शिर्डी ।।जितेश लोक चंदानी।। देशाच, राज्यात सर्वत्र कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे ,त्यामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन आहे ,सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत, अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणारा शालेय पोषण आहार हा प्रत्येक शाळेत तसाच पडून आहे, त्यामुळे हा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकां मार्फत वाटण्याचे जिल्हा परिषदेने ठरवून तसा निर्णय घेतला असून प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना पालकां मार्फत शालेय पोषण आहार वाटप करण्यात येत आहे,
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना हे शालेय पोषण आहाराचे साहित्य देण्यात आले ,लॉकडाऊन चे सर्व काटेकोर नियम पाळत हे वाटप करण्यात आले, यावेळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 164 विद्यार्थ्यांना पालकामार्फत शालेय पोषण आहार शिल्लक धान्यसाठा वाटप करण्यात आला,
त्यात प्रामुख्याने तांदूळ ,हरभरा, मठ,तूरडाळ, मुगडाळ, वाटले
यावेळी पंचायत समिती राहाताचे उपसभापती श्री ओमेश पा जपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब पा जपे,सरपंच रुपाली संतोष पा आगलावे, शाळा व्यवस्थापन समिती अद्यक्ष दिनेश आरणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कापसे,नितीन आगलावे, रवी कापसे,आनंद जपे,गणेश आगलावे ,प्रमोद वाणी पत्रकार राजेंद्र गडकरी,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला चौधरी उपस्थित होत्या,
राज्यात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले आहे ,त्यामुळे येथे यावेळी संचारबंदी चे तंतोतंत पालन करण्यात आले, शालेय पोषण आहारा चे धान्य घेण्यासाठी आलेले सर्व पालकांनी मास्क बांधून व दूर दूर अंतरावर उभे राहून नियमांचे काटेकोर पालन केले, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळा ठरवून देऊन शाळेत गर्दी न करण्याचीही अगोदर सूचना देण्यात आल्या होत्या,
या वाटप कार्यक्रमात कोरनोच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरातच राहावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास मास्क वापरावे , साबणाने हात स्वच्छ धुवावेत आपल्या पाल्यांना जपावे ,दक्षता घ्यावी , अशा विविध सूचना व पालकांना कोरोना विषयी काळजी घेण्याची गरज व उपाययोजना श्री दत्ता गायकवाड यांनी सांगितली, तर इतर मार्गदर्शक सूचना श्री पंकज दर्शने यांनी दिल्या,
हे शालेय पोषण आहार धान्य वाटप करण्यासाठी श्रीमती, चवाले मॅडम ,मंद्रे मॅडम, गोर्डे मॅडम, संगीता याईस,सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले,
Post a Comment