हरिगाव डॉ आंबेडकर स्मारक विकास कामाच्या जागेची मोजणी सर्व कार्यालयाकडून दखल घेऊन कार्यवाही सुरु...

शिरसगाव[वार्ताहर]दि.१ फेब्रु.रोजी डॉ आंबेडकर स्मारक विकास कामाच्या जागेची प्राधान्याने मोजणी करण्यात आल्याने या स्मारकाचे विकास काम लवकर पूर्ण होण्याची स्वप्ने सर्वाना दिसत आहेत.हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते दि ४ नोव्हे.२०१८ रोजी झालेल्या भूमिपूजनानंतर १४ महिने झाले तरी अद्याप सुरु झाले नाही.शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले होते.उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली.हरिगाव शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम तातडीने सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी व्यापारीवर्ग,ग्रामस्थ,रिक्षा चालक मालक संघटना,हरिगाव,उन्दिरगाव आउटसाईट यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद शांततेत पाळला.२७ जानेवारी रोजी लेखी पत्र मिळाल्याने आमरण उपोषण स्थगित झाले.दि २८ जाने.रोजी तातडीने नगररचना अहमदनगर कार्यालयाने पुढील योग्य कार्यवाही केली.आज दि १ फेब्रु.रोजी स्मारकाजवळच्या जागेची मोजणी करण्यात आली.या कामास विशेष बाब म्हणून प्राधान्याने पाहून योग्य कार्यवाही करण्याची पाउले जिल्हाधिकारी,नगररचना अधिकारी नगर,व पुणे,तहसीलदार [नगर]सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूर,संगमनेर आदींनी तातडीने उचलल्याने १ फेब्रु.रोजी सादर जागेची पुन्हा मोजणी करण्यात आली.त्यानंतर सा.बां.विभागाचे पत्र घेऊन संगमनेर मुख्यालयकडे,तसेच इतर प्रस्ताव पूर्ण होऊन ते पुणे नगररचना,त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित शाखा,नगररचनानंतर,नासिक कार्यालय,नंतर जिल्हाधिकारी कार्यालय अशी जलद कामे संबंधित पदाधिकारी करीत आहेत त्यामुळे डॉ आंबेडकर स्मारक विकास काम जलद गतीने पूर्ण होणार असून डॉ आंबेडकर स्मारकाचे स्वप्न पूर्ण होणार असे दिसते.त्याकामी जिल्हाधिकारी कार्यालय,निवासी जिल्हाधिकारी,गृह विभाग,तहसीलदार महसूल विभाग नगर,नगररचना कार्यालय अहमदनगर,व पुणे येथील अधिकारी,यांनी नियमानुसार सहकार्य केल्याबद्दल व ग्रामस्थ व्यापारी,रिक्षा चालक मालक हरिगाव उन्दिरगाव आउटसाईट यांना ३ उपोषणार्थी यांनी धन्यवाद दिले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget