हरेगाव (प्रतिनिधी ) आज आपल्या देशातील वातावरण दूषित झाले असून जातीजातीमध्ये विष कालवून देशाला कमकुवत करण्याचे कार्य काही प्रतिगामी शक्ति करीत आहेत. गावागावातून पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आलेली माणसं आज एकमेकावर अविश्वास दाखवत आहेत. हे वातावरण देशासाठी घातक आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर देश प्रेम रुजवितांना माणुसकी अबाधित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. उर्दू भाषा ही या देशाची पायाभूत भाषा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व रेकॉर्ड उर्दूमध्ये आहे. या भाषेची गोडी सुद्धा वेगळीच आहे. उर्दू शाळातुन उर्दू शिकणाऱ्यांयांची संख्या वाढली पाहिजे. असे मत पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद उंदिरगाव उर्दू शाळेला ग्रामपंचायत हरेगाव मार्फत बांधून देण्यात आलेल्या तार कंपाउंड चे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री पटारे बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, उंदीरगाव चे सरपंच सुभाष बोधक, हरे गावच्या सरपंच अस्मिता नवगिरे, दीपक नवगिरे, पंचायत समिती सदस्या वैशाली मोरे, माजी सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच बाळासाहेब पवार, उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, ग्रामसेवक एम.बी. शेळके, केंद्रप्रमुख रमेश वारुळे. शिक्षक येथे राजू इनामदार, अल्ताफ शाह आदी या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या तार कंपाउंड चे फीत कापून सभापती शिंदे, उपसभापती तोरणे, माजी सभापती पटारे व इतर मान्यवरांनी उद्घाटन केले. शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वच्छ भारत समर्थ भारत अंतर्गत स्वच्छतेची कव्वाली उत्कृष्टपणे सादर केली. तिला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. शाळेतर्फे सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सलीमखान पठाण, राजू इनामदार, दीपक नवगिरे, बाळासाहेब तोरणे, संगीता शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सादिक भाई शेख मोहम्मद भाई भाजी सात भाई शौकत भाई रमजान भाई शकील भाई भाई भाई रसूल भाई टेलर गणीभाई मुस्तकीम भाई तसेच मुख्याध्यापक जलील शेख , उस्मान तांबोळी, अमजद आतार, हबीबा शेख, आसिफ मुर्तुजा युवराज पाटील, सुयोग सस्कर , अकिल शेख,साजिद कुरेशी, मदिना शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक, तालुक्यातील उर्दू शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक मोहम्मद बदर शेख यांनी मानले.
Post a Comment