कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
डुकराच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात आज दुपारी एक1. 45 च्या दरम्यान घडली
याबाबत मिळालेली माहिती अशी की कोल्हार सोनगाव रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत काही मुले लघुशंकेसाठी गेले असता शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीच्या खाली उकरलेल्या बोगद्यातून प्रवेश करीत एका डुकराने वैभव संदीप माळी (वय 7 वर्ष ,राहणार अंबिकानगर )
या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अचानक हल्ला केला या डुकराने या मुलाच्या छातीवर चावा घेऊन त्याला जखमी केले त्यामुळे तो मुलगा भयभीत झाला ही घटना काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांना सांगितली मुख्याध्यापिका देशमुख व शिक्षिका सुंबे तसेच शिक्षक शरद तांबे यांनी या विद्यार्थ्याला तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी दाखल केले
आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोलप यांनी या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करून खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोल्हार भगवतीपुर मधील मोकाट कुत्रे डुकराचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
Post a Comment