सध्या देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे, या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशपातळीवर शासन मोठे प्रयत्न करत असून देशात सर्वत्र 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,अशातच आज रामनवमी आल्याने शिर्डी परिसरातील गावातही रामनवमी जन्मोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम ठेवून साजरा करण्या ऐवजी प्रत्येकाने घरातच श्रीरामनवमी जन्मोत्सव दुपारी ठीक बारा वाजता आपल्या कुटुंबासमवेत आनंद साजरा केला, काही ठिकाणी मंदिरातील पुजाऱ्यांनी श्रीरामाची पूजा करून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, सावळीविहीर येथे कोरोना संदर्भात सर्व दक्षता घेत व लॉक डाऊन चे नियम पाळत श्रीराम मंदिरात येथील पुजारी सौ बेबीताई सोनवणे व कैलास राव जपे,भजनी मंडळातील कामठे ताई , जपे ताई ,फाजगेताई, यांनी मंदिरात येऊन पाळणा बांधून पाळण्याला हार पुष्पहार घालून सजावट करून पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून दुपारी ठीक बारा वाजता पाळणागीत श्रीरामाचे गीते व आरती करून हा श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, दरवर्षी मंदिरात मोठी गर्दी असते ,मात्र यावेळी श्रीराम मंदिरात कोणी आले नव्हते, या दोन तीन महिलांनी लॉक डाऊन चे नियम पाळतात मास्क लावून व संनेटायझर चा वापर करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, तसेच घराघरातही श्रीराम व श्री साईबाबांच्या प्रतिमेचे आज श्रीराम नवमी निमित्त पूजन करण्यात आले, आज श्रीराम नवमी व गुरुवार असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला होता, अनेक ठिकाणी रामजन्मोत्सवा नंतर खडीसाखर,गुळ साखर तर काही ठिकाणी पुरणपोळ्यांचा नैवेद्य घरातील श्री साई प्रतिमेला व श्री रामाच्या प्रतिमेला देण्यात आला, अनेक घरात आज रामनवमी निमित्त श्री साई स्तवन मंजिरी वाचन करण्यात आले, व श्री राम व श्री साईबाबांना या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी शक्ती दे। जगाला ,देशाला या कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचे साकडे घातले, जरी लॉक डाऊन मुळे मंदिरात कोणी जाताना दिसत नव्हते,पण अनेकांनी आपापल्या घरात राहून मनोभावे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या आनंदात व आपल्या कुटुंबासमवेत उत्साहात साजरा केला, आज सावळीविहीर चा आठवडे बाजार व श्रीरामनवमी असतानाही लॉक डाऊन मुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
Post a Comment