Latest Post

शिर्डी (प्रतिनिधी)- न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढण्यात आली होती. यावर डॉ. हावरे यांनी न्यायालयापुढे हजर होत बिनशर्त माफीनामा कोर्टापुढे लिहून दिला. त्यानंतर न्यायालयाने ही नोटीस मागे घेतली. तुमच्या नावापुढे राज्यमंत्री म्हणून लावले जाते ते न लावता केवळ आपल्याला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी सांगितले.न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली होती. हावरे यांनी एक आठवड्याच्या आत त्यांचे म्हणणे मांडण्याचे स्पष्ट निर्देश खंडपिठाने दिले होते. तरीही डॉ. हावरे हे सुनावणीच्यावेळी हजर झाले नसल्यामुळे त्यांना काल 19 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचा आदेश खंडपिठाने गुरुवार दि. 14 नोव्हेंबर रोजी दिला होता.शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वकिलांना औरंगाबाद खंडपिठात संस्थानच्यावतीने काम पाहण्यास हावरे यांनी ई-मेलद्वारे मनाई केली होती. तसेच हावरे यांच्यासह विश्‍वस्त अ‍ॅड. मोहन जयकर यांनी फोनवरून धमकी दिल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे वकील अ‍ॅड. नितीन भवर यांनी 7 नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच त्यांनी ई-मेलची प्रतही खंडपिठात सादर केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन खंडपिठाने आदेश दिला होता. सदर याचिका सुनावणीस निघाली असता हावरे सुनावणीच्यावेळी हजर झाले नाहीत. त्यावेळी हावरे यांनी स्वतः हजर राहून खंडपिठाच्या आदेशाचा आदर करणे आवश्यक होते अशी सक्त नाराजी खंडपिठाने व्यक्त केली.त्यानुसार डॉ. सुरेश हावरे हे काल औरंगाबाद खंडपिठात हजर झाले आणि त्यांनी बिनशर्त माफीनामा लिहून कोर्टापुढे सादर केला. त्यानंतर यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही असेही सांगितले. न्यायालयाने डॉ. हावरे यांना बजावले की, तुमच्या नावापुढे राज्यमंत्री उपाधी लावली जाते ते न लावता आपणास केवळ राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याचे औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश प्रसन्न बी. वराळे व न्यायाधीश ए. एस. किल्लोर यांनी सांगितले.याप्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड.प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. किरण नगरकर यांनी काम पाहिले. तर संस्थानच्यावतीने अ‍ॅड. नितीन भवर, डॉ. हावरे यांच्यावतीने अ‍ॅड. आर. एन. धोर्डे आणि शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नगरमधील उद्योगपती करीम हुंडेकरी यांचे काल पहाटेच्या सुमारास कोठला भागातून अपहरण करण्यात आले होते. त्यांना अपहरणकर्त्यांनी जालना येथे सोडून दिल्यानंतर आरोपींच्या मागावर पोलीस होते. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. श्री इशू सिंधू साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री सागर पाटील साहेब यांनी पोलिस निरीक्षक दिलीप पवार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात बाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एकूण 3 टीम समांतर तपास करीत होत्या सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना माञ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांना गुप्त बातमी द्वारे मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हेगार हा अहमदनगर शहरातील रेकॉर्डवर असलेला असून अजहर  मंजूर शेख याने त्याचे परतुर जिल्हा जालना येथील साथीदारांसह केला असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमीचे खात्री करणे कामी परतुर जिल्हा जालना या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद दत्ता इंगळे दत्ता गव्हाणे पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर दिगंबर कारखिले रवींद्र कर्डिले रविकिरण सोनटक्के दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले मेघराज कोल्हे मच्छिंद्र बर्डे सचिन अडबल संदीप घोडके चालक पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकर असे बातमीतील ठिकाणी गेले असता लड्ढा  कॉलनी याठिकाणी पहाटेच्या सुमारास सापळा रचून मुख्य आरोपी नामे अजहर  मंजूर शेख हा राहत असलेल्या घरावर छापा टाकून आरोपी नामे १) वैभव विष्णू