणाने हात स्वच्छ धुवावेत  आपल्या  पाल्यांना  जपावे ,दक्षता घ्यावी , अशा  विविध  सूचना व पालकांना कोरोना विषयी काळजी घेण्याची गरज व उपाययोजना श्री दत्ता गायकवाड यांनी सांगितली, तर इतर मार्गदर्शक सूचना श्री पंकज दर्शने यांनी दिल्या,
हे शालेय पोषण आहार धान्य  वाटप करण्यासाठी श्रीमती, चवाले मॅडम ,मंद्रे मॅडम, गोर्डे मॅडम, संगीता याईस,सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले,

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget