बुलडाणा - 5 फेब्रूवारी
प्रेयसीच्या घरात रात्रीच्या वेळेस मिळून आलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना खळबळजनक घटना आज बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सावळा या गावात घडली असून याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात प्रेयसीकडील 8 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर देवेन्द्र घिवे वय 32 याचे लग्न झालेले असून त्याचे घरासमोरच राहणाऱ्या एका युवतीसोबत मागील दोन वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध होते. सदर युवतीचे लग्न 7 फेब्रुवारी 2020 रोजी होणार होते दरम्यान 4 फेब्रुवारीच्या रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर घिवे हा युवक प्रेयसीच्या घरात लपून बसलेल्या स्थितीत आढळून आल्याने प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीचा दांड्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप मृतक ज्ञानेश्वरचे वडील देवेंद्र घिवे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केलेले असून या मारहाणीत ज्ञानेश्वरचा आज बुधवारी 5 फेब्रूवारीला शेगावात उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी मृतकाच्या वडिलच्या फिर्यादवरुन प्रेयसीच्या 8 नातेवाइकां विरोधात खुनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत.

Post a Comment