वडाळा महादेव [वार्ताहर ] श्रीरामपूर येथील श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम चे संचालक श्रीदत्तराज बाबाजी शास्त्री यांनी महानुभाव पंथाच्या विविध मागण्यासाठी माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांची नुकतीच भेट घेतली यावेळी श्रीदत्त जन्मस्थान बद्रिकाश्रम (गोपेश्वर चमोली, उत्तराखंड) आणि महानुभाव पंथासाठी प्रशासनाकडुन वेळोवेळी मदत मिळावी तसेच धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी श्रीरामपूर येथील श्रीदत्त राज बाबाजी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले प्रसंगी माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांनी महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान आचार प्रणाली दिनचर्या यांच्याविषयी माहिती घेऊन आदरभाव व्यक्त केला व शासनाकडून नक्कीच मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आपल्यासारख्या थोर संताचे दर्शन होणे तसेच धर्मग्रंथ व तत्वज्ञान श्रवण करण्याचे भाग्य लाभल्याचे मत माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांनी व्यक्त प्रसंगी श्री दत्तराज बाबाजी यांच्या शुभहस्ते माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी श्री दिपकराज बाबाजी श्री निलेशदादा उपस्थित होते.
Post a Comment