शिरसगाव[वार्ताहर]या शिक्षण घेणाऱ्या मुलीना त्यांच्या पायावर आर्थिकदृष्ट्या,स्वावलंबी केल्याशिवाय आम्ही त्यांचे लग्न करणार नाही पहिले करिअर करणार असे त्यांच्या मात्यानी महिला दिनी वचनद्यावे.धैर्यशील बनावे,महात्मा फुले यांनी सागितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पिणार तो गुरगुरणार,त्याप्रमाणे महिलांनी वागावे.महिला,मुलीची छेड काढल्यास महिलांनी प्रतिकार करून चोप द्यावा. आंतरराष्ट्रीय विचार करता आज महिलांगृहिणीना हाउसवाईफ ऐवजी होम मेकर दर्जा दिला जातो ते आपल्याला माहित नाही.महिला व लहान मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्यासाठी अहमदनगर येथे जलद न्यायालय होत आहे.महिलांनी स्वाभिमान बाळगावा,मला मुलगा अथवा मुलीला जन्म द्यायचा,तो माझा हक्क आहे.मला स्त्रीभ्रूण हत्या करायची नाही असे ठाम सांगावे.स्त्री पुरुष समानता मानावी.आपला लढा पुरुषविरोधी नसून स्त्री पुरुष विषमता मानणाऱ्या मानसिकतेच्या विरोधी आहे.ती आपण झुगारली पाहिजे.संत तेरेजा शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिन प्रसंगी डॉ दिपाली काळे यांनी प्रतिपादन केले.डॉ काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.बालकानी स्वागत सांस्कृतिक गीतांनी केले.त्यावेळी डॉ काळे यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी महिला माता संख्या पाहून महिला दिनाचा विजय आहे असे गौरविले.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड यांनी मातापित्यांनी बालसंस्कार कसे करावे,मुलांना सुसंस्कृत करावे,आदी सखोल मार्गदर्शन केले.कुटुंबप्रमुख महिला असताना सकस आहार व आरोग्याचे महत्व उंदीरगाव आरोग्य अधीक्षक श्रीमती रितू लखोटिया यांनी सांगितले.शिक्षणामध्ये पालक विद्यार्थी संवाद महत्वाचा असतो असे प्राचार्य डॉमनिक यांनी सांगितले.यावेळी प्रमुख धर्मगुरू पायस,रिचर्ड,सरपंच अस्मिता नवगिरे,प्राचार्य डॉमनिक,मुख्याध्यापक बी जी पारधे,पर्यवेक्षक पवार,शिंगाडे,आरोग्य अधिकारी बिरगळ,आरोग्य सेविका ज्योती त्रिभुवन,उबाळे,श्रीमती रणनवरे,आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सूत्र संचालन श्रीमती रिटा खेडेकर,यांनी व आभार प्रदर्शन ज्योती ठोंबरे यांनी केले.
Post a Comment