बेलापूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब येथील तीन वर्षाची बालिका कु.ज्ञानेश्वरी नामदेव मारकड हिच्यावर तीन दिवसापूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्याने परीसरात बिबट्याची दहशत पसरल्याने अहमदनगर वनविभागाचे रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक देवखिळे यांच्या सुचनेनुसार गळनिंब,कुरणपूर,फत्याबाद,मांडवे,कडित येथे तातडीने अतिरीक्त कर्मचार्यांसह दक्षता पथक,ट्रॅप कॅमेरा ठिकठिकाणी पिंजरे लावून यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी परिसरातील ग्रामस्थ अद्यापही भेदरलेल्या परिस्थितीत आहेत त्या बिबट्याच्या तोंडाला मानवाचे रक्त लागल्यामुळे पुन्हा आणखी एखाद्यावर हल्ला होण्याच्या धा स्तीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरता आहे तर शेतमजुर देखील धास्तावले आहे कोपरगाव वनपरीक्षेत्र अधिकारी एस एम जाधव वनपाल बी एस गाढे पी एस निकम आर एस धनवडे एस एम लांडे थोरात व्ही के पवार सुरासे .हे स्वत: सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून ठाण मांडून आहे.
यावेळी गावातील तरूणांच्या मदतीने वन अधीकारी परिस्थीतीवर लक्ष ठेवुन आहेत विज वितरण कंपनीचे पथक देखील परीसरात सतर्क असुन त्यामुळे विज चोरी करणारांचे धाबे दणाणले आहे.
Post a Comment