Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी (अब्दुल करीम सय्यद) (वय 70) यांच्या अपहरण प्रकरणातील दोघांना मंगळवारी (दि. 19) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतूर (जि. जालना) येथून अटक केली होती. दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने बुधवारी (दि. 20) त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर दुसर्‍या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.नगरमधील गुन्हेगार अजहर शेख याच्या सांगणावरून हा गुन्हा केल्याची कबुली या अटक केलेल्या दोघांनी दिली होती. अजहरला 25 लाखांची आवश्यकता होती म्हणून त्याने अन्य साथीदाराच्या मदतीने हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशी करीत असताना एकाची शैक्षणिक कागदपत्रे बघितल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या मुलाला सज्ञान होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तो परतूरमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. या मुलाचे वडील सरकारी नोकरीला असल्याचे समजले.परतूरमध्ये एका जीममध्ये हा मुलगा व्यायामासाठी जात होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेल्या अजहर शेख याच्याशी त्याची ओळख झाली. त्यातून पुण्याला फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून नगरला आणले व उद्योजकाचे अपहरण करण्यात सहभागी केल्याचे हा मुलगा पोलिसांना सांगत आहे. तर अटक केलेला दुसरा आरोपी निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय- 20, रा. परतूर, जि. जालना) याला बुधवारी (दि. 20) मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एस. चांदगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घ्यायचा आहे. गुन्हा कशा पद्धतीने केला, याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने निहाल शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-- निपाणी वाडगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुपचुप उरकण्यात आली असुन ती ग्रामसभा रद्द करुन पुन्हा ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पदाधिकार्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे प्रसिद्धी ला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की सदर ग्रामसभेची कुठलीही पूर्वसूचना  दिलेली नाही मासीक बैठकी प्रमाणे ठराविक पदाधिकारी व अधिकार्यांना बोलावून ग्रामसभा दाखविण्यात आली आहे गावातील अंगणवाडी सेविका शाळेचे मुख्याध्यापक मदतनीस आदिच या ग्रामसभेस उपस्थित  होते त्यामुळे ही ग्रामसभा नसुन मासीक बैठकच होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे गावात प्रसिद्धी देवुन ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी अजित राऊत नाना मांजरे संजय राऊत दादासाहेब कापसे श्रीकृष्ण बडाख भागचंद नवगीरे संतोष तोरसकर आदीनी केली आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- शेर ऐ हिंद गृपच्या वतीने शेर ऐ हिंद शुर लढवय्या टीपु सुलतान यांची जयंती आल्लाउद्दीन चौक येथे साजरी करण्यात आली बाजार समितीचे संचालक सुधुर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी पत्रकार देविदास देसाई  दिलीप दायमा तंटामूक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे  अजिज शेख मोहसिन सय्यद अकबर भाई टिनमेकरवाले खाजाभाई शेख टिनमेकरवाले मोहसिन शेख निसार शहा सोनु शेख असालमशेख इसुब सय्यद आरिफ शेख फिरोज सय्यद जब्बार आतार समीर जहागीरदार शहारुख सय्यद मोईन शेख आयुब शेख शोऐब शेखशहानवाज सय्यद दस्तगीर शेख सुलतान सय्यद आदी उपस्थित  होते

सिन्नर(प्रतिनिधी ): सिन्नरकडून मुंबईकडे घोटीमार्गे २ हजार किलो गोमांस वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीसह ४ जणांना घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी येथील सिन्नर फाट्यावर ही घटना घडली. घोटी पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घोटी सिन्नर मार्गावरून सिन्नरकडून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ०४ एच. डी. ४९४३ मध्ये अवैध गोमांस वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांचे जनावराचे कत्तल करण्याचे प्रमाणपत्र किंवा गोमांस वाहतुक करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना, विनापरवाना बेकायदा २ हजार किलो गोमांस आढळून आले.संशयित टेम्पोचालक शेख नाशिर उमर वय ३२, रा. मदिनानगर, संगमनेर, किन्नर- सहाद शफी शेख वय २६ संगमनेर खुर्द ता. संगमनेर, यांनी मांसमालक हाजी अन्वर रा. मुंबई त्यांच्याकडून ०२ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मुंबईला पोहोच करतांना घोटीत ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पोसह मुद्देमाल ताब्यात घेतला असून चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश कासार, शीतल गायकवाड तपास करीत आहेत.

अहमदनगरः नगर जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.
जखमी पोलिसांना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी राहाता शहरात आल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस टोळीला पकडण्यासाठी गेले होते. पोलिस व टोळीतील सदस्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी एकाने गावठी पिस्तूलमध्ये पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.
गोळीबारात पोलिस कर्मचारी पठारे हे जखमी झाले. तर टोळीतील सचिन काटे याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे घटनास्थळी दाखल झाले आहे.

शिर्डी (प्रतिनिधी)- न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढण्यात आली होती. यावर डॉ. हावरे यांनी न्यायालयापुढे हजर होत बिनशर्त माफीनामा कोर्टापुढे लिहून दिला. त्यानंतर न्यायालयाने ही नोटीस मागे घेतली. तुमच्या नावापुढे राज्यमंत्री म्हणून लावले जाते ते न लावता केवळ आपल्याला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी सांगितले.न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली होती. हावरे यांनी एक आठवड्याच्या आत त्यांचे म्हणणे मांडण्याचे स्पष्ट निर्देश खंडपिठाने दिले होते. तरीही डॉ. हावरे हे सुनावणीच्यावेळी हजर झाले नसल्यामुळे त्यांना काल 19 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचा आदेश खंडपिठाने गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी दिला होता.शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वकिलांना औरंगाबाद खंडपिठात संस्थानच्यावतीने काम पाहण्यास हावरे यांनी ई-मेलद्वारे मनाई केली होती. तसेच हावरे यांच्यासह विश्‍वस्त अ‍ॅड. मोहन जयकर यांनी फोनवरून धमकी दिल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे वकील अ‍ॅड. नितीन भवर यांनी 7 नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच त्यांनी ई-मेलची प्रतही खंडपिठात सादर केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन खंडपिठाने आदेश दिला होता. सदर याचिका सुनावणीस निघाली असता हावरे सुनावणीच्यावेळी हजर झाले नाहीत. त्यावेळी हावरे यांनी स्वतः हजर राहून खंडपिठाच्या आदेशाचा आदर करणे आवश्यक होते अशी सक्त नाराजी खंडपिठाने व्यक्त केली.त्यानुसार डॉ. सुरेश हावरे हे काल औरंगाबाद खंडपिठात हजर झाले आणि त्यांनी बिनशर्त माफीनामा लिहून कोर्टापुढे सादर केला. त्यानंतर यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही असेही सांगितले. न्यायालयाने डॉ. हावरे यांना बजावले की, तुमच्या नावापुढे राज्यमंत्री उपाधी लावली जाते ते न लावता आपणास केवळ राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी सांगितले.याप्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड.प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. किरण नगरकर यांनी काम पाहिले. तर संस्थानच्यावतीने अ‍ॅड. नितीन भवर, डॉ. हावरे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. एन. धोर्डे आणि शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नगरमधील उद्योगपती करीम हुंडेकरी यांचे काल पहाटेच्या सुमारास कोठला भागातून अपहरण करण्यात आले होते. त्यांना अपहरणकर्त्यांनी जालना येथे सोडून दिल्यानंतर आरोपींच्या मागावर पोलीस होते. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री इशू सिंधू साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सागर पाटील साहेब यांनी पोलिस निरीक्षक दिलीप पवार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात बाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एकूण 3 टीम समांतर तपास करीत होत्या सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना माञ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांना गुप्त बातमी द्वारे मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हेगार हा अहमदनगर शहरातील रेकॉर्डवर असलेला असून अजहर  मंजूर शेख याने त्याचे परतुर जिल्हा जालना येथील साथीदारांसह केला असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमीचे खात्री करणे कामी परतुर जिल्हा जालना या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद दत्ता इंगळे दत्ता गव्हाणे पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर दिगंबर कारखिले रवींद्र कर्डिले रविकिरण सोनटक्के दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले मेघराज कोल्हे मच्छिंद्र बर्डे सचिन अडबल संदीप घोडके चालक पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकर असे बातमीतील ठिकाणी गेले असता लड्ढा  कॉलनी याठिकाणी पहाटेच्या सुमारास सापळा रचून मुख्य आरोपी नामे अजहर  मंजूर शेख हा राहत असलेल्या घरावर छापा टाकून आरोपी नामे १) वैभव विष्णू सातारकर वय 19 राहणार सातारकर गल्ली परतुर तालुका परतुर जिल्हा जालना २) निहाल ऊर्फ बाबा मुशर्रफ शेख राहणार लढा कॉलनी तालुका परतुर जिल्हा जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी करताना वरील गुन्ह्याबाबत कबुली देऊन सदरचा गुन्हा त्यांचे इतर दोन साथीदार नामे ३)अजहर  मंजूर शेख राहणार फकीर गल्ली अहमदनगर ४)फतेह सिद्धिक अहमद अन्सारी राहणार परतुर जिल्हा जालना यांच्या मदतीने व यातील मुख्य आरोपी अजहर  मंजूर शेख याच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली सदर आरोपी क्रमांक एक व दोन यांच्याकडे आरोपी क्रमांक तीन वर्षे यांच्याकडे ठावठिकाणा बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर आरोपी क्रमांक तीन व चार हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी चहा पिण्यासाठी गेले असले बाबत सांगितले पोलिसांनी आरोपी क्रमांक एक व दोनच्या यांना ताब्यात घेतले बाबत माहिती मिळतात व आरोपी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने सदर ठिकाणी आपण वापरलेले वाहन टाटा टियागो नंबर एम एच 20 डि जे 38 79 ही सोडून चावी घेऊन फरार झाले सदर ठिकाणी जाऊन  वाहन ताब्यात घेऊन परतूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे आज या प्रकरणातील दोन आरोपींना परतुर मध्ये ताब्यात घेवून नगरमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget