बेलापूर ( प्रतिनिधी )-- माधवबाग क्लिनिकच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी हृदयरोग व मधुमेह आजाराला शह देण्यासाठी हृदयस्पर्शी ही योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माधवबागचे मिलिंद सरदार यांनी केले आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणार्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी माधवबाग व ज्येष्ठ नागरिक संघाची शिखर संघटना फेस्काँम यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निकम सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पेन्शनर संघाचे अध्यक्ष खाडे अँड . अनंतराव बिंगी पत्रकार देविदास देसाई उपस्थित होते यावेळी माधवबाग च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हृदयस्पर्शी योजनेचा शुभारंभ
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आपल्या भाषणात मिलिंद सरदार पुढे म्हणाले की माधवबाग चे संस्थापक डॉक्टर रोहित साने यांनी देश हृदयरोग व मधुमेह मुक्त करण्याचा संकल्प केला आहे त्याचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत हजारो रुग्णांची शस्त्रक्रिया टाळण्याचे व त्यांना आजार मुक्त करण्याचे काम माधवबागने केलेले आहे डॉक्टर प्रशांत यांनी आपल्या भाषणात सांगितले की आहार विहार विचार प्राणायाम शारीरिक व्यायाम या सर्वांची सांगड घालून आपणच आपल्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे निकम सर पेन्शनर संघटनेचे खाडे पत्रकार देविदास देसाई जयश्री दळवी बेलापूर खुर्द चे माजी सरपंच गोरक्षनाथ पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कोरडे धनंजय जोशी प्रभाकर भोंगळे बापू मुंजाळ रूपाली शिंदे जया गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. सौ . भावना सोमाणी यांनी केले तर सूत्रसंचालन माधवबागचे कैलास सोमाणी यांनी केले
Post a Comment