बुलडाणा - (कासिम शेख) 13 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव च्या शासकीय गोडावून मधून आलेल्या रेशन तालुका स्तरीय शासकीय गोडाऊन मध्ये न नेता भर रस्त्यात दुसऱ्या वाहनात टाकत असल्याचा प्रकार 9 जानेवारीला उघडकीस आला होता.या प्रकरणी आखेर मेहकर गोदामपाल एस. आर.राठोडला आज जिल्हाधिकारी यांनी आपले कर्तव्यता कसूरीचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे मात्र आपल्या कामात चूक करणाऱ्या वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही कण्यात येते या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भारतीय खाद्य निगमचे मुख्य गोदाम हे बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला असून येथूनच संपूर्ण तालुका स्तरीय शासकीय धान्य गोदामा पर्यंत शासकीय धान्य वाहतुकीचा ठेका
गौरी इंटरप्राइज़ेस ने घेतलेला आहे. टप्पा क्रमांक 1 ची वाहतूक करतांना खामगांवहुन शासकीय धान्य घेऊन निघालेला वाहन तालुका स्तरीय गोदाम पर्यंत पोहोंचने अपेक्षित आहे परंतु 9 जानेवारीला खामगांवहुन निघालेला ट्रक मेहकरच्या शासकीय गोदामा पर्यंत पोहोचलाच नाही व शहरातील एका ठिकाणी ट्रक मधील शासकीय 20 टन धान्य इतर दोन वाहनात भरल्या जात असल्याची बाब समोर आली शासकीय नियमाला डावलून हे अनाधिकृत काम स्वता गोडाऊन किपर आणि कंत्राटदार करीत आहे सदर माल रेशन दुकानदारांना वितरीत करत असल्याचा प्रकार उघड झाला.याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना
दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता सदरचा माल हा द्वार पोच योजनेद्वारे दुकानदारांना पोहचवत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा माल दुकानदारांना जाणार होता की काळ्या बाजारात हा प्रश्न अनउत्तरित आहे.ही अनियमितता जिल्हाधिकारी पर्यंत जाऊन पोहोचली होती. संपूर्ण प्रकारणाची चौकशी करुन मेहकर मेहकर तहसीलदार यांनी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवले.शेवटी मेहकर गोदामपाल एस.आर.राठोड (अव्वल कारकून) यांना आज एका आदेशानव्य महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 चे नियम 4 (1) (अ) नुसार शासकीय सेवेतून निलंबित कण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा(सामान्य आस्थापना) येथे निश्चित करण्यात आले आहे.एकीकडे गोदामपाल राठोडने चूक केली म्हणून प्रशासकीय कार्यवाही करत निलंबित करण्यात आले तर तितकीच चूक वाहतूक ठेकेदारची ही आहे. आता प्रशासन वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइज़ेस वर काय कार्यवाही करणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Post a Comment