शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील साहस फौंडेशन संचालित जिजामाता पब्लिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व वार्षिक स्नेह संमेलन विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी विद्यार्थ्यांनी बालकानी सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक विद्यार्थी,शिक्षक,यांची मने जिंकून अभूतपूर्व नृत्ये,कला सादर केल्याने वारंवार गौरव करण्यात आला.प्रारंभी प्रमुख अतिथी भाजप सरचिटणीस प्रकाश चित्ते,अध्यक्षस्थानी प स सदस्य अरुण पा.नाईक,सुनील गायकवाड,डॉ किरण तुपे,जागतिक संविधान व संसदीय संघ सदस्य प्रा कैलास पवार,पत्रकार बी आर चेडे,डीवायएसपी मिलिंद शिंदे,राजेंद्र कुंकुलोळ,संतोष कांबळे, धीरजकुमार सिंग,कैलास शिंदे,अण्णासाहेब थोरात,पत्रकार ज्ञानेश गवले,साम टीव्हीचे गोविंद साळुंके,संस्थापक अध्यक्ष अजय नान्नोर आदींनी दीपप्रज्वलन व प्रवेशव्दार स्कूल फलकाचा शुभारंभ करण्यात आला.घोड्यावरून थेट रंगमंचाकडे तान्हाजी मालुसरे यांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीते,लावण्या कराटेचा डेमो,नाटिका सिनेगीत,अशा एकापेक्षा एक अशा कार्यक्रमांनी पालक व उपस्थितांची वाहवा मिळविली.प्रकाश चित्ते,डॉ किरण तुपे,मिलिंद शिंदे,प्रा कैलास पवार अरुण पा नाईक,सुनील गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करून संस्थापक अध्यक्ष अजय नान्नोर यांच्या अल्पवधीत कार्याची,विद्यार्थ्यांची वाढती संख्या,शिक्षकांचे उत्कृष्ट शिक्षण व प्रगती याबद्दल प्रशंसा केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अजय नन्नोर.व्यवस्थापक राजू नाईक,प्राचार्य स्वाती नाईक,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका पगारे,स्नेहल कुटे,सोनाली बनभेरू,सविता शेलार,प्रवीणा जमादार,आश्विनी साळूंके,पूजा सुराणा,सोनाली कुऱ्हे,पूजा बर्डे,भगवान जाधव,आदी सर्व शिक्षक,व कर्मचारी योगेश मेहेत्रे,मंगल भडके,किशोर शिंदे,अनिल खोसे,विक्रम पगारे,प्रमोद शेजूळ,अकबर शेख,संतोष साळुंके,लक्ष्मण चिंधे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment