बेलापूर-(प्रतिनिधी ) छत्रपतींचा जयघोष , ढोलताशांंचा गजर व सर्वत्र प्रचंड उत्साह अशा वातावरणात न भुतो न भविष्यती अशी छत्रपती शिवरायांची मिरवणूक काल संपन्न झाली.
छत्रपती तरूण मंडळाचे १२ वे वर्ष होते.त्यानिमित्ताने ११मार्च रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व १२मार्च म्हणजेच फाल्गुन वद्य त्रुतिया या तिथीनुसार छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जन्मदिना निमित्त सकाळी १०वा. प्राथमिक शिक्षक व शिक्षिका यांच्या शुभहस्ते शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले ,ज्याप्रमाणे बालशिवाजी घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी संस्कार केले,शिकवले त्याप्रमाणे आजच्या आपल्या बालकांना घडवण्यात प्राथमिक शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असते ,त्याची जाण ठेवून मंडळाने यावर्षी मराठी मुलांची व मुलींची शाळा तसेच उर्दु प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पुजन केले.त्याप्रसंगी परदेशी सर,जलील सर,लोंढे मँडम ,शहाणे मँडम,गायकवाड मँडम,सोनवणे मँडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारखान्याचे संचालक बबनराव मुठे हे उपस्थित होते.
या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी गणेश राठी,रामभाऊ तरस,विशाल यादव जि प सदस्य शरद नवले ,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले,भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे,अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे सुनिल मुथा भरत साळुंके देविदास देसाई मनोज श्रीगोड दिलीप दायमा आदि मान्यवर उपस्थित होते.या मिरवणूकित संगमनेर येथील "हिंदू राजा प्रतिष्ठान"हे ७० कलाकारांच्या ढोलताशा पथकाने आपले कौशल्य सादर केले.यात प्रामुख्याने दांडपट्टा, लाठीकाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले कलाकारांची कला पाहताना बेलापूर करांचे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले.मिरवणूकीच्या अग्रभागी ढोलपथक त्यामागे विद्युत रोषणाई केलेल्या १२छत्र्या घेवून उभे असलेले राजस्थानी वेषातील युवक,त्यानंतर शिवरायांची पालखी आपल्या खांद्यावर घेतलेले मावळे त्यामागे अश्वारुढ बालशिवाजी, व सर्वात मागे सजवलेल्या वाहनावर शिवरायांचा पुतळा.अशा मनमोहक मिरवणूकिचे सर्वांनीच स्वागत केले पेठेतील इमारतीवरून मिरवणूकीवर पुष्पवृष्टी केली जात होती तर प्रत्येक घरातील सवाष्ण महिला पालखीचे औक्षण व पुजन करीत होत्या.मिरवणूक मार्गावर महिलांनी सडासंमर्जन करून रांगोळ्या टाकल्याने मिरवणूकिला वेगळाच साज चढला होता.मिरणूकित भगवे फेटे घातलेले स्री पुरूष लक्ष वेधून घेत होते.अशा शिस्तबद्ध मिरवणूकिला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक.अध्यक्ष पुरूषोत्तम भराटे,अध्यक्ष राहुल माळवदे ,उपाध्यक्ष रोहित शिंदे ,अनमोल माळवदे(खजिनदार),स्वप्निल खैरे(सचिव) अभिजीत रांका,अमोल खैरे,रामराजे भोसले व असंख्य कार्यकर्ते परीश्रम घेत होते.जवळपास चार तास चाललेल्या या मिरवणूकित बेलापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.सर्व ग्रामस्थ व महिला यात सहभागी होत्या.
Post a Comment