Latest Post


शिरसगाव[वार्ताहर]या शिक्षण घेणाऱ्या मुलीना त्यांच्या पायावर आर्थिकदृष्ट्या,स्वावलंबी केल्याशिवाय आम्ही त्यांचे लग्न करणार नाही पहिले करिअर करणार असे त्यांच्या मात्यानी महिला दिनी वचनद्यावे.धैर्यशील बनावे,महात्मा फुले यांनी सागितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पिणार तो गुरगुरणार,त्याप्रमाणे महिलांनी वागावे.महिला,मुलीची छेड काढल्यास महिलांनी प्रतिकार करून चोप द्यावा. आंतरराष्ट्रीय विचार करता आज महिलांगृहिणीना हाउसवाईफ ऐवजी होम मेकर दर्जा दिला जातो ते आपल्याला माहित नाही.महिला व लहान मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्यासाठी अहमदनगर येथे जलद न्यायालय होत आहे.महिलांनी स्वाभिमान बाळगावा,मला मुलगा अथवा मुलीला जन्म द्यायचा,तो माझा हक्क आहे.मला स्त्रीभ्रूण हत्या करायची नाही असे ठाम सांगावे.स्त्री पुरुष समानता मानावी.आपला लढा पुरुषविरोधी नसून स्त्री पुरुष विषमता मानणाऱ्या मानसिकतेच्या विरोधी आहे.ती आपण झुगारली पाहिजे.संत तेरेजा शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिन प्रसंगी डॉ दिपाली काळे यांनी प्रतिपादन केले.डॉ काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.बालकानी स्वागत सांस्कृतिक गीतांनी केले.त्यावेळी डॉ काळे यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी महिला माता संख्या पाहून महिला दिनाचा विजय आहे असे गौरविले.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड यांनी मातापित्यांनी बालसंस्कार कसे करावे,मुलांना सुसंस्कृत करावे,आदी सखोल मार्गदर्शन केले.कुटुंबप्रमुख महिला असताना सकस आहार व आरोग्याचे महत्व उंदीरगाव आरोग्य अधीक्षक श्रीमती रितू लखोटिया यांनी सांगितले.शिक्षणामध्ये पालक विद्यार्थी संवाद महत्वाचा असतो असे प्राचार्य डॉमनिक यांनी सांगितले.यावेळी प्रमुख धर्मगुरू पायस,रिचर्ड,सरपंच अस्मिता नवगिरे,प्राचार्य डॉमनिक,मुख्याध्यापक बी जी पारधे,पर्यवेक्षक पवार,शिंगाडे,आरोग्य अधिकारी बिरगळ,आरोग्य सेविका ज्योती त्रिभुवन,उबाळे,श्रीमती रणनवरे,आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सूत्र संचालन श्रीमती रिटा खेडेकर,यांनी व आभार प्रदर्शन ज्योती ठोंबरे यांनी केले.

बेलापूर ( प्रतिनिधी )-- माधवबाग क्लिनिकच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी हृदयरोग व मधुमेह आजाराला शह देण्यासाठी हृदयस्पर्शी  ही योजना सुरू केली  असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माधवबागचे मिलिंद सरदार यांनी केले आहे  ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणार्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी माधवबाग व ज्येष्ठ नागरिक संघाची शिखर संघटना फेस्काँम यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निकम सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पेन्शनर संघाचे अध्यक्ष खाडे अँड . अनंतराव बिंगी पत्रकार देविदास देसाई उपस्थित होते यावेळी माधवबाग च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हृदयस्पर्शी योजनेचा शुभारंभ
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आपल्या भाषणात मिलिंद सरदार पुढे म्हणाले की माधवबाग चे संस्थापक डॉक्टर रोहित साने यांनी देश हृदयरोग व मधुमेह मुक्त करण्याचा संकल्प केला आहे त्याचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत हजारो रुग्णांची शस्त्रक्रिया टाळण्याचे व त्यांना आजार मुक्त करण्याचे काम माधवबागने केलेले आहे डॉक्टर प्रशांत यांनी आपल्या भाषणात सांगितले की आहार विहार विचार प्राणायाम शारीरिक व्यायाम या सर्वांची सांगड घालून आपणच आपल्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे निकम सर पेन्शनर संघटनेचे खाडे पत्रकार देविदास देसाई जयश्री दळवी बेलापूर खुर्द चे माजी सरपंच गोरक्षनाथ पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कोरडे धनंजय जोशी प्रभाकर भोंगळे बापू मुंजाळ रूपाली शिंदे जया गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. सौ . भावना सोमाणी यांनी केले तर सूत्रसंचालन माधवबागचे कैलास सोमाणी यांनी केले

गळनिंब(प्रतिनिधी)गळनिंब,कुरणपूर येथील बालकांच्या हल्यानंतर वनविभागाने राबविल्या स्टिंग आॅपरेन मध्ये कडीत खुर्द येथे मच्छिंद्र वडीतके यांच्या वस्तीवर गट नं 224 मध्ये लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात  बिबट्या आज सकाळी 6 वाजता  जेरबंद झाला असून चौथा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेल्यामुळे परिसरातील नागरीक सतत भितीच्या सावटाखाली वावरत होते शेतकरी तरा शेतात जाण्यास धजावत नव्हते वन अधिकारी देखील परिसरात तळ ठोकुन होते परिसरात अनेक ठिकाणी  वन विभागाने पिंजरे लावले होते या ठिकाणी असणार्या पिंजर्या भोवती
गेली महीनाभरापासून हा बिबट्या  घिरट्या घालत होता पिंजर्‍यात भक्ष्य टाकूनही बिबट्या पिंजर्‍यात शिरत नसल्याने वनरक्षक गोसावी यांच्या ट्रॅप कॅमेराद्वारे लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी पिंजर्‍यात मासे,कोंबडीचे मास  ठेवून बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.
 याकामी वनपरीक्षेत्र वनरक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांना वनरक्षक एम.एस.इंगळे,वनरक्षक विक्रांत बुरांडे,वनरक्षक सुधाकर घोडके,वनमजूर बी.जी.खराडे,घोडके,आर.पी.शेळके,वाहन चालक संजय पंढरे,गणेश शिंदे यांनी विशेष मदत केली.

अहमदनगर - पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणातील चार आरोपी जेरबंद करण्याची विशेष कामगिरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली, तोफखाना पोलिसांनी पार पाडली आहे.याप्रकरणीतील वास्तव परिस्थिती समोर आल्याने नारायण नबाजी मतकर, गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेला मिळालेली प्रसिद्ध, राज्यात उमटलेल्या प्रतिक्रिया याची गांभीर्याने दखल घेऊन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी सदर घटनेच्या तपास कामी मार्गदर्शन करून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सूचना दिल्या. त्यानुसार तपासासाठी तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी यांचे एक पथक, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांचे पथक या सर्व पथकांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास सुरु केला. या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी फिर्यादीमधील मजकूर तसेच नमूद केलेल्या आरोपीकडे केलेली चौकशीचा संशय निर्माण झाल्याने सदर गुन्ह्यातील पिडीत हिचा पती यांच्याबाबत गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. या माहिती दरम्यान, जवळचे मित्र गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना चौकशी कामी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याच्या बायकोने यापूर्वी काही जणांना विरुद्ध दाखल केलेल्या बलात्काराची केस पैसे घेऊन मिटविणार होता. परंतु समोरील लोक मिटविण्यासाठी पैसे कमी देत होते. त्यांना जास्त पैसे पाहिजे होते. त्याकरिता त्याला स्वतः ला व त्याच्या बायकोला बलात्काराच्या गुन्ह्यामधील आरोपींना नग्न करून मारहाण केली, असा व्हिडीओ तयार करून तो मिडियामध्ये व्हायरल करायचा जेणेकरून गुन्ह्यातील आरोपींना पोलिस तात्काळ अटक करतील. अटक आरोपी हे केस मिटविण्यासाठी जास्त पैसे देतील, असे सांगितले. त्यानुषंगाने कट रचला. तो आमचा जवळचा मित्र असल्याने त्याच्या सांगण्यावरुन आम्ही तिघांनी त्याला मदत करून त्याला व त्याच्या बायकोला विवस्त्र करून हातपाय बांधून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केली, त्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून मिडियात तो व्हायरल केला असल्याची कबुली दिली. सदर तपासंती दोघा पत्नी व नवऱ्याला आणि मित्र गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या विरुद्धात तोफखान्याचे पो.नि. मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ५५०/२०२०, भादवि कलम ३०७, २०१, १२०(ब), १८२ सही माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६७(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी दिलेल्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उप अधीक्षक (गह) प्रांजली सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, सपोनि संदिप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोना रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सफौ.मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ संदीप घोडके, पोना संतोष लोंढे, रवींद्र कर्डीले, प्रकाश वाघ, सागर सासणे, योगेश सातपुते, मयुर गायकवाड, चालक पोहेकाँ भोपळे तसेच तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पथकाने ही कारवाई ही विशेष कारवाई केली आहे. 

बुलढाणा - 5 मार्च (कासिम शेख)
चीन के बाद भारत में भी कोरोना के कुछ मरीज पाए गए हैं. यह बीमारी संक्रमण है जो भीड़भाड़ के कारण फैलने के खतरे की भांपते हुए प्रशासन ने बुलढाणा जिले की विश्वविख्यात सैलानी बाबा की यात्रा को रद्द कीये जाने के निर्णय की पृष्ठी बुलढाणा जिलाधीश कार्यालय ने की है.
       बुलढाणा से 25 किलोमीटर दूर पीपलगांव सराय ग्राम पंचायत की हद में हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है.हिन्दू मुस्लिम एकता की मिसाल इस उर्स का आरंभ होलिका दहन से होता है तथा होली दहन के पांचवे दिन मजार ए शरीफ पर पारंपरिक रूप से मुजावरों के हाथों दर्ग्याह पर संदल चढ़ाया जाता है.होलिका दहन और संदल यह दो इस यात्रा के महत्वपूर्ण अंग है जिसमें देशभर से लाखों की संख्या में सर्वधर्मीय भक्त यहां पहुंचते हैं.आगामी 9 मार्च को
होलिकादहन से ये यात्रा आरंभ होनेवाली थी तथा 13 मार्च को संदल निकाला जाना था. इस साल चीन में कोरोना नामक बीमारी से हाहाकार मचा हुआ है तथा भारत में भी इस बीमारी के मरीज पाए गए हैं. यह बीमारी फैलने वाली है तथा सैलानी में जुटनेवाली लाखों की भीड़ को देखते हुए जिला प्रशासन ने केंद्र व राज्य शासन के निर्देश पर यह निर्णय लिया है कि सैलानी यात्रा को रद्द कर दिया जाए. भले ही प्रशासन ने यात्रा रद्द करने का निर्णय लिया किंतु अन्य राज्यों से यहां आनेवाले भावीकों तक यात्रा रद्द करने का प्रशासन का यह निर्णय कैसे पहुंचेगा? यहां आने वाली भीड़ को प्रशासन किस तरह से रोक पाएगा? यह सवाल भी बड़ा महत्वपूर्ण है.सैलानी बाबा की भक्ति और आस्था की में डूबे भक्त हर साल दरगाह पर अपनी उपस्थिति दर्शाते हैं तथा इस साल प्रशासन का निर्णय उन्हें यहां आने से रोक पाता है या नही ये तो समय बतायेगा.इस यात्रा के उतपन्न पर निर्भर अनेक व्यवसायिक भी प्रशासन के निर्णय से परेशान हैं जिन्होंने इस यात्रा की पूरी तैयारी कर रखी है किंतु प्रशासन कोरोना की रोकथाम के लिए प्रयास कर रहा है.