सातारकर वय 19 राहणार सातारकर गल्ली परतुर तालुका परतुर जिल्हा जालना २) निहाल ऊर्फ बाबा मुशर्रफ शेख राहणार लढा कॉलनी तालुका परतुर जिल्हा जालना यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी करताना वरील गुन्ह्याबाबत कबुली देऊन सदरचा गुन्हा त्यांचे इतर दोन साथीदार नामे ३)अजहर  मंजूर शेख राहणार फकीर गल्ली अहमदनगर ४)फतेह सिद्धिक अहमद अन्सारी राहणार परतुर जिल्हा जालना यांच्या मदतीने व यातील मुख्य आरोपी अजहर  मंजूर शेख याच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली सदर आरोपी क्रमांक एक व दोन यांच्याकडे आरोपी क्रमांक तीन वर्षे यांच्याकडे ठावठिकाणा बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर आरोपी क्रमांक तीन व चार हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी चहा पिण्यासाठी गेले असले बाबत सांगितले पोलिसांनी आरोपी क्रमांक एक व दोनच्या यांना ताब्यात घेतले बाबत माहिती मिळतात व आरोपी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने सदर ठिकाणी आपण वापरलेले वाहन टाटा टियागो नंबर एम एच 20 डि जे 38 79 ही सोडून चावी घेऊन फरार झाले सदर ठिकाणी जाऊन  वाहन ताब्यात घेऊन परतूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे आज या प्रकरणातील दोन आरोपींना परतुर मध्ये ताब्यात घेवून नगरमध्ये पोलीस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आले.


मालेगाव :(प्रतिनिधी) सोने कारागीराच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सुमारे ३२ लाखांच्या दागिण्यांची लूटमार प्रकरणाचा तपास लावण्यात छावणी पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये पाच अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लुटमारीतील सुमारे २१ लाखांचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील संगमेश्वर भागातील डॉ.आमिन यांच्या हॉस्पिटल मागील गल्लीत (ता.१८) च्या रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली होती. सोनार झुंबरलाल ज्वेलर्सचे मालक झुंबरलाल बागुल हे नेहमीप्रमाणे सोने-चांदीचे दागिने घेऊन घराकडे परतत असताना अॅक्टीव्हा गाडीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वाडिले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेने प्रारंभी या प्रकरणाचा समांतर तपास केला. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासातूनही काहीच निष्पन्न न झाल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर गुप्त माहितीवरुन भाग्येश भगवान महाले (19, रा. चंदनपुरी गेट, हनुमान मंदिरासमोर) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देत गणेश राजेंद्र वडगे (18, रा. सावता चौक, वडगे गल्ली, संगमेश्वर) व उबेद उर्फ बद्दे शमसोद्दीन अन्सारी (21, रा. काकुबाईचा बाग, संगमेश्वर) यांचा सहभाग स्पष्ट झाला. यातील उबेद हा सराईत गुन्हेगार असून, महाले पोलिसांच्या हाती लागल्याची कुणकूण लागताच दोघे फरार झाले.त्यांची शोधमोहीम राबवण्यात येऊन दोघांनाही जेरबंद करण्यात आले. त्यांच्या उलट तपासणीतून आसिफ इकबाल सईद अहमद उर्फ आसिफ टेलर (रमजानपुरा), जिशान अहमद नफिस अहमद (कुसुंबा रोड), ताहिर जमाल शाहिद जमाल उर्फ ताहिर डॉन (रा. गोल्डननगर), आमिर शहा अरमान शहा उर्फ इम्मू (सलीमनगर), मुशिर (पूर्ण नाव माहित नाही) व इम्मूचा मेहुणा भाईजान (सुरत) याचाही गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. हे सर्व गुजरात राज्यात लपून बसले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सुरतला पाठविण्यात आले. त्यातून आसिफ टेलर, जिशान अहमद यांना सुरतच्या पांडेसरा भागातील गोल्डन आवास परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. लुटमारीचे सोने नाशिकमधील मनिष रवींद्र सोनार (३३, रा. सरस्वती नगर, पंचवटी) याला विकल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार पथकाने सोनारला ताब्यात घेत २१लाख ६० हजार ७८४ रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. पाच आरोपींना अटक झाली असून, चार आरोपी अद्याप फरार आहेत.पोलिस उपनिरीक्षक गणेश आखाडे, पोलिसनाईक अविनाश राठोड, शिपाई पंकज भोये, नितीन बारहाते, नरेंद्रकुमार कोळी, संजय पाटील, संदीप राठोड यांचा तपास पथकात समावेश होता.

बुलडाणा- 18 नोव्हे
चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अपहार केल्या प्रकरणी दोन आरोपींना बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज 18 नोव्हेंबर रोजी चिखलीतुन अटक  केली.
      महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, चिखलीचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात, व्यवस्थापक सतीश प्रल्हाद वाघ, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, राऊतवाडी,शाखा व्यवस्थापक गणेश कचरूजी खंडागळे यांच्याविरूद्ध 12 जुलै 2019 रोजी चिखली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. खोटे व बनावट कॅश कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांच्या पैशातून 1 कोटी 47 लाख 20 हजार 329 रुपये उचल करून अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणाचा तपास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करण्यात आला होता. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाअंती सदर आरोपींनी 4 कोटी 24 लाख 58 हजार 88 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्या नंतर उपरोक्त चारही आरोपी फरार होते. दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक डी.बी.तडवी यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सतीश वाघ व परमेश्वर पवार हे चिखली शहरातील आपल्या राहत्या घरी येणार आहे. पथकाने सापळा रचून शिताफीने वरील दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलिस कोठडी सुनवन्यात आली. सदर कार्रवाई मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी तडवी, पीएसआय दिगंबर अंभोरे, कर्मचारी सरदार बेग,रामू मुंढे, निशांत चव्हाण, किरण भुजबळ, सिमा भुतेकर व चालक सचिन गायगोळ यांचा सहभाग होता.


18 नोव्हे
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर अवैध धंद्यांचे माहेर घर असून येथे वरली मटका व प्रतिबंधित गुटख्या व्यवसाय सर्रासपने चालत होता. मागील काही महिन्या पासून गुटखा माफियावर बुलढाणा एलसीबी कडून धडक कार्रवाई करण्यात आली होती त्यामुळे गुटखा माफियाने घाबरून आपला धंदा बंद केला होता पण आता पुन्हा त्याने आपला धंदा सुरु केला असता आज त्याच्या एका ठिकाण्यावर चिखली पोलीसाने धाड टाकून लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त करुण एकाला ताब्यात घेतले तर मुख्य माफिया फरार झाला आहे.
     चिखली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खैरुशाह बाबा दर्गाह परिसरात शासन द्वारा प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची चोरुन लपून विक्री होत असल्याची माहीती मिळाल्यावरुन चिखली पोलीसच्या गुन्हे शाखेने कारवाई करत छापा टाकला. यावेळी पोलीसांनी एकास ताब्यात घेतले तर एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.याप्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास चिखली शहरात चोरुन लपून राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करणारा अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी याने खैरुशाह बाबा दर्गाह परिसरात गुटखा आणून जहीर खान अजीज खान याचे घरात लपवून ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या निर्देशाखाली पोहेकॉ विक्रम काकड, नारायण तायडे, प्रकाश पाटिल, पो.ना. राहुल मेहुणकर, पो कॉ. पुरुषोत्त्म आघाव, गजानन जाधव, पोकॉ सुनिता इंगळे यांनी पंचासह धाड टाकली असता जहिर खान अजीज खान याचे राहते घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन मोठया पांढऱ्या पोत्यांमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला व नऊ पांढऱ्या रंगाच्या पोतडया आढळून आल्या. त्या उघडल्या असत्या त्यामध्ये 28 पोतडे शासन प्रतिबंधीत गुटखा मिळून आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे तर जहीर खान अजीज खान यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर माल ताब्यात घेऊन पंचनामा करुन सदर गुटखा पोलीस स्टेशन चिखली येथे जमा करण्यात आला आहे. चिखली पोलीसांनी या कारवाईची माहिती अन्नं व औषध अधिकारी यांना कळविली असल्याचे सांगितले मात्र वृत्त लिहीपर्यंत अन्न व औषध विभागाचा कुणीही अधिकारी चिखलीला फिरकला नव्हता. तर अधिकारी वर्गाशी पत्रकारांनी संपर्क करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.यापुर्वी दि 16 सप्टेंबर 2019 रोजी देखील पोलीसांनी घाड टाकून 3 लाख 64 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता.आता बुलढाणा अन्न व औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी केंव्हा ठाण्यात दाखल होवून पुढची कार्रवाई करतात हे बघावे लागेल.

अहमदनगर (दि. १८)  आज सकाळी पिस्तुलाच्या धाकाने अपहरण झालेले अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस पथकाने औरंगाबाद जालना रोड वरून त्यांना सुखरूप पणे अहमदनगर पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयात हजर केले आहे. सकाळी त्यांच्या अपहरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तरी हुंडेकरी हे सुखरूप असल्याने शहरवासीय तसेच त्यांच्या हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.आज पहाटेच्या सुमारास करीम हुंडेकरी हे नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडले ते मशिदीत पोहोचण्यापूर्वी त्यांच्या पातळीवर असलेल्या टोळक्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमध्ये घातले त्यानंतर ते पसार झाले.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अपहरण झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली आरोपी पसार झाले असून, तोफखाना, कोतवाली व एलसीबीच्या पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे. हुडेकरी यांच्याकडून घटनाक्रमाबत अधिक माहिती घेत आहे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, एलसीबीचे पीआय दिलीप पवार उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- आजच्या स्पर्धेच्या युगात अपार मेहनत व कष्ट  जो करतो यश त्याच्या पायावर लोटांगण घालते हे अल्पावधीतच लाखावरुन कोटीच्या ठेवी पर्यत पोहोचालेल्या लोकमाता अहील्याबाई होळकर ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेने दाखवुन दिले असल्याचे मत अँड शाळीग्राम होडगर यांनी व्यक्त केले                                बेलापूर येथील लोकमाता अहील्याबाई होळकर ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राऊत श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे यशवंत नागरी पतसंस्थेचे ।चेअरमन सुरेश सातव कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन  रविंद्र खटोड काटेस्वामी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुध्द महाले अशोक कारखान्याचे संचालक  अभिषेक  खंडागळे पत्रकार देविदास देसाई प्रा आशोक बडधे आदि मान्यवर उपस्थित  होते  होडगर पुढे म्हणाले की पतसंस्था चालविणे फार जिकीरीचे काम आहे बेलापूर गावची बाजारपेठ मोठी असुन ठेवीदारांचा विश्वास पतसंस्थेवर असल्यामुळे ठेवीचे प्रमाण वाढत आहे संस्थानी अशाच प्रकारे आपली विश्वासह्रता टिकवुन ठेवावी असेही ते म्हणाले या वेळी प्रा अशोक बडधे वासुदेव काळे सुरेश सातव कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोडअँड विजयराव साळुंके  आदिंनी  मनोगत व्यक्त  केले या वेळी द्वारकनाथ बडधे विप्रदास भास्कर फणसे नवनाथ कुताळ दिलीप दायमा दिपक क्षत्रिय संदिप सोनवणे मिलींद सहापुरकर अशोक प्रधान विनोद जोशी अनिरुध्द महाले व्हा .चेअरमन  महेश ओहोळ आदिसह संचालक  ठेवीदार ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन आशोक राशिनकर यांनी प्रास्ताविक  केले तर प्रविण काळे यांनी आभार मानले सूत्रसंचलन पुरुषोत्तम भराटे यांनी केले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget