शिर्डी (प्रतिनिधी) - राज्यात अस्तित्वात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी , कॉग्रेस व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य संपतराव भारूड यांनी शिर्डी येथे आयोजित उत्तर अहमदनगर जिल्हा बैठकीत केली आहे.
शुक्रवार दि. 29/11/19 रोजी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या सरव तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची विशेष बैठक पार पडली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य संपतराव भारुड यांनी आमदार कवाडे यांनी संपूर्ण कारकिर्दीत जनतेच्या अनेक प्रश्नांच्या
केलेल्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला. आ. प्रा. कवाडे सरांनी नेहमीच धर्म निरपेक्ष विचार बळकटीकरणाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार कवाडे यांचा समावेश मंत्रिमंडळात करणे गरजेचे असल्याचे भारूड यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत डी. गायकवाड यांनी मनोगतात लॉग मार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या महाराष्ट्राततील सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल व्यापक माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळात जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगारी, प्रलंबित विकास कामे, निळवंडे धरण तसेच महिला प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही जयंत गायकवाड यांनी दिली.
निवेदनाच्या प्रती कॉग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या विशेष बैठकीत राहाता येथील फर्डे वक्ते प्रा. जयंत डी. गायकवाड यांची उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी नेवासे येथील ज्येष्ठ विधीज्ञ Advocate बाबासाहेब ब्राह्मणे, जिल्हा सल्लागार पदी कोपरगाव येथील Advocate सुरेश मोकळ, जिल्हा उपाध्यक्ष पदी सुनील जगताप, कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी यादवराव त्रिभुवन, उपाध्यक्ष पदी रायभान पगारे यांच्या निवडी सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या. होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ यांनी तर सुचना Advocate बाबासाहेब ब्राह्मणे यांनी तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड यांनी केले. यावेळी मधुकर पावसे, यादव त्रिभुवन, युसुफ शेख, रमजान शेख, संतोष मोकळ, सुरेश धुरीया, नजीर सय्यद आदींसह उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment