शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने गुरूस्थान मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्या होळीचे पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजली डोंगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ.वैशाली ठाकरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर कर्मचारी व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment