कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तृतियपंथि अश्विनी नुरजहाँ शेख चा मारहाणीत मृत्यू.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तृतियपंथियाचा मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.दि. 17 ऑक्टोबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अश्विनी नुरजहाँ शेख (वय-45, रा.श्रीरामपूर) या तृतियपंथीयाला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी टणक वस्तूने डोक्यात मारहाण केली होती. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्यांच्या अहवालानुसार दि. 29 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार सुरेश रामचंद्र मुसळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि संभाजी पाटील करीत आहेत.