बेलापूर ( प्रतिनिधी )-जनसेवा या नावाप्रमाणेच बेलापूर गावात सेवा देणार्या जनसेवा पतसंस्थेने नागरीकांना मोफत झुणका भाकर केंद्र त्याच बरोबर पाणपोई सुरु करुन इतरा समोर एक वेगळा आदर्श ठेवला असल्याचे मत सेवा निवृत्त शिक्षक लक्ष्मणराव डोखे यांनी व्यक्त केले जनसेवा पतसंस्थेच्या वतीने बस स्थानक परिसरात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली त्या पाणपोईचे उद्घाटन डोखे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते या वेळी बोलताना पतसंस्थेचे चेअरमन सुवालाल लुक्कड म्हणाले की बस स्थानक परिसरात प्रवासी विद्यार्थी विद्यार्थीनीची पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता पतसंस्थेचे पाणपोई सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन सर्वांच्या सहकार्याने पतसंस्थेचे कामकाजही प्रगती पथावर आहे असेही ते म्हणाले या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड हिंद सेवा मंडळाचे संजय जोशी व्हा .चेअरमन सुभाष राठी प्रकाश कोठारी प्रविण लुंक्कड अमात लुंक्कड योगेश कोठारी दिपक वैष्णव सचिन कोठारी बन्सी तागड विजय कटारीया बस डेपो व्यवस्थापक बागुल कचरु वाबळे पतसंस्थेचे सेवकवृंद उपस्थित होते
Post a Comment