अहमदनगरः नगर जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.
जखमी पोलिसांना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी राहाता शहरात आल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस टोळीला पकडण्यासाठी गेले होते. पोलिस व टोळीतील सदस्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी एकाने गावठी पिस्तूलमध्ये पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.
गोळीबारात पोलिस कर्मचारी पठारे हे जखमी झाले. तर टोळीतील सचिन काटे याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
Post a Comment