Latest Post

अहमदनगर :- शिर्डी येथील फ्रेंडस मोबाईल शॉपी फोडून 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल चोरणारे दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. किरण ज्ञानदेव सदाफुले (वय 21, रा. प्रसादनगर, शिर्डी ता.राहाता जि.अहमदनगर) याला अटक करण्यात आले असून,  राजु अशोक माळी (रा. गणेशनगर, शिर्डी) हा फरार झालेला असल्याने पोलिस यश घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, फे्ंरडस मोबाईल शॉपी (शिर्डी) येथे शॉपीचे छताचा पत्रा कापून आतील 18 वेगवेगळ्या कंपन्यांचे 2 लाख 53 हजार रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलिस ठाण्यात मंगेश भागवत लांडगे (रा. डोर्‍हाळे ता.राहाता) यांनी दिली होती. त्या गुन्ह्यासंबंधी तपास सुरु असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार किरण सदाफुले याला मोठ्या शिताफिने पकडण्यात आले. सदाफुले याच्याकडून 82 हजार रुपये किंंमतीचे 8 मोबाईल जप्त केलेे. अन्य चोरीस गेलेले 10 मोबाईलबाबत चौकशी केली असता, ते मोबाईल राजु माळी यांच्याकडे असल्याचे सदाफुले याने सांगितले. त्या माहितीनुसार पोलिस माळी यांचा शोध घेत आहेत.पो.नि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, विजयकुमार वेठकर, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, दत्ता गव्हाणे, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, दिपक शिंदे, विजय ठोंबरे, राहुल सांळुके, कमलेश पाथरुट, रोहित मिसाळ, चोपोहेकॉ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

बेलापूर( प्रतिनिधी) बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना आपल्या परिसरात घडू नये म्हणून पालक सामाजिक  कार्यकर्ते  विद्यार्थी विद्यार्थीनी  यांनी जागृक राहणे आवश्यक आहे असे मत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उझे यांनी व्यक्त केले हैदराबाद व ईतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडलेले आहेत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बेलापूर ग्रामस्थ बेलापूर पत्रकार संघ विद्यार्थी कल्याण विभाग राष्ट्रीय सेवा योजना बेलापूर महाविद्यालय आदींनी बेलापूर पोलीस स्टेशन येथे येऊन या घटनेचा निषेध केला व पोलिसांना  निवेदन दिले त्यावेळी  ग्रामस्थ समोर बोलताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय  उजे म्हणाले की वाईट घटना वेळ आणि ठिकाण विचारून होत नसते त्यामुळे इतर ठिकाणी घडलेल्या घटना आपल्या परिसरात घडणार नाही याची कुणी ग्वाही देऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक व नागरिकांनी जागरूक राहावे व कुणाविषयी काही संशय आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन उझे यांनी केले यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच व कैलासवासी मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड पत्रकार देविदास देसाई बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे हाजी इस्माईल शेख पल्लवी पुजारी आदींनी या घटनेचा निषेध करून अशा घटना पुन्हा घडणार नाही याकरिता उपाययोजना कराव्यात तसेच पोलिसांनी हैदराबाद येथे झालेल्या घटनेतील चारही आरोपींचा एन्काउंटर केल्यामुळे समाधान व्यक्त केले यावेळी बेलापूर महाविद्यालयाचे चंद्रकांत कोतकर निजाम शेख विलास गायकवाड अशोक माने  बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले माजी उपसरपंच नंदाताई पवार शिरीन शेख  अनिल पवार जावेद शेख अकबर भाई टिन मेकर वाले तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे  लहान भाऊ नागले शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार बेलापुर सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन कलेश सातभाई मोसिन खाजाभाई पोलीस पाटील अशोक प्रधान अशोक गवते प्रकाश जाजू नामदेव बोंबले जावेद शेख पत्रकार दिलीप दायमा अतिश देसरडा निसार शाह सोनू शेख आयुब शेख असलम शेख आदीसह बेलापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थी  विद्यार्थिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोपट भोईटे बाळासाहेब गुंजाळ निखील तमनर राजु मेहेर आदिंनी चोख बंदोबस्त  ठेवला

हैदराबाद - देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भावना व्यक्त करताना, पोलिसांचं कौतुक करत न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशासमोर एक उदाहरण ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. तर, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, असे पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंग यांनीही पोलिसांच्या धाडसी कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मी आणि माझ्या पत्नीप्रमाणे होणाऱ्या अग्निपरीक्षेतून दिशाच्या आई-वडिलांची सुटका झाली, असेही  सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडिया आणि नागरिकांमधून पोलिसांची पाठराखण करत कारवाईचं कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांकडून या 4 आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे.

बुलडाणा- 5 डिसेंबर
 संग्रामपुर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रसर असणारा नाव म्हणजे अभयसिंह मारोडे.अन्याय अत्याचार विरोधात नेहमी लडणाऱ्या या "वॉरिअर" चा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी असा साजरा केला की तो  प्रशासनाला जागवण्यासाठी आंदोलन ठरला.
    -
आज 5 डिसेंबरला अभयसिंह मारोडे व त्यांच्या लहान मुलगा कबीरचा वाढदिवस असल्याने मारोडे आपली पत्नी सोबत साकाळी शाळेत गेले व त्यांनी कबीरच्या वर्गात पेन्सिल वाटप केली. त्या नंतर हा "वॉरिअर" आपल्या काही मित्रां सोबत संग्रामपूर-वरवट रस्त्यावरील कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल समोरील मुख्य रस्त्यावर पडलेले गड्डे बुजविण्याकरिता गेले व श्रमदान करून शक्य तेवढे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.मग त्याच ठिकाणी "वॉरिअर" च्या मित्रमंडळीने त्यांचा वाढदिवस चक्क खड्यात बसून केक कापून साजरा केला आणि हा अनोखा वाढदिवस संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.समाजिक कामात स्वताला झोकुन देणारे लोक आपल्या प्रत्येक कामाने समाजाला काही तरी नवीन शिकवण देत असतात.

बुलढाणा- 5 दिसेंबर
बेटे को बचाने के लिए कुएं में छलांग लगानेवाले पिता की भी पानी मे डूबने से मौत हो गई.ये घटना आज 5 दिसेंबर को ग्राम वरवंड में घटने से पूरा गांव सन्न रहे गया है.
      प्राप्त जानकारी के अनुसार बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम वरवंड निवासी किसान अरुण इंगले अपने 10 वर्षीय पुत्र संघर्ष के साथ आज सुबह काम के लिए अपने खेत मे गए थे.इस समय संघर्ष कुएं में गिर पडा जिसे बचाने के लिए पिता अरुण इंगले ने पानी मे छलांग लगाई किंतु दुर्भाग्यवश पिता-पुत्र दोनों भी पानी मे दुब गए.घटना की जानकारी मिलते ही ग्रामस्थो ने दोनों को कुएं से बाहर निकाला पर जब तक दोनों की मौत हो गई थी.बिटजमादार इंगले ने घटनास्थल का पंचनामा कर दोनों शवों को पोस्टमार्टम के लिए जिला सरकारी अस्पताल में भेज दिया है.बुलढाणा ग्रामीण थाने में मर्ग का मामला दर्ज कर घटना की अधिक जांच पुलिस कर रही है.

बुलढाणा- 5 दिसेंबर
यहां कार्यरत अप्पर जिलाधिश प्रमोदसिंह दुबे को प्रभारी जिलाधीश पद की जिम्मेदारी संभागीय आयुक्त पीयूष सिंह ने पत्र द्वारा अगले आदेश तक प्रदान की है.
      बुलढाणा जिलाधीश पद पर श्रीमती डॉ. निरुपमा डांगे कार्यरत है जिन्होंने सभी को साथ लेकर अपनी ज़िम्मेदारी को बखूबी अच्छे ढंग से निभाया है.वही अप्पर जिलाधीश पद की ज़िम्मेदारी संभालते हुए प्रमोदसिंह दुबे ने जिले में अवैध रेत माफियाओं पर निरंतर कार्रवाई करते हुए रेत तस्करों में खलबली मचाई हुई है.जिलाधीश श्रीमती डांगे ने "पोस्ट ग्रेजुएशन कोर्स इन मास्टर्स इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन" की शिक्षा प्राप्त करने के लिए लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, लंदन जाने के लिए 13 दिसेंबर 2019 से 31 जुलाई 2021 तक अर्थात करीब 20 माह की इस शिक्षा के लिए शासन से अनुमति मांगी थी जिसे शासन ने मंज़ूर कर दिया है.आज श्रीमती डांगे ने संभागीय आयुक्त के निर्देशानुसार जिलाधीश का पदभार प्रमोदसिंह दुबे को प्रदान किया है.आज जिलाधीश कार्यालय में श्रीमती डांगे को जिले भर के सभी अधिकारी एंव कर्मियों की तरफ से कार्यक्रम का आयोजन कर विदाई दी गई.

शिर्डी (प्रतिनिधी) - राज्यात अस्तित्वात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी , कॉग्रेस व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य संपतराव भारूड यांनी शिर्डी येथे आयोजित उत्तर अहमदनगर जिल्हा बैठकीत केली आहे.

शुक्रवार दि. 29/11/19 रोजी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या सरव तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची विशेष बैठक पार पडली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी ज्येष्ठ  सदस्य संपतराव भारुड यांनी आमदार कवाडे यांनी  संपूर्ण कारकिर्दीत जनतेच्या अनेक प्रश्नांच्या
केलेल्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला. आ. प्रा. कवाडे सरांनी नेहमीच धर्म निरपेक्ष विचार बळकटीकरणाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार कवाडे यांचा समावेश मंत्रिमंडळात करणे गरजेचे असल्याचे भारूड यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत डी. गायकवाड यांनी मनोगतात लॉग मार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या महाराष्ट्राततील सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल व्यापक माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळात जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगारी, प्रलंबित विकास कामे, निळवंडे धरण तसेच महिला प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही जयंत गायकवाड यांनी दिली.
निवेदनाच्या प्रती कॉग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या विशेष बैठकीत राहाता येथील फर्डे वक्ते प्रा. जयंत डी. गायकवाड यांची उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी नेवासे येथील ज्येष्ठ विधीज्ञ Advocate बाबासाहेब ब्राह्मणे, जिल्हा सल्लागार पदी कोपरगाव येथील Advocate सुरेश मोकळ, जिल्हा उपाध्यक्ष पदी सुनील जगताप, कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी यादवराव त्रिभुवन, उपाध्यक्ष पदी रायभान पगारे यांच्या निवडी सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या.  होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ यांनी तर सुचना Advocate बाबासाहेब ब्राह्मणे यांनी तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड यांनी केले. यावेळी मधुकर पावसे, यादव त्रिभुवन, युसुफ शेख, रमजान शेख, संतोष मोकळ, सुरेश धुरीया, नजीर सय्यद आदींसह उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget