बुलडाणा- 5 डिसेंबर
संग्रामपुर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रसर असणारा नाव म्हणजे अभयसिंह मारोडे.अन्याय अत्याचार विरोधात नेहमी लडणाऱ्या या "वॉरिअर" चा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी असा साजरा केला की तो प्रशासनाला जागवण्यासाठी आंदोलन ठरला.
-
आज 5 डिसेंबरला अभयसिंह मारोडे व त्यांच्या लहान मुलगा कबीरचा वाढदिवस असल्याने मारोडे आपली पत्नी सोबत साकाळी शाळेत गेले व त्यांनी कबीरच्या वर्गात पेन्सिल वाटप केली. त्या नंतर हा "वॉरिअर" आपल्या काही मित्रां सोबत संग्रामपूर-वरवट रस्त्यावरील कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल समोरील मुख्य रस्त्यावर पडलेले गड्डे बुजविण्याकरिता गेले व श्रमदान करून शक्य तेवढे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.मग त्याच ठिकाणी "वॉरिअर" च्या मित्रमंडळीने त्यांचा वाढदिवस चक्क खड्यात बसून केक कापून साजरा केला आणि हा अनोखा वाढदिवस संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.समाजिक कामात स्वताला झोकुन देणारे लोक आपल्या प्रत्येक कामाने समाजाला काही तरी नवीन शिकवण देत असतात.
Post a Comment