अहमदनगर (दि. १८) आज सकाळी पिस्तुलाच्या धाकाने अपहरण झालेले अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस पथकाने औरंगाबाद जालना रोड वरून त्यांना सुखरूप पणे अहमदनगर पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयात हजर केले आहे. सकाळी त्यांच्या अपहरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तरी हुंडेकरी हे सुखरूप असल्याने शहरवासीय तसेच त्यांच्या हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.आज पहाटेच्या सुमारास करीम हुंडेकरी हे नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडले ते मशिदीत पोहोचण्यापूर्वी त्यांच्या पातळीवर असलेल्या टोळक्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमध्ये घातले त्यानंतर ते पसार झाले.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कोठला परिसरात धाव घेतली अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अपहरण झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली आरोपी पसार झाले असून, तोफखाना, कोतवाली व एलसीबीच्या पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे. हुडेकरी यांच्याकडून घटनाक्रमाबत अधिक माहिती घेत आहे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, एलसीबीचे पीआय दिलीप पवार उपस्थित होते.
Post a Comment