गळनिंब(प्रतिनिधी)गळनिंब,कुरणपूर येथील बालकांच्या हल्यानंतर वनविभागाने राबविल्या स्टिंग आॅपरेन मध्ये कडीत खुर्द येथे मच्छिंद्र वडीतके यांच्या वस्तीवर गट नं 224 मध्ये लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या आज सकाळी 6 वाजता जेरबंद झाला असून चौथा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेल्यामुळे परिसरातील नागरीक सतत भितीच्या सावटाखाली वावरत होते शेतकरी तरा शेतात जाण्यास धजावत नव्हते वन अधिकारी देखील परिसरात तळ ठोकुन होते परिसरात अनेक ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावले होते या ठिकाणी असणार्या पिंजर्या भोवती
गेली महीनाभरापासून हा बिबट्या घिरट्या घालत होता पिंजर्यात भक्ष्य टाकूनही बिबट्या पिंजर्यात शिरत नसल्याने वनरक्षक गोसावी यांच्या ट्रॅप कॅमेराद्वारे लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी पिंजर्यात मासे,कोंबडीचे मास ठेवून बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.
याकामी वनपरीक्षेत्र वनरक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांना वनरक्षक एम.एस.इंगळे,वनरक्षक विक्रांत बुरांडे,वनरक्षक सुधाकर घोडके,वनमजूर बी.जी.खराडे,घोडके,आर.पी.शेळके,वाहन चालक संजय पंढरे,गणेश शिंदे यांनी विशेष मदत केली.
Post a Comment