बुलडाणा-13 जानेवारी
दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोतया परिक्षार्थी परीक्षा देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. बुलडाणा येथील संजय दांडगे याच्या आसनावर औरंगाबाद जिल्ह्यातील राजेवाडीच्या चंदन बहुरे या आरोपीला परीक्षा देतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
बुलडाणा येथील शारदा विद्यालयात 12 जानेवारीला अनुसुचित जमातीची विशेष भरती मोहीम सरळसेवा भरती आयोग, आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी परिक्षा घेण्यात आली. आरोग्य सेवक पदाची परीक्षा देत असतांना बुलडाणा येथाल संजय विनायक दांडगे याच्या आसन क्र. 1491 वर चंदन बहुरे हा संशयास्पद परीक्षार्थी केंद्राध्यक्ष पवार यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन व पॅन कार्ड आढळून आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संजय हिवाळे यांनी फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात भादवी ची कलम 420 नुसार गून्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक कण्यात आलेआहे.
.
Post a Comment