Latest Post

मालेगाव । प्रतिनिधी -पोलीस विभागाच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था व शांतता अबाधित राखली जात असल्याने सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरणात राहता येते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.येथील राज्य राखीव पोलीस दल संकुलाचे उद्घाटन व हस्तांतरण ना. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर ताहेरा शेख, राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, धुळ्याचे समादेशक संजय पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता वृषाली जोशी आदी उपस्थित होते.अतीसंवेदनशील शहर म्हणून मालेगाव येथे एसआरपीएफ जवानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात ठेवून संरक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे सांगून ना. भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस दल नागरीकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सेवा बजावते. त्यामुळे नागरीकांना सुसह्य जीवन जगता येते. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता करणेही आवश्यक असून त्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.पोलीस विभागातून दरवर्षी ज्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्याच प्रमाणात दरवर्षी पोलीस भरतीत सातत्य राखणे देखील आवश्यक असल्याचे सांगत ना. भुजबळ म्हणाले की, देशांतर्गत संरक्षणासाठी पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले. राज्यात ७० हजार पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.चांगले काम केले तर बदनामी टळेल. मात्र कामात कुचराई केली तर विभागाची बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन करून पोलिसांच्या कार्यावरच शासन चांगले की वाईट हे ठरत असल्याचे स्पष्ट केले.एसआरपीएफ जवानांच्या कार्यक्षमतेमुळेच मालेगाव शहराची विकास व शांततेच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले की, संवेदनशील म्हणून ओळख असणार्‍या मालेगाव शहरात कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण्यात राज्य राखीव पोलीस दलाचा मोलाचा सहभाग आहे. या इमारतीच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ जवानांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, काँग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, धर्माआण्णा भामरे, नंदू सावंत, विजय पवार, संदीप पवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, राजेश अलीझाड, निलेश काकडे, भारत बेद, अमोल चौधरी, अनिल पवार आदींसह पोलीस व एसआरपी दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य राखीव पोलीस दलासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय, टीव्ही रूम, अद्यावत स्वयंपाक गृह, भोजन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या संकुलात साधारण ९६ कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था होवू शकेल. यासोबतच एक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा अधिकार्‍यांची राहण्याची सोय देखील संकुलात करण्यात आली आहे. या संकुलाच्या इमारतीत सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मलनिस्सारण प्रकल्प आदी सुविधा आहेत.डॉ. आरती सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक.

बुलडाणा - (कासिम शेख) 13 जानेवारी

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव च्या शासकीय गोडावून मधून आलेल्या रेशन तालुका स्तरीय शासकीय गोडाऊन मध्ये न नेता भर रस्त्यात दुसऱ्या वाहनात टाकत असल्याचा प्रकार 9 जानेवारीला उघडकीस आला होता.या प्रकरणी आखेर मेहकर गोदामपाल एस. आर.राठोडला आज जिल्हाधिकारी यांनी आपले कर्तव्यता कसूरीचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे मात्र आपल्या कामात चूक करणाऱ्या वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही कण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
        भारतीय खाद्य निगमचे मुख्य गोदाम हे बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला असून येथूनच संपूर्ण तालुका स्तरीय शासकीय धान्य गोदामा पर्यंत शासकीय धान्य वाहतुकीचा ठेका 
गौरी इंटरप्राइज़ेस ने घेतलेला आहे. टप्पा क्रमांक 1 ची वाहतूक करतांना खामगांवहुन शासकीय धान्य घेऊन निघालेला वाहन तालुका स्तरीय गोदाम पर्यंत पोहोंचने अपेक्षित आहे परंतु 9 जानेवारीला खामगांवहुन निघालेला ट्रक मेहकरच्या शासकीय गोदामा पर्यंत पोहोचलाच नाही व शहरातील एका ठिकाणी ट्रक मधील शासकीय 20 टन धान्य इतर दोन वाहनात भरल्या जात असल्याची बाब समोर आली शासकीय नियमाला डावलून हे अनाधिकृत काम स्वता गोडाऊन किपर आणि कंत्राटदार करीत आहे सदर माल रेशन दुकानदारांना वितरीत करत असल्याचा प्रकार उघड झाला.याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना
दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता सदरचा माल हा द्वार पोच योजनेद्वारे दुकानदारांना पोहचवत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा माल दुकानदारांना जाणार होता की काळ्या बाजारात हा प्रश्न अनउत्तरित आहे.ही अनियमितता जिल्हाधिकारी पर्यंत जाऊन पोहोचली होती. संपूर्ण प्रकारणाची चौकशी करुन मेहकर मेहकर तहसीलदार यांनी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवले.शेवटी मेहकर गोदामपाल एस.आर.राठोड (अव्वल कारकून) यांना आज एका आदेशानव्य महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 चे नियम 4 (1) (अ) नुसार शासकीय सेवेतून निलंबित कण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा(सामान्य आस्थापना) येथे निश्चित करण्यात आले आहे.एकीकडे  गोदामपाल राठोडने चूक केली म्हणून प्रशासकीय कार्यवाही करत निलंबित करण्यात आले तर तितकीच चूक वाहतूक ठेकेदारची ही आहे. आता प्रशासन वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही करणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण )  :-
 डुकराच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात आज दुपारी एक1. 45 च्या दरम्यान घडली 
याबाबत मिळालेली माहिती अशी की कोल्हार सोनगाव रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत काही मुले लघुशंकेसाठी गेले असता शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या खाली उकरलेल्या बोगद्यातून प्रवेश करीत एका डुकराने वैभव संदीप माळी (वय 7 वर्ष ,राहणार अंबिकानगर )
या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अचानक हल्ला केला या डुकराने या मुलाच्या छातीवर चावा घेऊन त्याला जखमी केले त्यामुळे तो मुलगा भयभीत झाला ही घटना काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांना सांगितली मुख्याध्यापिका देशमुख व शिक्षिका सुंबे तसेच शिक्षक शरद तांबे यांनी या विद्यार्थ्याला तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी दाखल केले 
आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोलप यांनी या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करून खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले.
 दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोल्हार भगवतीपुर मधील मोकाट कुत्रे डुकराचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.

बुलडाणा-13 जानेवारी
दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोतया परिक्षार्थी परीक्षा देत असल्याचा गंभीर  प्रकार  समोर आलाय. बुलडाणा येथील संजय दांडगे याच्या आसनावर औरंगाबाद जिल्ह्यातील राजेवाडीच्या चंदन बहुरे या आरोपीला परीक्षा देतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
       बुलडाणा येथील शारदा विद्यालयात 12 जानेवारीला अनुसुचित जमातीची विशेष भरती मोहीम सरळसेवा भरती आयोग, आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी परिक्षा घेण्यात आली.  आरोग्य सेवक पदाची परीक्षा देत असतांना बुलडाणा येथाल संजय विनायक दांडगे याच्या आसन क्र. 1491 वर चंदन बहुरे हा संशयास्पद परीक्षार्थी केंद्राध्यक्ष पवार यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन व पॅन कार्ड आढळून आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संजय हिवाळे यांनी फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात भादवी ची कलम 420 नुसार गून्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक कण्यात आलेआहे. 
.

अहमदनगर – विना परवाना गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीसाच्या हातावर तुरी देत पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. या प्रकरणामुळे 'कोतवाली' पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोतवाली पोलीसांनी तीन दिवसापूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता.दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलीसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रांत:विधिसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धूम ठोकली.
कर्मचाऱ्यांने त्याचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

उम्मती फौंडेशनच्या 'उम्मती मॅरेज ब्युरो' या मोफत विवाह ब्युरोच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'उम्मती मॅरेज ब्युरो' चे उदघाटनासाठी अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना खलील तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुफ्ती रिजवान, वकील संघाचे मा.अध्यक्ष अ‍ॅड. वाय. के.शेख, अ‍ॅड.रफिक शेख टी. सी, प्रा.बँकेचे संचालक पत्रकार सलीम पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, अल्तमश पटेल, मेहबूब कुरेशी, मौलाना इस्माईल, डॉ.अफरोज तांबोळी, साजिद मिर्जा आदी उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी हे विवाह ब्युरो संपूर्णपणे मोफत असून यात सर्वधर्मीय तरुण मुला-मुलींच्या बायोडाटाची संपूर्ण आणि अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे दालन उपलब्ध आहे तसेच हा मॅरेज ब्युरो विवाहयोग्य उमेदवारांच्या सामन्याचे तपशील जाणून पालकांची तातडीची गरज भागवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. अध्यक्ष मौलाना खलील यांनी ब्युरोच्या कार्यप्रणाली विषयी उपस्थित पालकवर्गांना कानमंत्र दिला. अ‍ॅड. वाय.के.शेख यांनी विवाह ब्युरोच्या कायदेविषयक विविध बाबींचा ऊहापोह केला. ईतर सर्व मान्यवरांनी 'उम्मती' च्या अभिनव मोफत उपक्रमाचे तोंडभर कौतुक करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अ‍ॅड.आरिफ शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण, खजिनदार शाकिफ शेख, समीर शेख, माजिद मिर्जा, डॉ.सुदर्शन रानवडे, इंजि.अयाज शेख, दानिश पठाण, अरबाज बेग, सुलतान शहा, नवेद तांबोळी, शाहरुख बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर( प्रतिनिधी  )--प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे आधार जुळत नसल्यामुळे त्यांनी तातडीने सेतू केंद्रात जाऊन आपले आधार जुळवून घ्यावे व शेतकरी सन्मान योजनेस पात्र व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची माहिती देण्याकरिता तहसीलदार प्रशांत पाटील हे बेलापूर येथे आले होते  या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती देताना तहसीलदार पाटील म्हणाले की आधार कार्ड वरील माहिती व पोर्टल वरील माहिती चुकीची
असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी अर्ज दुरुस्त करून घेतल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे शेतकऱ्याने केवळ आधार कार्ड घेऊन सेतू केंद्रात जावयाचे आहे त्या ठिकाणी केवळ दहा रुपये फी घेऊन आपले आधार अपडेट केले जाईल कर्जमाफी बाबत बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की कर्जमाफी च्या याद्या बँकाकडून मागण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही शेतकऱ्यांनी आपले आधार आपल्या बँक खात्यास लिंक केलेले नाही आठ दिवसात शेतकऱ्यांनी आपले खाते आपल्या आधार कार्डास लिंक करून घ्यावे आपल्या अज्ञानामुळे आपण कर्जमाफी  पासून वंचित राहू नये दुष्काळ निधी ची सर्व कागदपत्रे व अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप अनुदान आलेले नाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचीही पंचनामे करण्यात आले असून निधी येताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाईल यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक उपसरपंच रवींद्र खटोड चंद्रकांत नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मिलिंद दुधाळ दत्ता कुर्हे  रमेश वाबळे ज्ञानदेव वाबळे बाळासाहेब लगे बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक मनोज श्रीगोड कलेश सातभाई सेतू चालक  प्रसाद लड्डा इंगळे आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच रवींद्र खटोड यांनी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget