बेलापूर (प्रतिनिधी )- गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील बालीकेच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतल्याच्या घटनेला दोन दिवस झाले नाही तोच मानवाचे रक्त तोंडाला लागलेल्या बिबट्याने प्रवरा नदी काठावर असलेल्या पिंपळगाव येथीलमंज्याबापु अगस्तीन जाधव यांच्या आडीच वर्ष वयाच्या मुलीवरा दिवसा ढवळ्या हल्ला केला असुन या हल्ल्यात ती मुलगी बचावली असली तरी बिबट्याच्या पंजाची मोठी जखम त्या बालीकेच्या गालावर झालेली आहे तीला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले असुन वन अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे प्रवरा नदीवरील बधांरे भरलेले असल्यामुळे बिबट्याचा वावर नदी किनारी वाढत चाललेला आहे गळनींब पाठोपाठ नदीच्या पलीकडे असणार्या पिंपळगाव येथे ही घटना घडल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे
Post a Comment