Latest Post

हरेगाव (प्रतिनिधी ) आज आपल्या देशातील वातावरण दूषित झाले असून जातीजातीमध्ये विष कालवून देशाला कमकुवत करण्याचे कार्य काही प्रतिगामी शक्ति करीत आहेत. गावागावातून पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आलेली माणसं आज एकमेकावर अविश्वास दाखवत आहेत. हे वातावरण देशासाठी घातक आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर देश प्रेम रुजवितांना माणुसकी अबाधित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. उर्दू भाषा ही या देशाची पायाभूत भाषा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व रेकॉर्ड उर्दूमध्ये आहे. या भाषेची गोडी सुद्धा वेगळीच आहे. उर्दू शाळातुन उर्दू शिकणाऱ्यांयांची संख्या वाढली पाहिजे. असे मत पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी व्यक्त केले.
 जिल्हा परिषद उंदिरगाव उर्दू शाळेला ग्रामपंचायत हरेगाव मार्फत बांधून देण्यात आलेल्या तार कंपाउंड चे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रम  शाळेमध्ये संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री पटारे बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, उंदीरगाव चे सरपंच सुभाष बोधक, हरे गावच्या सरपंच अस्मिता नवगिरे, दीपक नवगिरे, पंचायत समिती सदस्या वैशाली मोरे, माजी सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच बाळासाहेब पवार, उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, ग्रामसेवक एम.बी. शेळके, केंद्रप्रमुख रमेश वारुळे. शिक्षक येथे राजू इनामदार, अल्ताफ शाह आदी या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या तार कंपाउंड चे फीत कापून सभापती शिंदे, उपसभापती तोरणे, माजी सभापती पटारे व इतर मान्यवरांनी उद्घाटन केले.  शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वच्छ भारत समर्थ भारत अंतर्गत स्वच्छतेची कव्वाली उत्कृष्टपणे सादर केली. तिला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. शाळेतर्फे सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सलीमखान पठाण, राजू इनामदार, दीपक नवगिरे, बाळासाहेब तोरणे, संगीता शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सादिक भाई शेख  मोहम्मद भाई  भाजी सात भाई शौकत भाई रमजान भाई शकील भाई भाई भाई रसूल भाई टेलर  गणीभाई  मुस्‍तकीम भाई तसेच  मुख्याध्यापक जलील शेख , उस्मान तांबोळी, अमजद आतार, हबीबा शेख, आसिफ मुर्तुजा युवराज पाटील, सुयोग सस्कर , अकिल शेख,साजिद कुरेशी, मदिना शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक, तालुक्यातील उर्दू शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक मोहम्मद बदर शेख यांनी मानले.

साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रितम परसवाणी यांची सिंधीसमाज साईझूलेलाल ट्रस्टच्या  अद्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले त्या प्रसंगी ट्रस्टचे मार्गदर्शक सूरेश केसवाणी माजी अद्यक्ष रमेश प्रेमाणी सचिव खुपचन्द फतनानि खजिनदार गोविंद गरुड  उपअद्यक्ष गोपीचंद फुण्दवणी  ॐ  प्रकाश
प्रेमाणी नरेश दादवाणी शाम थावाणी गिरीश मेवाणी वासुदेव रोहरा प्रेम दादवाणी नन्द्लाल मोटवानी आदी उपस्थित होते त्या प्रसंगी सिंधी समाजाचे शिष्टमंडळने शिर्डीत झूलेलाल ट्रस्टच्या माध्यमातुन भव्य मंदिर बनविण्याचे संकल्प केले  आहे समाजाच्या वतीने कायम सामाजिक कार्य चालू असते अशे सांगितल्यास विखे पाटील यांनी सिंधी समाजाचे कौतुक केले सत्कार प्रसंगी शिर्डी शहराच्या नगरअद्यक्षा उपनगर अद्यक्ष सर्व नगरसेवक माजी उपनगरअद्यक्ष व विविध षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आमच्या सिंधी समाजाचे सन्मान केल्याने त्या सर्वांचे झूलेलाल ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा, हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ग्रामविकास विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण रस्त्यांच्या कंत्राटदाराला उत्तरदायी धरणारी अधिक परिणामकारक पद्धत आणण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.बचतगटांच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शनांचे आयोजन आणि कायमस्वरूपी बाजारपेठ मिळेल अशी व्यवस्था विकसित करावी.बचतगटांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करण्यात यावा व तालुकास्तरावरील सक्षम बचतगटांना शिवभोजन योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.मागास आणि आदिवासी ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या विशेष सहाय्यात वाढ केली जावी असे ही मुख्यमंत्री म्हणाले. आज राज्यात ४ हजार ग्रामपंचायतींना त्यांचे स्वत:चे कार्यालय नाही. त्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी विभागाने उपलब्ध करून दिला असला तरी तो तोकडा आहे, त्यातून या सर्व ग्रामपंचायतींची कामे करणे शक्य नाही. या व यासारख्या ग्रामीण विकासाच्या योजनांना जिथे अधिक निधीची गरज आहे त्यासाठी विभागाने उपलब्ध वित्तीय तरतूदींचे नव्याने पुनर्वाटप करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.घरपोच मालमत्तापत्र देण्याची चाचपणीघरपोच सात बारा उताºयाप्रमाणे ग्रामपंचायतस्तरावर घरपोच मालमत्ता पत्र (प्रॉपर्टी कार्ड) देता येईल का याची विभागाने चाचपणी करावी, शक्य असल्यास तशी व्यवस्था विकसित करावी.ग्रामीण भागातील सत्तेचे व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया काहीशी संथ झाली आहे. त्यास गती देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केले.वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना जसा थेट निधी जातो तसाच तो पंचायत समित्यांनाही मिळावा, त्यामुळे ग्रामीण विकासाला गती मिळेल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत सांगितले.पालकमंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रारमुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविताना पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी तक्रार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आजच्या बैठकीत केली. तेव्हा या योजनांच्या प्रत्येक बैठकीस पालकमंत्र्यांना बोलवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.


बेलापूर  (प्रतिनिधी  )- जुलै आँगस्ट महीन्यात होवु घातलेल्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले असुन आरक्षणात दोन्ही नवलेचा प्रभागात सर्वसाधारण व्यक्ती करीता आरक्षण निघाले असुन अरुण पा नाईक यांचा प्रभागही शाबुत राहीला आहे माजी सरपंच भरत साळुंके  तसेच उपसरपंच रविंद्र खटोड यांना नेहमीचा प्रभाग सोडुन दुसर्याच प्रभागातुन निवडणूक लढवावी लागणार आहे    बेलापूर  ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण या प्रमाणे प्रभाग १ सदस्य संंख्या तीन ओ बी सी स्री  सर्व साधारण स्री सर्व साधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक २ सदस्य संख्या तीन अनु .जाती स्री  सर्व साधारण स्री ना मा प्र व्यक्ती प्रभाग क्रमांक तीन सदस्य सख्या दोन ना. मा ,प्र ,स्री सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक चार सदस्य संख्या तीन अनु ,जमाती स्री ना मा प्र स्री  सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक पाच सदस्य संख्या तीन अनु ,जाती स्री ना मा प्र व्यक्ती सर्व साधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक सहा सदस्य  संख्या तीन सर्व साधारण स्री अनु जाती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती अशा पध्दतीने  सोडत काढण्यात आली असुन यावर सात फेब्रुवारी पर्यत हरकती घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे या वेळी मंडलाधीकारी गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे ग्रामविकास अधीकारी संग्राम चांडे यांच्यासह जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य  आरुण पा नाईक भरत साळुंके  रविंद्र खटोड अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे जावेद शेख भास्कर बंगाळ अय्याज सय्यद जाकीर शेख अजिज शेख सागर खरात रमेश आमोलीक अरविंद साळवी महेंद्र साळवी रफीक शेख जिना शेख अनिल नाईक प्रकाश जाजु चंद्रकांत नाईक कलेश सातभाई आदिसह ग्रामस्थ उपस्थित  होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- गळनिंब तालुका श्रीरामपूर  येथील बालीकेच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतल्याच्या घटनेला दोन दिवस झाले नाही तोच मानवाचे रक्त तोंडाला लागलेल्या बिबट्याने प्रवरा नदी काठावर असलेल्या पिंपळगाव येथीलमंज्याबापु अगस्तीन जाधव यांच्या आडीच वर्ष वयाच्या मुलीवरा दिवसा ढवळ्या हल्ला केला असुन या हल्ल्यात ती मुलगी बचावली असली तरी बिबट्याच्या पंजाची मोठी जखम त्या बालीकेच्या गालावर झालेली आहे तीला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात  हलविण्यात आले असुन वन अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे  प्रवरा नदीवरील बधांरे भरलेले असल्यामुळे बिबट्याचा वावर नदी किनारी वाढत चाललेला आहे गळनींब पाठोपाठ  नदीच्या पलीकडे असणार्या पिंपळगाव येथे ही घटना घडल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )- गळनिंब तालुका श्रीरामपूर  येथील बालीकेच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतल्याच्या घटनेला दोन दिवस झाले नाही तोच मानवाचे रक्त तोंडाला लागलेल्या बिबट्याने प्रवरा नदी काठावर असलेल्या पिंपळगाव येथीलमंज्याबापु अगस्तीन जाधव यांच्या आडीच वर्ष वयाच्या मुलीवरा दिवसा ढवळ्या हल्ला केला असुन या हल्ल्यात ती मुलगी बचावली असली तरी बिबट्याच्या पंजाची मोठी जखम त्या बालीकेच्या गालावर झालेली आहे तीला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात  हलविण्यात आले असुन वन अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे  प्रवरा नदीवरील बधांरे भरलेले असल्यामुळे बिबट्याचा वावर नदी किनारी वाढत चाललेला आहे गळनींब पाठोपाठ  नदीच्या पलीकडे असणार्या पिंपळगाव येथे ही घटना घडल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे

शिरसगाव[वार्ताहर]दि.१ फेब्रु.रोजी डॉ आंबेडकर स्मारक विकास कामाच्या जागेची प्राधान्याने मोजणी करण्यात आल्याने या स्मारकाचे विकास काम लवकर पूर्ण होण्याची स्वप्ने सर्वाना दिसत आहेत.हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते दि ४ नोव्हे.२०१८ रोजी झालेल्या भूमिपूजनानंतर १४ महिने झाले तरी अद्याप सुरु झाले नाही.शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले होते.उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली.हरिगाव शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम तातडीने सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी व्यापारीवर्ग,ग्रामस्थ,रिक्षा चालक मालक संघटना,हरिगाव,उन्दिरगाव आउटसाईट यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद शांततेत पाळला.२७ जानेवारी रोजी लेखी पत्र मिळाल्याने आमरण उपोषण स्थगित झाले.दि २८ जाने.रोजी तातडीने नगररचना अहमदनगर कार्यालयाने पुढील योग्य कार्यवाही केली.आज दि १ फेब्रु.रोजी स्मारकाजवळच्या जागेची मोजणी करण्यात आली.या कामास विशेष बाब म्हणून प्राधान्याने पाहून योग्य कार्यवाही करण्याची पाउले जिल्हाधिकारी,नगररचना अधिकारी नगर,व पुणे,तहसीलदार [नगर]सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूर,संगमनेर आदींनी तातडीने उचलल्याने १ फेब्रु.रोजी सादर जागेची पुन्हा मोजणी करण्यात आली.त्यानंतर सा.बां.विभागाचे पत्र घेऊन संगमनेर मुख्यालयकडे,तसेच इतर प्रस्ताव पूर्ण होऊन ते पुणे नगररचना,त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित शाखा,नगररचनानंतर,नासिक कार्यालय,नंतर जिल्हाधिकारी कार्यालय अशी जलद कामे संबंधित पदाधिकारी करीत आहेत त्यामुळे डॉ आंबेडकर स्मारक विकास काम जलद गतीने पूर्ण होणार असून डॉ आंबेडकर स्मारकाचे स्वप्न पूर्ण होणार असे दिसते.त्याकामी जिल्हाधिकारी कार्यालय,निवासी जिल्हाधिकारी,गृह विभाग,तहसीलदार महसूल विभाग नगर,नगररचना कार्यालय अहमदनगर,व पुणे येथील अधिकारी,यांनी नियमानुसार सहकार्य केल्याबद्दल व ग्रामस्थ व्यापारी,रिक्षा चालक मालक हरिगाव उन्दिरगाव आउटसाईट यांना ३ उपोषणार्थी यांनी धन्यवाद दिले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget