श्रीरामपुरात पोलिसांनी बुधवारी पहाटे दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच गुन्हेगारांना पिस्तुलासह केले जेरबंद.

श्रीरामपूर - श्रीरामपुरात पोलिसांनी बुधवारी पहाटे दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच गुन्हेगारांना पिस्तुलासह जेरबंद केले आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री रेव्हेन्यू कॉलनीच्या मागच्या बाजूस पाटाच्या कडेला काही संशयित लोक दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जमा झाल्याची माहिती पो.कॉ. पंकज गोसावी यांना मिळाली. त्यांनी अधिक खात्री करून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती दिली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, समाधान सुरवाडे, संतोष बहाकार, सहायक फौजदार सुरेश मुसळे, पो.कॉ. जालिंदर लोंढे, रवींद्र कोरडे, सोमनाथ गाडेकर, संजय दुधाडे, पंकज गोसावी, सुनील दिघे, किशोर जाधव, अर्जुन पोकळे, धनंजय वाघमारे, हरीश पानसंबळ, रघुवीर कारखेले, संतोष दरेकर, रमिजराजा आतार आदींच्या पथकाने सापळा लावला.मात्र पोलिसांची चाहूल लागताच गुन्हेगार मोटारसायकली सोडून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून यासीनखान शिवाजी भोसले (वय 35, गोंडेगाव ता नेवासा), भगवान ज्ञानदेव धनेश्वर (वय-23 भोकर, ता. श्रीरामपूर), रामसिंग त्रिंबक भोसले (वय 26.रा. सलबतपुर, ता. नेवासा), अमित विठ्ठल डुकरे (वय 20 भोकर, ता. श्रीरामपूर) हे चार आरोपी ताब्यात घेतले तर राहुल भालेराव (रा. वडाळा महादेव) हा पळून जाण्यात यशस्वी झाला.पकडलेल्या आरोपींपैकी त्रिंबक भोसले याच्याकडे विना नंबरची पल्सर मोटारसायकल व तिच्या हँडलला एक कटावणी, भगवान धनेश्वर याच्याकडे मेड इन यूएसए असे लिहिलेले पिस्तुल व एक केएफ 7.62 असे अक्षर असलेले काडतुस, अमित विठ्ठल डुकरे याच्याकडे मिरची पावडर व एक दोरी तसेच एम. एच. 17 पीजे1912 एच एफ डिलक्स मोटारसायकल सोडून राहुल भालेराव पसार झाला आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget