श्रीरामपूर ( प्रतिनिधी )-- निपाणी वाडगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुपचुप उरकण्यात आली असुन ती ग्रामसभा रद्द करुन पुन्हा ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पदाधिकार्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे प्रसिद्धी ला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की सदर ग्रामसभेची कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही मासीक बैठकी प्रमाणे ठराविक पदाधिकारी व अधिकार्यांना बोलावून ग्रामसभा दाखविण्यात आली आहे गावातील अंगणवाडी सेविका शाळेचे मुख्याध्यापक मदतनीस आदिच या ग्रामसभेस उपस्थित होते त्यामुळे ही ग्रामसभा नसुन मासीक बैठकच होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे गावात प्रसिद्धी देवुन ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी अजित राऊत नाना मांजरे संजय राऊत दादासाहेब कापसे श्रीकृष्ण बडाख भागचंद नवगीरे संतोष तोरसकर आदीनी केली आहे
Post a Comment