उम्मती फौंडेशनच्या 'उम्मती मॅरेज ब्युरो' या मोफत विवाह ब्युरोच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'उम्मती मॅरेज ब्युरो' चे उदघाटनासाठी अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना खलील तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुफ्ती रिजवान, वकील संघाचे मा.अध्यक्ष अॅड. वाय. के.शेख, अॅड.रफिक शेख टी. सी, प्रा.बँकेचे संचालक पत्रकार सलीम पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, अल्तमश पटेल, मेहबूब कुरेशी, मौलाना इस्माईल, डॉ.अफरोज तांबोळी, साजिद मिर्जा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी हे विवाह ब्युरो संपूर्णपणे मोफत असून यात सर्वधर्मीय तरुण मुला-मुलींच्या बायोडाटाची संपूर्ण आणि अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे दालन उपलब्ध आहे तसेच हा मॅरेज ब्युरो विवाहयोग्य उमेदवारांच्या सामन्याचे तपशील जाणून पालकांची तातडीची गरज भागवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. अध्यक्ष मौलाना खलील यांनी ब्युरोच्या कार्यप्रणाली विषयी उपस्थित पालकवर्गांना कानमंत्र दिला. अॅड. वाय.के.शेख यांनी विवाह ब्युरोच्या कायदेविषयक विविध बाबींचा ऊहापोह केला. ईतर सर्व मान्यवरांनी 'उम्मती' च्या अभिनव मोफत उपक्रमाचे तोंडभर कौतुक करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड.आरिफ शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण, खजिनदार शाकिफ शेख, समीर शेख, माजिद मिर्जा, डॉ.सुदर्शन रानवडे, इंजि.अयाज शेख, दानिश पठाण, अरबाज बेग, सुलतान शहा, नवेद तांबोळी, शाहरुख बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment