बेलापूर( प्रतिनिधी) बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना आपल्या परिसरात घडू नये म्हणून पालक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी जागृक राहणे आवश्यक आहे असे मत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उझे यांनी व्यक्त केले हैदराबाद व ईतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडलेले आहेत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बेलापूर ग्रामस्थ बेलापूर पत्रकार संघ विद्यार्थी कल्याण विभाग राष्ट्रीय सेवा योजना बेलापूर महाविद्यालय आदींनी बेलापूर पोलीस स्टेशन येथे येऊन या घटनेचा निषेध केला व पोलिसांना निवेदन दिले त्यावेळी ग्रामस्थ समोर बोलताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे म्हणाले की वाईट घटना वेळ आणि ठिकाण विचारून होत नसते त्यामुळे इतर ठिकाणी घडलेल्या घटना आपल्या परिसरात घडणार नाही याची कुणी ग्वाही देऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक व नागरिकांनी जागरूक राहावे व कुणाविषयी काही संशय आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन उझे यांनी केले यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच व कैलासवासी मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड पत्रकार देविदास देसाई बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे हाजी इस्माईल शेख पल्लवी पुजारी आदींनी या घटनेचा निषेध करून अशा घटना पुन्हा घडणार नाही याकरिता उपाययोजना कराव्यात तसेच पोलिसांनी हैदराबाद येथे झालेल्या घटनेतील चारही आरोपींचा एन्काउंटर केल्यामुळे समाधान व्यक्त केले यावेळी बेलापूर महाविद्यालयाचे चंद्रकांत कोतकर निजाम शेख विलास गायकवाड अशोक माने बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले माजी उपसरपंच नंदाताई पवार शिरीन शेख अनिल पवार जावेद शेख अकबर भाई टिन मेकर वाले तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे लहान भाऊ नागले शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार बेलापुर सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन कलेश सातभाई मोसिन खाजाभाई पोलीस पाटील अशोक प्रधान अशोक गवते प्रकाश जाजू नामदेव बोंबले जावेद शेख पत्रकार दिलीप दायमा अतिश देसरडा निसार शाह सोनू शेख आयुब शेख असलम शेख आदीसह बेलापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोपट भोईटे बाळासाहेब गुंजाळ निखील तमनर राजु मेहेर आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला
Post a Comment