Latest Post

शिर्डी प्रतिनिधि दर वर्षा प्रमाने रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली रंगपंचमी च्या दिवशी साईबाबा संस्थान गावातुन रथ मिरविते कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने यन्दा साइभक्तान्चा ओघ कमी होता.

बेलापूर-(प्रतिनिधी  ) छत्रपतींचा जयघोष , ढोलताशांंचा गजर  व सर्वत्र  प्रचंड उत्साह अशा वातावरणात न भुतो न भविष्यती अशी छत्रपती  शिवरायांची  मिरवणूक काल संपन्न झाली.
छत्रपती तरूण मंडळाचे   १२ वे वर्ष होते.त्यानिमित्ताने ११मार्च रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व १२मार्च म्हणजेच फाल्गुन वद्य त्रुतिया या तिथीनुसार छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जन्मदिना निमित्त सकाळी १०वा. प्राथमिक शिक्षक व शिक्षिका यांच्या शुभहस्ते शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले ,ज्याप्रमाणे बालशिवाजी घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी संस्कार केले,शिकवले त्याप्रमाणे आजच्या आपल्या बालकांना घडवण्यात प्राथमिक शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असते ,त्याची जाण ठेवून मंडळाने यावर्षी मराठी मुलांची व मुलींची शाळा तसेच उर्दु प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पुजन केले.त्याप्रसंगी परदेशी सर,जलील सर,लोंढे मँडम ,शहाणे मँडम,गायकवाड मँडम,सोनवणे मँडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारखान्याचे संचालक बबनराव मुठे हे उपस्थित होते.
 या प्रसंगी  भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी गणेश राठी,रामभाऊ तरस,विशाल यादव जि प सदस्य शरद नवले ,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे,अशोक कारखान्याचे  संचालक अभिषेक खंडागळे सुनिल मुथा भरत साळुंके देविदास देसाई मनोज श्रीगोड दिलीप दायमा  आदि मान्यवर उपस्थित होते.या मिरवणूकित संगमनेर येथील "हिंदू राजा प्रतिष्ठान"हे ७० कलाकारांच्या  ढोलताशा पथकाने आपले कौशल्य सादर केले.यात प्रामुख्याने दांडपट्टा, लाठीकाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले   कलाकारांची कला पाहताना बेलापूर करांचे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले.मिरवणूकीच्या अग्रभागी ढोलपथक  त्यामागे विद्युत रोषणाई केलेल्या १२छत्र्या घेवून उभे असलेले राजस्थानी वेषातील युवक,त्यानंतर शिवरायांची पालखी आपल्या खांद्यावर घेतलेले मावळे त्यामागे अश्वारुढ बालशिवाजी, व सर्वात मागे सजवलेल्या वाहनावर शिवरायांचा पुतळा.अशा  मनमोहक मिरवणूकिचे  सर्वांनीच स्वागत केले  पेठेतील इमारतीवरून  मिरवणूकीवर पुष्पवृष्टी केली जात होती तर प्रत्येक घरातील सवाष्ण महिला पालखीचे औक्षण व पुजन करीत होत्या.मिरवणूक मार्गावर महिलांनी सडासंमर्जन करून रांगोळ्या टाकल्याने मिरवणूकिला वेगळाच साज चढला होता.मिरणूकित भगवे फेटे घातलेले स्री पुरूष लक्ष वेधून घेत होते.अशा शिस्तबद्ध मिरवणूकिला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक.अध्यक्ष पुरूषोत्तम भराटे,अध्यक्ष  राहुल माळवदे ,उपाध्यक्ष रोहित शिंदे ,अनमोल माळवदे(खजिनदार),स्वप्निल खैरे(सचिव) अभिजीत रांका,अमोल खैरे,रामराजे भोसले व असंख्य कार्यकर्ते परीश्रम घेत होते.जवळपास चार तास चाललेल्या या मिरवणूकित बेलापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सर्व ग्रामस्थ व महिला यात सहभागी होत्या.