शिर्डी प्रतिनिधि शिर्डी ही साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भुमीत अनेक मागण्यासाठी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माडेकर यांनी लक्षवेधि आंदोलन  केले
ह्या लक्षवेधि आंदोलनात प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तिन्ना नोकरी पानीपट्टीची व घरपट्टीची जुलमी वसूली नको झोपड़पट्टीचे पुनर्वसन कायद्याने आहे त्यान्ना  पक्के घर द्यावेत अकार्यक्षम मुख्यअधिकारी सतीश दीघे यांची तात्काळ बदली व्हावी फेरीवाले यांना हॉकर्स झोन उभारावे दिव्यांग राखीव जागा भरावेत आउट सोर्सिंग कर्मचार्याला सुविधा द्याव्यात शेतकर्याच्या सुपुत्रास रेल्वेत नोकरीत घ्यावे 146 कर्मचारी यांचे निलंबन मागे घ्यावे अनुकंपातिल रिक्त जागा भराव्या 2018 पर्यंतच्या कर्मचारी  यांना कायम कराव शिर्डीत क्रिडांगण उभारावे ह्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माडेकर यान्नि प्रशासनाचे लक्ष विचलित करुण संस्थानच्या पार्किंग येथे आर्धी समाधि घेउन अनोखे आंदोलन केले परंतु शासनाने पाहीजे तशी  फारशी दखल घेतली नाहि शिर्डी नगरपंचायतचे मुख्यलिपिक यांनी निवेदन स्वीकारले ह्या प्रासंगि देसले यांनी आंदोलकास आपल्या मागण्या रास्त असुन् आपल्या मागण्या वरिष्ट अधिकार्यांना पाठउ अशे आश्वासन दिले ह्या आंदोलनाला शहरातूण मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद लाभले शिर्डी लहुजी सेना कालिका मित्र मंडल विराट प्रतिष्ठान एकलव्य संघटना सिंधी झूलेलाल ट्रस्ट साई संकल्प प्रतिष्ठान यांनी आपला पाठिम्बा जाहिर केला होता ह्या आंदोलनला कमलाकार कोते नितिन कोते पप्पू दुशीण्ग योगेश माडेकर अमोल बैनाइत सुजीत गोन्दकर वकील गोन्दकर अनिल शिरसाठ समीर वीर नीलेश सरोदे बंटी काम्बडे प्रवीण पवार आकाश राजपूत धीरज राजपूत बाबासाहेब कोते  यांनी आंदोलकाची भेट घेतली

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील साहस फौंडेशन संचालित जिजामाता पब्लिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व वार्षिक स्नेह संमेलन विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी विद्यार्थ्यांनी बालकानी सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक विद्यार्थी,शिक्षक,यांची मने जिंकून अभूतपूर्व नृत्ये,कला सादर केल्याने वारंवार गौरव करण्यात आला.प्रारंभी प्रमुख अतिथी भाजप सरचिटणीस प्रकाश चित्ते,अध्यक्षस्थानी प स सदस्य अरुण पा.नाईक,सुनील गायकवाड,डॉ किरण तुपे,जागतिक संविधान व संसदीय संघ सदस्य प्रा कैलास पवार,पत्रकार बी आर चेडे,डीवायएसपी मिलिंद शिंदे,राजेंद्र कुंकुलोळ,संतोष कांबळे, धीरजकुमार सिंग,कैलास शिंदे,अण्णासाहेब थोरात,पत्रकार ज्ञानेश गवले,साम टीव्हीचे गोविंद साळुंके,संस्थापक अध्यक्ष अजय नान्नोर आदींनी दीपप्रज्वलन व प्रवेशव्दार स्कूल फलकाचा शुभारंभ करण्यात आला.घोड्यावरून थेट रंगमंचाकडे तान्हाजी मालुसरे यांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीते,लावण्या कराटेचा डेमो,नाटिका सिनेगीत,अशा एकापेक्षा एक अशा कार्यक्रमांनी पालक व उपस्थितांची वाहवा मिळविली.प्रकाश चित्ते,डॉ किरण तुपे,मिलिंद शिंदे,प्रा कैलास पवार अरुण पा नाईक,सुनील गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करून संस्थापक अध्यक्ष अजय नान्नोर यांच्या अल्पवधीत कार्याची,विद्यार्थ्यांची वाढती संख्या,शिक्षकांचे उत्कृष्ट शिक्षण व प्रगती याबद्दल प्रशंसा केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अजय नन्नोर.व्यवस्थापक राजू नाईक,प्राचार्य स्वाती नाईक,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका पगारे,स्नेहल कुटे,सोनाली बनभेरू,सविता शेलार,प्रवीणा जमादार,आश्विनी साळूंके,पूजा सुराणा,सोनाली कुऱ्हे,पूजा बर्डे,भगवान जाधव,आदी सर्व शिक्षक,व कर्मचारी योगेश मेहेत्रे,मंगल भडके,किशोर शिंदे,अनिल खोसे,विक्रम पगारे,प्रमोद शेजूळ,अकबर शेख,संतोष साळुंके,लक्ष्मण चिंधे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget