बेलापूर( प्रतिनिधी )--प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे आधार जुळत नसल्यामुळे त्यांनी तातडीने सेतू केंद्रात जाऊन आपले आधार जुळवून घ्यावे व शेतकरी सन्मान योजनेस पात्र व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची माहिती देण्याकरिता तहसीलदार प्रशांत पाटील हे बेलापूर येथे आले होते या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती देताना तहसीलदार पाटील म्हणाले की आधार कार्ड वरील माहिती व पोर्टल वरील माहिती चुकीची
असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी अर्ज दुरुस्त करून घेतल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे शेतकऱ्याने केवळ आधार कार्ड घेऊन सेतू केंद्रात जावयाचे आहे त्या ठिकाणी केवळ दहा रुपये फी घेऊन आपले आधार अपडेट केले जाईल कर्जमाफी बाबत बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की कर्जमाफी च्या याद्या बँकाकडून मागण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही शेतकऱ्यांनी आपले आधार आपल्या बँक खात्यास लिंक केलेले नाही आठ दिवसात शेतकऱ्यांनी आपले खाते आपल्या आधार कार्डास लिंक करून घ्यावे आपल्या अज्ञानामुळे आपण कर्जमाफी पासून वंचित राहू नये दुष्काळ निधी ची सर्व कागदपत्रे व अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप अनुदान आलेले नाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचीही पंचनामे करण्यात आले असून निधी येताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाईल यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक उपसरपंच रवींद्र खटोड चंद्रकांत नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मिलिंद दुधाळ दत्ता कुर्हे रमेश वाबळे ज्ञानदेव वाबळे बाळासाहेब लगे बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक मनोज श्रीगोड कलेश सातभाई सेतू चालक प्रसाद लड्डा इंगळे आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच रवींद्र खटोड यांनी आभार मानले
Post a Comment