श्रीरामपूर - श्रीरामपुरात पोलिसांनी बुधवारी पहाटे दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच गुन्हेगारांना पिस्तुलासह जेरबंद केले आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री रेव्हेन्यू कॉलनीच्या मागच्या बाजूस पाटाच्या कडेला काही संशयित लोक दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जमा झाल्याची माहिती पो.कॉ. पंकज गोसावी यांना मिळाली. त्यांनी अधिक खात्री करून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती दिली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, समाधान सुरवाडे, संतोष बहाकार, सहायक फौजदार सुरेश मुसळे, पो.कॉ. जालिंदर लोंढे, रवींद्र कोरडे, सोमनाथ गाडेकर, संजय दुधाडे, पंकज गोसावी, सुनील दिघे, किशोर जाधव, अर्जुन पोकळे, धनंजय वाघमारे, हरीश पानसंबळ, रघुवीर कारखेले, संतोष दरेकर, रमिजराजा आतार आदींच्या पथकाने सापळा लावला.मात्र पोलिसांची चाहूल लागताच गुन्हेगार मोटारसायकली सोडून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून यासीनखान शिवाजी भोसले (वय 35, गोंडेगाव ता नेवासा), भगवान ज्ञानदेव धनेश्वर (वय-23 भोकर, ता. श्रीरामपूर), रामसिंग त्रिंबक भोसले (वय 26.रा. सलबतपुर, ता. नेवासा), अमित विठ्ठल डुकरे (वय 20 भोकर, ता. श्रीरामपूर) हे चार आरोपी ताब्यात घेतले तर राहुल भालेराव (रा. वडाळा महादेव) हा पळून जाण्यात यशस्वी झाला.पकडलेल्या आरोपींपैकी त्रिंबक भोसले याच्याकडे विना नंबरची पल्सर मोटारसायकल व तिच्या हँडलला एक कटावणी, भगवान धनेश्वर याच्याकडे मेड इन यूएसए असे लिहिलेले पिस्तुल व एक केएफ 7.62 असे अक्षर असलेले काडतुस, अमित विठ्ठल डुकरे याच्याकडे मिरची पावडर व एक दोरी तसेच एम. एच. 17 पीजे1912 एच एफ डिलक्स मोटारसायकल सोडून राहुल भालेराव पसार झाला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील पंधरा दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील लग्न समारंभ, यात्रा, वाढदिवसाच्या पार्ट्या व अन्य गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच चित्रपट गृह, मॉल या ठिकाणी असणारे रिलिंग व खुर्च्या वर असणारे कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.

बुलडाणा - 12 मार्च
वन व वनसंपत्तिचे रक्षणासाठी वनविभागाच्या माध्यमाने शासन कोठ्याधीश खर्च करते परंतु या खात्यात काही "रक्षक" एवजी "भक्षक" आहे जे आपला कर्तव्य विसरून गैरकृत्य करत आहे.अशीच बाब बुलडाणा डीएफओ संजय माळी यांच्या एका धाडीत समोर आली असून पकडलेला अवैध सागवन कोणी दुसऱ्याचा नसून चक्क वनपालाचा असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यात वन विभागात गुम्मी वर्तुळ मिळवण्यासाठी मोठी ओढतान असते,त्याचे कारण ही तसेच आहे.या भागातील जंगलात व खाजगी शेतात मोठ्या प्रमाणात सागवन आहे व या परिसरात कोणी फारसा लक्ष ही देत नाही म्हणूनच वृक्षरोपण,संगोपन व इतर विकास कामात भरपूर वर कमाई होते अशी धारना वन कर्मचाऱ्यात आहे.सद्या गुम्मी वर्तुळ मध्ये वामन पवार वनपाल म्हणून कार्यरत आहे असून या परिसरात अवैध वृक्ष कटाई चा प्रमाण वाढलेला आहे.तर चला आता येऊ 8 मार्चच्या घटनेकडे,सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार बुलडाणा डीएफओ संजय माळी यांना गुप्त माहिती मिळाली की,एका मालवाहू  वाहनातून अवैध सागवानची तस्करी होणार आहे व सदर लाकुड धाड-रोइखेड मायंबा- साकेगांव मार्गे चिखलीकडे जाणार आहे. ही माहिती मिळाल्याने डीएफओ संजय माळी यांनी आपल्या सोबत बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांना घेऊन चिखली जवळील अनुराधा कॉलेज येथे 8 मार्चच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका टाटा मैजिक मालवाहू वाहनाला थांबवून त्याची झळती घेतली पण  त्यात बाभळीचा जळतनच मिळून आला,शेवटी चालकाला विचारपुस केली असता त्याने सांगितले की सागवानचे कापलेले रीपा सर्वात खाली ठेवलेले आहे.या वाहनात वनपाल पवार यांचा जवळचा नातेवाईक सुद्धा बसलेला होता व वनपालची बैग ही या वाहनातून जप्त करण्यात आली. सदर वाहन बुलडाणा येथील लाकुड आगारात जमा करण्यात आला असून या प्रकरणी वनपालने दुधा येथील एका मिस्त्रीचा बिल सादर केला असला तरी त्यांच्याकडे वाहतूक पास होती का?आता पर्यंत या वनपालाने अशा प्रकारे किती वेळ अवैधरित्य सागवानची तस्करी केली??ढालसांवगी येथील शासकीय निवासस्थानचा वापर अवैध लाकुड ठेवण्यासाठी का केला? वनपाल वर गुन्हा कधी दाखल होणार?? अशे अनेक प्रश्नांचे उत्तर लवकरच समोर येणे गरजेचे आहे.

बयान ठरणार महत्वाचे
वाहन पकडल्या नंतर वन विभागाने चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी चालकाचा बयान महत्वाचा आहे.आज 12 मार्च रोजी बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे धाड परिसरात पोचले व त्यांनी इतर काही लोकांचे सुद्धा बयान घेतले आहे.हे सर्व बयान वनपाल पवार यांना घातक ठरणार असल्याची चर्चा वन विभागात सुरु आहे.

योग्य कारवाही करणार! टेकाळे
अवैधरित्य सागवान घेऊन जाणारा वाहन पकडण्यात आलेला असून त्याच रात्री वाहन चालकावर वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लाकुड कुठून आनले? कोणाचे होते?व कुठे नेले जात होते याची पूर्ण चौकशी दोन दिवसात करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल.जे कोणी दोषी असेल त्याला सोडण्यात येणार नाही,अशी प्रतिक्रिया बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे यांनी "बिंदास न्यूज़" ला दिली आहे.

बुलढाणा - 10 मार्च
भयावाह कोरोना वायरस के कारण बुलढाणा जिला प्रशासन ने सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया गया है जिसके कारण यहां जलनेवाली राज्य की सबसे बडी होली भी नही जलाई गई और ये 112 वर्षों की परंपरा खंडित हो गई है.
बुलढाणा जिले के ग्राम पिंपलगांव सराय के पास हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है जहां लाखों की तादाद में हर साल भाविक पहूंचकर अपनी अकीदत पेश करते हैं.बता दे कि सैलानी बाबा की यात्रा का आरंभ होलीका दहन से होता है और इस होलिका दहन में केवल राज्य ही नही बल्कि पूरे देश भर से लाखों भाविक सैलानी में पहूंचते हैं.पडोसी देश चीन के बाद भारत मे भी कोरोना वायरस की चपेट में आए कुछ मरीज़ पाए गए.इस जानलेवा बीमारी के फैलने से पहेले ही उसे रोकने के लिए प्रशासन मुस्तैद हो गया तथा बुलढाणा जिलाधिश श्रीमती सुमन चंद्रा रावत ने 5 मार्च को एक आदेश के तहत सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया है ताकि सैलानी में भीड इकट्ठा ना होने पाए.भाविकों को सैलानी में पंहुचने से रोकने के लिए सैलानी की तरफ आनेवाले सभी रास्तों पर कडा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है. सैलानी यात्रा में होलिका दहन का सिलसिला पिछले चला आ रहा है.मुजावर परिवार के हातों से होली को अग्नि देकर यात्रा का आरंभ किया जाता किंतु इस वर्ष कोरोना के कारण होली भी नही जलाई गई और 112 वर्षों से जारी होलिका दहन की ये परंपरा इस साल खंडित हो गई है.खास बात तो ये है कि सैलानी की होली में भक्तगण नारियल के साथ अपने शरीर से उतारे हुए कपड़े जलाते है.भक्तो की ये आस्था है कि ऐसा करने से भूत-प्रेत, करनी-कौटाल, जादू-टोना से निजात मिलती है.इस होली में करीब 10 से 12 ट्रक नारियल जलाए जाते है.होलिका दहन में शामिल होने के लिए आए भाविकों को सैलानी में दाखिल नही होने दिया गया जबकि कुछ भक्त 20 से 25 किलोमीटर पैदल चलकर सैलानी तो पहोंचे किंतु होली नही जलने के कारण काफी निराश हो गए थे.

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने गुरूस्थान मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्‍या होळीचे पूजन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ.वैशाली ठाकरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर कर्मचारी व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget